अवतार घ्यावा रामराया
श्रीराम जन्मभूमी भूमिपूजनानिमित्त-
अवतार घ्यावा रामराया
क्रूर कोरोनासूरा वधाया
अवतार घ्यावा रामराया
नाही त्राण अंगी रघुराया
जगणे झाले नित्य लढाया
सर्व मिळून करू लढाई
बळ आम्हास दे रघुराई
विनंती असे तुमच्यापायी
सर्व मानवा यश तू देई
मातला कोरोना जनीवनी
गांभीर्य ना समजे कुणी
अज्ञ मानवा बुद्धी द्यावी
जमाव करती गावोगावी
पसरव जगती सुखछाया
कौसल्यसुता पडतो पाया
कोरोनासूर नष्ट कराया
अवतार घ्यावा रामराया