Submitted by Asu on 22 July, 2020 - 05:15
जमाखर्च
नफा-तोटा नको मोजूया
नाही फायदा त्यात काही
सरणावर जातांना अंतिम
जमाखर्च हा शून्य होई
राग लोभ मद मोह मत्सर
सोडून द्यावे जगता सत्वर
असे जगावे आयुष्य खास
प्रेमाचा फक्त जिथे सहवास
सुखास कधी नसावा तोटा
दुःखात नसावा कुणास वाटा
आयुष्य असे असेल कोठे!
शोधण्या आयुष्य पडेल थिटे
लखलाभ कुणा जीवन असले
लाभाविना हे जगणे कसले ?
माणूस ना सद्गुणांचा पुतळा
दुर्गुणाविना ना माणूस कुठला
नफा-तोटा, नुकसान-फायदा
जगण्याचाच हा असे कायदा
एकदुजा विना अस्तित्व कोठे
जगणे दोघांविन रे खोटे खोटे
-प्रा.अरूण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
(दि.22.07.2020)
https://www.facebook.com/AsuChyaKavita
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुंदर कविता..
सुंदर कविता..
मस्त
मस्त
धन्यवाद!
धन्यवाद!