नमस्कार मायबोलीकर,
खूप दिवसांतून आज गझल केलेली आहे
आणि वैभव जोशीचा आदर्श घेऊन मींग्लिश मध्ये लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न केलेला आहे.
शीर्षक : फोनच्या स्टोरेजमध्ये...
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
वृत्त: : आनंदकंद
आनंदी आयुष्याची एखादी ओळ लिहावी..
जी दुःखाच्या मंचावरती आधारास पुरावी..!!
इतक्या वेळा तुटलो की उठताही आले नाही..
या तूट-फुटींची सांगा,कोणी भरपाई द्यावी..??
आयुष्याचे अवघे जगणे नितळ करावे म्हणतो..
फक्त जरा श्वासांची तुरटी देवा पुरुन उरावी..!!
आभाळाचा हेवा अन धरतीशी वैर नसावे..
जाणुन मोठेपण इतरांचे आपण लवती घ्यावी..!!
शेतामधल्या मातीला घामाचे देता अत्तर..
गात्रे अन गात्रे पीकांची गंधाळून निघावी..!!
-गणेश शिंदे,दुसरबिडकर..