” एलिना…. यु आर माय स्विटी पाय… “
” या … आय नो…. पण तु आज माझ्यासाठी काय आणलंस…? ”
” व्हाय ? आय मिन … माय हार्ट इज युअर्स…. ”
” स्टॉप फ्लर्टिंग… स्टॉप धीस नॉनसेंस… “
” मग ? काय झालं ? आज काय स्पेशल आहे…?
” यु फॉरगॉट नो… डोंट टॉक टु मी …. ”
” अरे यार….! काय झालं सांग ना…. प्लीज… “
ठक…. ठक… ठक….. ” तु दरवाजा का वाजवतेस….? “ ठक… ठक…. ठक…. “ ओह…. स्टॉप इट…. इट्स इरिटेटींग…..” ठक…. ठक…. ठक…. रॉड्रीकने कष्टाने डोळे किलकिले करत उघडले. समोर घराचं कौलारू छत दिसत होतं . सिलिंग fan त्याच्याच नादात फिरत होता . त्याने थोडी हालचाल केली अन डोक्यात साणकन एक तीव्र कळ गेली . “ ओह … ! ” कालचा हँगओवर ! तो तसाच डोकं धरून पडून राहिला . त्याने आजूबाजूला पाहिलं , बाजूच्या खुर्चीवर त्याची कालची जीन्स , शर्ट पडला होता . शूज तसेच कसेतरी पडले होते . पुन्हा एकदा दरवाजा ठोठावण्याचा आवाज झाला . हळुहळु त्याच्या लक्षात आलं की त्याला एलिनाचं गोड स्वप्न पडलं होतं . आणि त्यात ती दरवाजा वाजवत नव्हती तर, खरोखरच बाहेरुन कुणीतरी दरवाजा वाजवत होतं…. ठक…. ठक…. ठक…. आता आवाजाची तिव्रता वाढलेली होती. ‘ हु द हेल …! आयला… कोण आलंय सकाळी सकाऴी तडमडायला….? ‘ तो वैतागुन बिछान्यातुन उठला. ‘ माँट्या असेल तर पहीली त्याच्या कानाखाली खेचीन आणि मग त्याला आत घेईन… ‘ ह्या विचाराच्या तिरमीरीतच तो उठला. खाडकन दरवाजा उघडला. समोर पाहतो तर सॅम अंकल… !
” ओह अंकल …. ! गुड मॉर्निंग … ” त्याच्या आवाजाची पट्टी एकदम खालीच आली…
” गुड मॉर्निंग …? यु सी द सन आउट देअर …. इटस् गुड आफ्टरनुन रादर …. ! “सॅम अंकलनी त्याला वर बघायला लावलं.
” ओह…. सॉरी …. प्लीज कम इन…. ” वर सूर्याकडे बघितल्याने डोक्यात परत एक कळ उठली . सॅम अंकल आत आले.
” हाऊ लेजी यु आर रॉडी … ! तुझा डॅड अर्ली मॉर्निंग उठायचा… जॉग ला जायचा…. देन फुल डे हार्डवर्क…” सॅम अंकलनी आपली नेहमीची कॅसेट वाजवली. ते पुढे आणखी काय काय बोलणार हे रॉड्रीकला ठाऊक होतं तरी तो ऐकत होता. सॅम अंकल , रॉड्रीकच्या डॅडचे म्हणजेच जोसेफचे लहानपणापासुनचे मित्र … एकदम जिगरी दोस्त… वर्ण काळपट, गोल वाटोळा चेहरा , बसकं नाक, उंची बेताचीच … डोक्यावर फार पुर्वीपासुनच टक्कल पडल्याने ते नेहमी फेल्ट हॅट घालायचे. रॉड्रीकचे वडील दोन वर्षापुर्वी वारले. त्याची आई तर त्याच्या लहाणपणीच वारली होती. त्यामुळे वडिलांच्या मृत्यूनंतर तर तो अगदीच पोरका झाला . त्या भल्या मोठ्या , जुन्या व्हीलात रॉड्रीक आता एकटाच रहात असे. नाही म्हणायला सॅम अंकल अधुन मधुन यायचे. कितीही झालं तरी त्यांच्या जिगरी दोस्ताचा तो मुलगा, म्हणजे त्यांना त्यांच्या मुलासारखाच..! त्यांचाही जीव होता रॉड्रीक वर , आणि त्यांना त्याची काळजीही वाटत असे. त्यामुळेच ते अधुन मधुन आले की त्याला उपदेशाचे डोस पाजत असंत.
