#@ *संस्कार* @#
लेखिका
सौ. वनिता सतीश भोगील
दोन पिढ्या घरात मुलगी जन्मली नव्हती म्हणून नीतू चे अती लाड, अगदी आजी अजोबान पासून ते काका काकु,आत्या वगैरे सगळ्याचीच नीतू लाडकी,
नील मोठा आणी नीतू लहान मग दादा जवळ तर खूपच लाड,
दोघेही शिक्षणत हुशार,पण नीतू मुलगी म्हणून घरात कसलाच आईला हातभार नव्हता तिचा.
तिला निर्मला बाई काही बोलणार तर सगळे त्यांनाच बोलायचे,
आपल्यात आहे तोपर्यंत तरी खाउदे आयत, नंतर सासरी तर करावच लागेल न?
आई म्हणून हे सगळ निर्मलाबाईना काही पटत नसे, पण बोलता येत नव्हत सगळ्यांसमोर.
काळजी वाटायची त्याना, सासरी कस निभावनार देव जाने,
शिक्षण पूर्ण झाल तस सगळ्यानी नीतू साठी स्थळ सूचवायला चालू केल,
योगायोगाने जवळच स्थळ पसंत पडल,
सासरची लोक पण सुशिक्षित होती,एकुलता एक मुलगा होता, सगळच छान होत.
थाटामाटात लग्न पार पडल,नीतू सासरी गेली,
नव्याचे नऊ दिवस संपले पण
पण? नीतुचे काही नवीन दिवस संपत नव्हते,
उशिरा उठायच, आरामात सासऱ्यांसमोर येऊन सोफ्यावर बसून चहा घ्यायचा, मग आंघोळ,
स्वत:पुरताच आवडेल तो नास्ता बनवायचा अण खायचा.
सासु समझदार होती, तिला वाटायच नवीन आहे वेळ लागणार नवीन घरी एडजस्ट व्हायला,
सासुबाई लवकर उठून सासऱ्यांचा डबा, मुला चा नास्ता,डबा, सगळ आवरायच्या.
कधी कधी तर मॅडम नवरोबा गेले तरी झोपेतच असायच्या.
तरी घराच्यानकडूंन कसलिच तक्रार नव्हती...
दोन्ही वेळेचे जेवण सासुबाई बनवायच्या,
तीन ,चार महीने गेले असेच लग्नानंतर, त्यात दोन वेळा नीतू माहेरी जाऊन आली,
चार महिन्यात पण तिच्यात काहीच फरक पडत नाही बघून सासुबाई म्हणाल्या "नीतू मी पण थकले ग आता होत नाही, तू आता घराची आणी किचन ची जबाबदारी घे"
तस मॅडम चा पहारा चढला,
मी माझ्या घरी कधीच काम केले नाही, तुम्हाला नाही जमत तर कामवाली ठेवा, मी नाही करणार जेवण वगैरे.....
आणी मग हे रोजचच मॅडम च चालू झाल, मग हळू हळू सासु सुनेत खटके उडु लागले,
जरास काही झाल की नीतू माहेरी येऊ लागली,
पण लाडकी म्हणून तिला कुणीच दुखावत नसायचे.... आई सोडून,निर्मला बाईना काही पटत नसे पण नाइलाज...
सहा, सात महीने झाले एक दिवस चक्कर येऊन पडली नीतू,
सासु सासरे घाबरले, डॉक्टर ला घरी बोलावल,
डॉक्टरानी चेक करून गुड न्यूज असल्याचा सांगीतल,,,
तस सगळ घरच आनंदित झाल,
मग काय नितुला सगळ बेड वरच दयायच्या सासुबाई,
पण कधीच नीतू च्या तोंडातुन सासुबद्दल आदराचे दोन शब्द निघत नव्हते,
सात महीने झाले सासुबाई नी डोहाळ जेवण थाटामाटात साजर केल.
बाळतपणा साठी नीतू माहेरी आली,
नील च्या पण लग्नाची चर्चा घरी सुरु झाली,
नात्यातील मुलगी पाहिली सुंदर सुशील होती,
रेवती मुलीचे नाव होते.
साखरपुडा झाला, एक दिवस नितुच्या पोटात दुखायला लागले,
घाईमधे हॉस्पिटल ला नेले,
थोड्याच वेळात डॉक्टरानी येऊन सांगितले मुलगी झाली, आई , बाळ सुखरूप आहेत,
सगळे आनंदी होते,
नितुच्या सासरी कळवले त्यानाही खुप आंनद झाला.
थोड्याच दिवसात डिस्चार्ज मिळाला, घरी दोघिंचे मोठे स्वागत झाले,
सगळे चांगले झाले म्हणून दोन्ही घरचे आनंदी होते,
आता निल च्या लग्नाची तयारी चालू झाली,
नितुच्या सासरची घ्यायला आले,
काही दिवसाने निल च लग्न होत, लग्नाला नीतू परत आली.
लग्न पार पडल,
रेवतीच पाऊल लक्ष्मी च्या रुपात घरी पडल.
रेवती आल्यापासून निर्मला बाई रिटायर्ड झाल्या होत्या,सगळ कस निवांत असायच,
सुनच तशी गुणी भेटली होती,
नीतू दर आठ दिवसाने आईकडे यायची,
निर्मलाबाइना हे आवडत नसे, त्या नेहमी म्हणायच्या सारख माहेरी येन बर दिसत का,
घरची काम करत जा,सासु सासरयांची सेवा करत जा,
पण नीतुवर याचा काही परिणाम होत नसायचा.
हळू हळू रेवतीला पण समजल की नीतू सासरी काहीही करत नाही,
रोज रोज भांडण असायची, नवरयाला नीतू म्हणायची आपण वेगळे राहु, पण त्याला पटत नसे.
निर्मलाबाइना त्याच टेन्शन येई, मुलीने सासु सासरयांची सेवा करावी अस वाटायच पन नीतू काही ऐकत नसे.
निर्मला बाई च टेन्शन बघून एक दिवस रेवतीने उगिच भांडण चालू केल.
कुणाला काहीच कळेना,
रेवती अस का करते काहीच समजेना,
मग रेवती रोज कारण काढून निर्मलाबाई सोबत भांडण करु लागली,
एक दिवस तर कहर च केला, निल ला रेवती म्हणाली तुझ्या आई बाबाना वृद्धाश्रमात सोडून ये,
आई वडील याना तर काय करावे सुचेना.
दुसऱ्या दिवशी रेवतीने नीतू ला कॉल करून सांगीतले, तुम्ही येऊन तुमच्या आई वडिलांना भेटून जा,त्याना आज आश्रमात सोडनार आहेत.
नितुचा पहरा चढला,
तावातावात माहेरी आली. सोबत बाळ आणी नवरा पण होते.
रेवतीला जाब वीचारु लागली, तू कोण? आई बाबाना आश्रमात पाठवनारी,
आणी काय रे दादा काल परवा आलेल्या बायकोच्या तालावर नाचून जन्मदात्या ना आश्रमात सोडायला निघालास?
तुला थोड पण काही वाटत नाही का?
अरे ति आता आली,पण तुला तर माहित आहे न आई बाबानी किती कष्ट घेतलेत ते तुझ्या शिक्षणा साठी,नोकरी साठी.
कस विसरु शकतोस तू......
निल खाली मान घालून उभा होता,
अरे दादा बोल काहीतरी, बायकोच ऐकून तुला ही वेड लागल का?
तेवढ्यात रेवती म्हणाली, झाली न आता तुमची भेट..
आई बाबा गाडीत बसा, निल सोडायला येतोय आश्रमात.
पुरेसे पैसे ठेवलेत तुमच्या बैग मधे, लागलेच तर फ़ोन करा, परत येण्याच्या भानगडित पडू नका,
उगीच आम्हाला त्रास..
हे ऐकून मात्र नीतू चा स्वतावरचा ताबा सुटला..
तीने रेवतीवर हात उगारला........
तस रेवतीने क्षणात तिचा हात रोखुन उत्तर दिल....
काय हो वंस तुम्ही मला ज्ञान शिकावता आणी स्वताच काय?
तुमचा नवरा आश्रमातुन आनलेला नाही न?
त्याना आहेत की जन्मदाते, तुम्ही त्यांच् बघा आणी मग माझ्यावर आरोप लावा...
नीतू ने हात खाली घेतला,,, बाळाला घेऊन नवरा उभा होता त्याच्याकडे पाहिल, त्याने हिची नजर चुकावन्यासाठी खाली पाहिल....
आणी नितुचे डोळे उघडले, आपल्या प्रेमासाठी घरातील सासु सासरे किती करतात, आणी माझ ऐकून नवर्याने ............
तीची तिलाच लाज वाटू लागली...
माहेरचा विषय तिथेच सोडून नवरयाला घेऊन घरी आली...
पाय धरून सासु सासरयाचे पाय धरले, चूकीची क्षमा मागितली...
तेव्हाच इकडे रेवती आई बाबा च्या बैग घेऊन घरात गेली सुधा..
कुणाला काहीच समजत नव्हते,
रेवतीने सगळ्यांची माफी मागितली...
हे सगळ नाटक होत, नीतू वंस ना जाग करण्यासाठी....
कारण सासु सासरयांची सेवा हा सगळ्यात अनमोल आशीर्वाद असतो हे त्याना समजत नव्हत म्हणून अस केल....
निर्मला बाईनी देवाकडे बघून हात जोडले डोळे आनंदाश्रु नी भरले होते........,