जमाखर्च

जमाखर्च

Submitted by Asu on 22 July, 2020 - 05:15

जमाखर्च

नफा-तोटा नको मोजूया
नाही फायदा त्यात काही
सरणावर जातांना अंतिम
जमाखर्च हा शून्य होई

राग लोभ मद मोह मत्सर
सोडून द्यावे जगता सत्वर
असे जगावे आयुष्य खास
प्रेमाचा फक्त जिथे सहवास

सुखास कधी नसावा तोटा
दुःखात नसावा कुणास वाटा
आयुष्य असे असेल कोठे!
शोधण्या आयुष्य पडेल थिटे

लखलाभ कुणा जीवन असले
लाभाविना हे जगणे कसले ?
माणूस ना सद्गुणांचा पुतळा
दुर्गुणाविना ना माणूस कुठला

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - जमाखर्च