बराच वेळ त्यांची ती कॅसेट चालुच होती. आता रॉड्रीकला त्याचा कंटाळा आला. त्यांना मधेच त्याने विचारलं.
” अंकल आज इकडे कसे काय …? ”
” इकडे कसे काय म्हणजे ….? तुला विश करायला …. मेनी मेनी हॅपी रिटर्नस ऑफ दि डे माय सन… “ त्यांनी लहान मुलांचे ओढावेत तसे रॉड्रिकचे गाल ओढले .
” ओह… थँक्स् अंकल… व्हॉट वुड यु लाईक …. टी ऑ कॉफी …? “ ओढलेला गाल चोळत रॉड्रीक म्हणाला .
” एनीथिंग यु लाईक …. आफ्टऑल इट्स योर बड्डे… “
” ओके, कॉफी करतो… ”
खरं तर रॉड्रीकला थोडी वाईन घ्यायची होती , पण हे अंकलना सांगायची सोय नव्हती . कालचा हँगओवर अजुन उतरला नव्हता. डोक्यावर कुणीतरी हातोडे मारतंय असंच वाटत होतं . तो आत किचनमधे गेला . सॅम अंकल सोफ्यावर रेलुन बसले . घरात आजूबाजूला पाहिलं , बराच पसारा झालेला दिसत होता . नकारार्थी मान हलवत त्यांनी डोक्यावरची फेल्ट हॅट काढून बाजूला ठेवली . उन्हातून चालून आल्याने त्यांना गरम होत होतं . त्यांनी वर पाहिलं , सिलिंग fan फिरून फिरून दमल्यासारखा धापा टाकल्यासारखा फिरत होता . त्याची त्यालाच हवा लागत नसावी . सॅम अंकलनी हात लांब करून बाजूचा टेबलावरचा पंखा लावला . त्याचा वारा अंगावर आल्यावर त्यांना बरं वाटलं . हुश्श … करत ते तसेच बसले थोडा वेळ . काय करावे असा विचार करत असतानाच समोर पडलेला कालचाच पेपर वाचायला घेतला. रॉड्रीकने फ्रीज मधून दुध काढलं आणि कॉफी बनवायला घेतली .
” अंकल शुगर….? ” रॉड्रीक आतुनच विचारत होता.
” २ स्पुन …. ” सॅम अंकलना गोड आवडायचं. थोड्या वेळातच रॉड्रीक वाफाळणारे दोन कॉफीचे मग घेऊन आला. एक अंकलच्या हातात दिला.
“ थँक्स् माय सन … “
त्यांनी पहीला घोट घेतला…. ” हं….. हेवन…., रॉड्रीक, तु एखादं रेस्टॉरंट का काढत नाहीस…. ” त्यांनी मुक्तकंठाने त्याची स्तुती केली . त्यावर तो नुसताच हसला. “ नो , आय मीन इट . तुझ्या हाताला खरंच चव आहे . “ सॅम अंकल चव घेऊन कॉफी पिऊ लागले . थोडा वेळ तसाच शांततेत गेला. काय बोलावं ते रॉड्रीकला कळेना. वडीलधाऱ्या माणसांशी बोलण्याचा तसा त्याच्यावर प्रसंग फारसा आलाच नाही. त्याच्या वडीलांशीही तो फारसा बोलत नसे. जनरेशन गॅप…! पण सॅम अंकलनीच बोलायला सुरुवात केली.
