Submitted by निलेश वि. ना. शेलोटे on 21 July, 2020 - 15:43
चंद्रास तारे खुपले असावे
त्याने नभाला लुटले असावे
अंधार आला नशिबात जेव्हा
माझेच काही चुकले असावे
अर्ध्यात जाते पलटून बाजी
अंदाज सारे हुकले असावे
सोसून होतो भरपूर दुःखे
सोसून थोडे सुटले असावे
हासून गेलो भरताच डोळे
काही तळाशी रुतले असावे
देतो कसे मी भलते बहाणे
काही नवे ना सुचले असावे
मूर्तीत यंदा दिसते न आभा
वारीस कोणी मुकले असावे
गा रे निलू तू दमदार त्यांना
त्रासून जेही झुकले असावे
निलेश वि. ना. शेलोटे
वृत्त :- इंद्रवज्रा
( गागा लगागा ललगाल गागा )
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा