।।मेलेलं कोंबडं।।
(भाग ४)
दार लावून सुहास वळला. त्याने खांद्याला धरून जुईला कॉटवर बसवलं. आणि तिचे दोन्ही हात हातात घेत म्हटलं ...
"जुई डोळे बंद कर!"...जुई पुन्हा एकदा थरथरली...
"हं! आता उघड!"...
जुईने डोळे उघडले. सुहासने तिच्या हातावर पाचशेच्या बऱ्याचशा नोटा ठेवलेल्या होत्या...जुईने अंदाज बांधला... पंचवीस-तीस हजार असतील...
"हा माझा पहिला पगार जुई! हुं!.. पण आता कदाचित शेवटचाही ठरू शकतो”...सुहासने भावूक निवेदन करून पाहिलं...
।।मेलेलं कोंबडं।।
भाग ३
आठ महिन्यापूर्वीचा तो दिवस तिच्या डोळ्यात उतरला...
त्या दिवशी निलेशने सुहासला स्वतः तिच्या मोबाईलवरून फोन करून चार वाजता घरी भेटायला बोलावलं होतं. पण सुहास सहा वाजले तरी आला नाही. तेव्हाच जुईच्या काळजाचा ठोका चुकला होता. वहिनी आधीच आरोहीला-त्यांच्या मुलीला घेऊन माहेरी गेली होती. कदाचित निलेशने तिला मुद्धामच पाठवलं होतं...
निलेशचा पारा चढलेला होता. गेली पाच वर्षं जुई सुहासला भेटत होती आणि त्याला मात्र ते आत्ता कळलं होतं... तेही लोकांकडून...
"मैत्र"
तुला मी, मला तू
किती जपलंय आजवर
मनांत तेच रुजलंय
खुप खुप खोलवर ।।
सदा त्याचा बहर
मनांत असा खुलतो
तुला आणि मला
दोघांनाच तो कळतो ।।
... ...मी मानसी
येणारं नविन वर्ष २०२० सगळ्यांना "सुखाचं आनंदाचं जावो" ही सदिच्छा!!!
"तुझ्याविना"
उगाच हे नसूनही, दिसायचे असायचे
तुझ्याविना कसे कसे, जगायचे उरायचे !!
मनीच भाव आतले, जरा जरा जपायचे
हळूच पापणीतले, दुःखही पुसायचे !!
नवेच काही लाडके, तुझ्यापरी नसायचे
तरीहि दंगदंगुनी, फुलात फुल व्हायचे !!
रंग जीवनातले, जाहले फिकेफिकें
खुळेच श्वास चंदनी , स्मरायचे, भरायचे !!
..... मी मानसी