” आज जोसेफची फार आठवण येते. माय चाइल्डहूड फ्रेंड . अँड व्हेरी टेलेंटेड पर्सन . ब्रिलीयंट … ! ही कुड हॅव ऍज वेल बीन अ सायंटीस्ट ! काय काय गझेट बनवायचा … ! यु कान्ट इमाजीन … तुझ्यावर फार जीव होता त्याचा… तुझी काळजी वाटायची त्याला. यु आर डायरेक्टली ओपोजीट टु हिम. तु नीट शिकला नाहीस, दारु , सिगरेटी पितोस… काही काम करत नाहीस . असं तो नेहमीच सांगायचा. “
त्यांनी एकवार रॉड्रीककडे पाहीलं. तो मान खाली घालुन उभा होता. आपण जरा जास्तच स्पष्ट बोललो कि काय असं त्यांना वाटलं असावं . ते थोडा वेळ थांबले . नंतर समजावणीच्या सुरात ते रॉड्रीकला म्हणाले ,
” लुक सन…. आय ऍम नॉट योर फादर…. पण काळजी वाटते म्हणुन बोलतो . जोसेफने मरताना मला तुझी काळजी घ्यायला सांगितलं होतं . आता तू २७ इयर्सचा झालास . मी हे बोलतोय त्याचा तुला राग तर आला नाही ना ….?
” ऑफकोर्स नॉट अंकल … तो तुमचा हक्कच आहे… ” रॉड्रीक प्रथमच त्यांच्याकडे पहात बोलला. सॅम अंकल नुसते हसले…
” यु आर गुड पर्सन… तु प्रोग्रेस करत रहावास असं मला वाटलं म्हणुन बोललो. नाहीतर म्हणशील की सॅम अंकल नेहमी लेक्चर देतात…. ” असं म्हणुन ते स्वतःच हसायला लागले. रॉड्रीकच्याही चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली….
“ ओके नाऊ टेल मी तुझा जॉब कसा चालू आहे ? “ सॅम अंकलनी विषय बदलला .
“ आय …. लेफ्ट माय जॉब अंकल “ रॉड्रिकने अडखळत उत्तर दिलं .
“ व्हॉट … ? यु लेफ्ट द जॉब ? व्हाय ? “
“ आय डोंट लाईक दि एटमोस्फीयर . “ रॉड्रीकने तोंड वाकडं करत उत्तर दिलं .
“ एटमोस्फीयर … ? “ सॅम अंकलना काही समजेना .
“ आय मीन … आय डोंट लाईक दि पिपल आउट देअर . “
“ यु डोंट लाईक पिपल ? व्हॉट आर यु सेईंग ? “
“ अंकल , तुम्हाला नाही समजणार . आय डोंट वाँट टु टॉक ऑन द्याट . लिव इट . “ असं म्हणून त्याने तो विषय मधेच तोडला . सॅम अंकलनेही पुढे जास्त काही विचारलं नाही .
“ ओके , मग दुसरा जॉब बघतोयस का ? माझा एक फ्रेंड मोठ्या कंपनीत मँनेजर आहे , त्याच्याकडे मी तुझ्यासाठी शब्द टाकू शकतो . “
“ नो थँक्स् अंकल , आय विल मॅनेज . “ रॉड्रिक असं म्हणाला त्यामुळे सॅम अंकल पुढे काहीच पर्याय उरला नाही. ते तसेच काही वेळ बसून राहिले . आता आणखी काय बोलणार ? असा विचार त्यांनी केला .
” ओके देन…. बाय…. मी निघतो आता. एन्जॉय योर डे . ” असं म्हणत सॅम अंकल उठले आणि जायला निघाले. दरवाज्यापर्यंत गेले, आणि थांबले.
” अर्र्… बघ …ज्या कामासाठी आलो होतो ते तर केलंच नाही… ”
” कोणतं काम अंकल…? “
” अरे तुझ्या डॅडने माझ्याकडे एक एन्व्हलोप दिला होता मरण्यापुर्वी…. मला बोलला की रॉड्रीकच्या ट्वेन्टी सेवेन्थ बड्डे ला दे. त्याच्या आधी देऊ नको. स्ट्रेंज नो …? तुझा डॅड पण साला मिस्टीरीयसच होता…. ” असं म्हणुन त्यांनी एक पांढऱ्या रंगाचा लिफाफा रॉड्रीकच्या हातात दिला. तो बराच मळलेला दिसत होता. म्हणजे खरंच तो बऱ्याच दिवसांपुर्वी सॅम अंकलना दिला असला पाहीजे, रॉड्रीकने विचार केला.
” काय आहे त्यात अंकल ….? ”
” हाऊ वुड आय नो …? हा एन्व्हलोप तुझ्या डॅडने तुझ्यासाठी दिला होता… सो हाऊ कुड आय ओपन धिस…? ”
सॅम अंकल म्हणत होते ते खरंच होतं. तो एन्व्हलोप आधी फोडुन नंतर पुन्हा चिकटवल्याच्या अशा कोणत्याही खुणा त्यावर दिसत नव्हत्या. सॅम अंकल ह्याबाबतीत प्रामाणिक होते . आणि त्याच विश्वासाने रॉड्रीकच्या डॅडने त्यांना हा लिफाफा त्यांच्याकडे सोपवला होता.
” ओके देन …. धिस इज युअर …. व्हॉट यु कॅन कॉल्ड …. हां…. अमानत…. धिस इज युअर अमानत. गॉड ब्लेस यु माय सन… ” म्हणत सॅम अंकल निघुन गेले. रॉड्रीक समोर पडलेल्या त्या एन्व्हलोपकडे पहात राहीला…. ‘ ज्या अर्थी डॅडने हा एन्व्हलोप सॅम अंकलकडे दिला होता त्या अर्थी त्यात खुप काही महत्वाचं असलं पाहीजे …. ‘ बराच वेळ तो उघडण्याचं त्याला धाडस होईना. शेवटी त्याने मनाचा हिय्या करुन तो उघडला. त्यात एक चार पानी पत्र होतं आणि अर्थातच रॉड्रीकच्या नावे …! ते पत्र तो जसजसा वाचत गेला तसतसा त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडत गेला. शेवटचं वाक्य होतं, ” आय होप, दॅट १० रुपीज् नोट इज स्टील विथ यु…. “
क्रमशः
माझी वेबसाईट -
https://kathakadambari.com
लडाखचे प्रवासवर्णन
Ladakh Bike Trip – दुचाकी लडाखायण 1
माझी अर्धदशक नावाची कादंबरी वाचण्यासाठी खाली लिंक दिली आहे
https://www.mehtapublishinghouse.com/book-details/ARDHADASHAK/3048.aspx
Amazon link
https://www.amazon.in/Ardhadashak-Milind-Mahangade/dp/9353174163/ref=sr_...
Flipkart Link
https://www.flipkart.com/ardhadashak/p/itm7149b4896e81d?pid=978935317416...
वाचतोय
वाचतोय, दोन्ही भाग आवडले.
फिल्मी होणार आहे असं दिसतंय.
फिल्मी होणार आहे असं दिसतंय.
पण वाचणार
धन्यवाद
धन्यवाद
मस्त हा भाग पण !
मस्त हा भाग पण !
मस्तच.. दोन्ही भाग आवडले..
मस्तच.. दोन्ही भाग आवडले.. मला माझ्या बांद्रा ईस्टच्या ख्रिस्ती फ्रेंड्सची आठवण आली
बांद्रा वेस्ट ३ पण टाकला होता
बांद्रा वेस्ट ३ पण टाकला होता ना? मगाशी बघितला होता, थोड्या वेळाने वाचेन म्हटलं तर आता गायब झाला आहे!
btw दोन्ही भाग आवडले!
छान वाचते आहे दोन्हीं भाग
छान वाचते आहे दोन्हीं भाग आवडले
वाचतेय...
वाचतेय...
मस्तच! पुभाप्र..
मस्तच! पुभाप्र..