आज कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू झाली आणि मर्यादित अर्थाने का होईना आपण कोरोनावर विजय मिळविला आहे. या सुमुहूर्तावर 'विजय दिन' ही माझी कविता.
विजय दिन
वाट पाहिली आतुरतेने तो
दिन भाग्याचा आज आला
आसेतुहिमाचल भारतभुवनी
आनंद जल्लोष सर्वत्र झाला
किती भोगले किती सोसले
दिली आहुती किती योद्ध्यांची
अदृश्य अरिवर घाव घालता
बाजी लावली आम्ही प्राणांची
आठवती आज चिमाजीअप्पा
लढले त्वेषाने ना केवळ गप्पा
वीर शिवाजी तुम्ही आठवा
शिकविला ज्यांनी गनिमीकावा
राणाप्रताप शौर्याचा राणा
मुघलांशी लढणे त्याचा बाणा
इंग्रजांच्या जुलमी गगनी
वीज तळपली झाशीची राणी
कोरोनाशी लढता त्रिभुवनी
इतिहास आठवे हा मर्दानी
झुकलो ना जरी संकटे सारी
लस शोधली ही बहुगुणकारी
लसीकरणाच्या मंगल दिनी
अश्रू ओघळती कृतज्ञ नयनी
पडला उठला किती धडपडला
अंती विजय आज जाहला
-प्रा.अरूण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
(दि.१६.०१.२०२१)
https://www.facebook.com/AsuChyaKavita