।।विहीर तुडुंब।। (अलक कथा) Submitted by mi manasi on 22 August, 2020 - 13:24 ।।विहीर तुडुंब।। (अलक कथा) भुकेली, तहानेली ती त्या अनोळखी गावांत आली. जवळंच तिला एक जुनी विहीर दिसली. पाणी पहाण्यासाठी ती आंत डोकावली. आणि पडली ती तिथेच राहीली. आता ती विहीर बाराही महिने... तुडुंब भरलेली असते. लोक म्हणतात "देव पावला!" मी मानसी... विषय: साहित्यगद्यलेखनशब्दखुणा: विहीरअलककथा