बांद्रा वेस्ट- १६ Bandra West- 16
रॉड्रिक आणि मॉन्ट्या कसेबसे उभे राहिले . अंगात काहीच त्राण शिल्लक नव्हतं . खाली पडलेली गाडी उचलायचं भानही त्यांना राहिलं नाही . दोघांचेही पाय लटपटत होते. सगळं अंग घामाने भिजून गेलं होतं . ए. पी. आय. जामसंडे त्यांच्या जवळ आले . ‘ खाड … खाड … ‘ त्यांनी दोघांच्याही पहिल्या दोन मुस्कटात मारल्या . त्यांचा हात जबरदस्तच होता . पहिला रट्टा पडताच दोघांच्याही डोळ्यासमोर काजवे चमकले . कानशिलं गरम झाली . डोकं बधिर झालं . त्या तडाख्याने दोघेही होलपडून बाजूला पडले .
बांद्रा वेस्ट १५
समोरुन पोलिसांची व्हॅन येत होती. मॉन्ट्याने गाडीचा वेग थोडा कमी केला.
" मॉन्ट्या, बाईक स्लो नको करुस. फास्ट जाऊ दे. "
" पागल आहेस काय ? असं केलं तर उगाच त्यांना संशय येईल. " मॉन्ट्याचे म्हणणे बरोबरच होते. रस्ताही अरुंद होता. पोलीस पेट्रोलव्हॅन जवळ आली. मॉन्ट्या खाली बघुन बाईक चालवु लागला. जवळ जातो तोच पोलीसांनी त्यांची गाडी आडवी घातलीच. पिवळा-लाल फिरणारा प्रकाश दोघांच्याही चेहऱ्यावर पडला होता. " काय रे ए...? कुठे चाल्लाय एवढ्या रात्री ? आं.....? " समोरच्या सिटवर बसलेल्या पोलीसाने त्यांना हटकलेच...!
राक्षस
`पितृछाया` बंगल्याचे गेट उघडून मी अंगणात पाऊल टाकले. बंगल्याकडे एक नजर टाकली. बंगल्याची संपूर्ण रयाच गेलेली होती. बंगल्याचा मालक कफल्लक झाला होता वगैरे काहीही परिस्थिती नव्हती. तो श्रीमंतच होता. मात्र गेले सात-आठ वर्ष आजारी होता; गेले दोन वर्ष तर अंथरुणावरच होता. जवळचं असं कुणी जवळ नव्हतं. आणि मी, त्याचा so called मित्र, एक डॉक्टर होतो. रोजच्या माझ्या visitसाठी मी त्या बंगल्यात शिरत होतो.
"लक्ष्मी"
" ए, भवाने.! उठ की आता.. तो सूर्य माथ्यावर येईल तरी झोप पूरी होत नाही महाराणीची..!!. रोज तुला जेवायला कोणं तुझा वर ढगात बसलेला बाप घालील का?" मामीच्या कर्कश आवाजाने आणि खसकन् ओढलेल्या फाटक्या गोधडीतून गाढ झोपी गेलेली लक्ष्मी खडबडून जागी झाली. लक्ष्मी अंथरुणातून उठून जागेवर बसली आणि बसल्या- बसल्याच डोळे चोळत इकडे- तिकडे पाहू लागली. तिला तसं बसलेलं पाहून मामीच्या रागाचा पारा अजूनच चढला. लक्ष्मीच्या आई- वडिलांचा शिव्यांनी उद्धार करीत मामीच्या तोंडाचा पट्टा अखंड सुरू झाला.
बांद्रा वेस्ट १४ Bandra West- 14
" अरे, बाँब नाही ह्यात. एवडा काय घाबरतोय ... " वैनीसाहेब गमतीने त्याच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाल्या. मॉन्ट्याही सुन्न झाला होता.
" वैनीसाहेब, प्लीज.... " तो काय बोलणार हे जणु माहीत असल्यामुळे वैनीसाहेबांनी पुन्हा एकदा हातातली पिस्तुल मॉन्ट्याच्या समोर नाचवली. त्याचा नाईलाज झाला.
" हे सामान कसं पोहोचवायचं खारला...? " रॉड्रीक मुद्दयावर आला.
बांद्रा वेस्ट १३
' कोकेन ' हा शब्द कानावर पडला आणि दोघे उडालेच. " काय ? " दोघांच्याही तोंडुन हाच शब्द बाहेर पडला. कदाचीत आपण चुकुन हे काहीतरी ऐकलं असावं असं वाटुन दोघेही भांबाऊन समोर पहात राहीले. हे कोकेन , चरस असले प्रकार केवळ फिल्म मधे पाहीले आणि ऐकले होते. त्यांचा प्रत्यक्ष संबंध कधी येईल असं त्यांना स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. दोघांचीही डोकी सुन्न झाली.
" एवढं घाबरायला काय झालं ? तुम्हाला घ्यायला सांगत नाही. तुम्ही फक्त हे एका ठिकाणी पोहोचवायचंय . " वैनीसाहेब इतक्या सहज म्हणाल्या. की बाजारातुन किराणामाल आणुन एखाद्या ठिकाणी पोहोचवायचा आहे.
आप्प्या उर्फ आप्पासाहेब म्हणजे आमच्या गल्लीतलं वेगळंच प्रकरण होतं. हे आप्पासाहेब पहिलीपासुन आमच्याच वर्गात होते. आईवडील अंगुठाछाप पण मुलाने चार बुकं शिकुन मोठा साहेब व्हावं अशी त्यांची भारी इच्छा. आता चार बुकं वाचुन कोणी साहेब झालय का.. याच्या उलट आप्पासाहेबांचे विचार. शिकुन काय उपयोग असं याला पहिलीत नाव दाखल केल्यापासुन वाटायचे की काय देव जाणे. कारण आप्प्याचे शाळेत येणे म्हणजे रोज सकाळचा मोठा सोहळा असायचा आणि गल्लीसाठी फुकटची करमणुक. बऱ्याच वेळा शाळेतली सकाळची प्रार्थना संपुन पहिला तास सुरु व्हायचा तेव्हा त्याची आई शाळेकडे ओढुन नेण्याचा प्रयत्न करत असे.
चूक!
सहाचे सुमारास घरी पोचणारा मी आज चारलाच घरी पोहोचत होतो. आमच्या कॉम्प्लेक्सच्या बाहेर माझी गाडी दिसताच सिक्युरिटीचा माणूस गेट उघडायला धावत आला. माझी गाडी गेटमधून आत घेत असतानाच मला आमच्या दुसऱ्या रिझर्व पार्किंगमध्ये आशुचीही गाडी लागलेली दिसली. रोज सात नंतर येणारी आशुही आज लवकर आलीये की काय! मला प्रश्न पडला. मी सिक्युरिटीवाल्याला विचारलं,
``आशू madamही आल्यात का?``
``हो साहेब. आत्ताच! पाचच मिनिटं झाली असतील.``