सावरकर साहित्य या नावाने एक धागा असावा असं मला गेल्या दोन-तीन दिवसांपासून फारच वाटत होतं. मी फार काही बोलणार नाहिये कारण या धाग्याच नाव ‘क्रांतिवीर सावरकर’, ‘स्वातंत्र्यवीर’, ‘क्रांतिकारकांचे शिरोमणी’ वा ‘सावरकर एक धगगगते यज्ञकुंड’ असं काहीही नाहीये.
मी सोलापूरच्या ज्ञान प्रबोधिनीचा माजी विद्यार्थि असल्याने माझ्यावर हिंदुत्त्वाचे संस्कार फार लहानपणापासून झाले!! शिशु वर्गात जरी अॅडमीशान झाली तरी तेव्हापासून आम्ही ‘प्रे’ करत नव्हतो, तर ‘प्रार्थना’ च करत होतो.इंग्रजी ही भाषा पाचवी पासून होती हे मला चांगल आठवतय. आणि पाचवी पासून ची प्रार्थना जी संध्याकाळी ‘दल’ (खेळण्याचा तास) संपलं की मैदानावरच व्हायची! तेव्हा वाटायच ही कसली गजब प्रार्थना आहे...
की घेतले व्रत न हे
आम्ही अंधतेने
लब्धप्रकाश इतिहास निसर्गमाने
जे दिव्य, दाहक म्हणुनी असावयाचे
बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे॥
मला आठवीत असताना कळालं की या ओळी सावरकरांच्या मृत्युपत्रातील आहेत. कोण असं जगावेगळ मृत्युपत्र करतो स्वत:च?? सावरकरानंतर कोणाची लेखणी व्यायली नाहीच पण सावरकरांच्या आधिही कोणाची लेखणी इतकं तेज व्यायलेली नव्हती!
आमच्या शाळेची अंडरग्राऊंड एक लायब्ररी होती. @च्रप्स ना माहीत असेल. आठवत असेल. मी लहानपणी छोटी पुस्तकेच वाचायचो आणी मोठी पुस्तके कधी तरीच घ्यायचो ते ही ‘वाचकवीर’ या नावाची स्पर्धा होती म्हणून. वाचायचो तर नाहीच फक्त पाने वाढायची माझ्या नावापुढे.
मी तेव्हा एका शेल्फाच्या सगळ्यात खालच्या कप्प्याकडे खूपदा कुतुहलाने बघायचो. कारण... कारण त्या अख्या कप्यात फक्त सात पुस्तके होती! साधीसुधी नव्हती ! नावच “समग्र सावरकर खंड 1-7” ओळीत असायची. बरीच जाडजुड. पण मला लेखक माहीत नाही… कारण कधीच हातात घेतला नाही... एकही खंड... हातात घेतला नाही.
विस्तव च तो आणि त्या विस्तवाला आपलस करून, आपल्या हातावर घेऊन मेंदूत ओढून घ्यायची ताकद मी अजूनही आणू शकलो नाहीये. आज जे काही मतिभ्रष्ट आणि लाळपुशे लोक सावरकरांना माफिवीर बोलतात. माफिवीर हे म्हणाण्याआधी आपलं कतृत्व केवढ आहे हे बघावं... सरड्याची धाव कुंपणापर्यंतच!!
मदनलाल धिंग्रा सारख्या सुखासीन, परप्रांतिय युवकाला सावरकरांच्या भाषणातील शब्दन शब्द विल्यम कर्झन वायली या ब्रिटीश अधिकार्याचा वध करायला भाग पाडतो. तर आपली भाड्याच्या रायटर्सनी लिहीलेली भाषणे आणि पैसे देऊन सभेसाठी गोळा केलेली लोकं यावरूनच कतृत्व लक्षात घ्यावं!!
असो, सावरकर नावाचा यज्ञ अखंड धगधगत राहीलच जोवर हिंदुस्थान राहील. आज या यज्ञाला मी देखील माहितीरूपी पुष्प वाहू इच्छितो!
मी फेसबुक वर दोन वर्षांखाली सावरकर पुण्यतिथी निमित्त एक लेख लिहीला होता. आणि या पुण्यतिथीला देखील एक चारोळी केली होती. त्यापासूनच सुरूवात करतो...
लक्षदीप चेतवूनी
शतकानुशतके उरतो
तेजोनंदन, सावरकर होऊनी
क्रांतिसूर्य असाध्वस तळपतो
हे असयं नुस्त सावरकर हे नाव जरी घ्यायचं झाल तरी ओघाओघाने दोन तीन पाने त्यापाठोपाठ लिहिली जातातच.
स्वातंत्र्यवीरांनी लिहीलेलं असो वा स्वातंत्र्यवीरांवर लिहीलं गेलेलं असो!!
जे काही असेल ते आपण सामायिक करावत!
नाटके:-
संगीत सन्यस्त खड्ग
नाट्यपदे: 1) जा जा न वचना
2) नसे जीत पहा सेनानी
3) प्रिया घे निजांकी जाता
4) समयी सखा न ये
5) सुकतातची जगी या
6) शत जन्म शोधितांना (भैरवी)
आणि नागपूरच्या शंकर बाळाजी शास्त्री यांनी सावरकरांच्याच खास शैलित, सावरकरांच्या अनुमतिने लिहीलेलं गाणं. नाटकात सुलोचनेच्या तोंडी हे पद आले आहे ते पद म्हणजे “मर्मबंधातली ठेव ही”! कमालीचे अस्वस्थ करते!!
संगीत उ:शाप आणि संगीत संगीत उत्तरकळा यातील पदे मला ज्ञात नाहीत. कपया वाचकांपैकी कुणाकडे असतील वा कुणाला माहिती असतील तर सामायिक करावीत ही विनंती!
याशिवाय मला काही पद्यं माहिती आहेत.
1) जय देव जय देव जयजय शिवराया (महाराजांची आरती)
2) जयोSस्तुते
3) सागरा प्राण तळमळला
4) हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजी राजा
मी दोन वर्षांपूर्वी काळे पाणी वाचलं होतं. वाचायच्या आधी एक अणूभरही मला कल्पना नव्हती की काळे पाणी ही “लव्ह स्टोरी” असेल!! वाचून पुढचे दोन आठवडे बैचेन होतो... आणि एकच वाक्य लिहीतो
‘काळे पाणी’ वाचलेले कोणीही, युवक अथवा युवती उद्या आपल्या लेकीचं नाव ‘मालती’ ठेवायला धजावणार नाहीत!!
एक लेखक आणि कवी म्हणूनही सावरकर वरचढच!! काळे पाणी मध्ये काय कमालीचा रोमान्स(रोमान्स साठीचा मराठी शब्द विसरलो क्षमस्व) आणि त्याच कमालीचं कारूण्य !!
दुसरं पुस्तक जे माझ्याकडे आहे ते म्हणजे ‘1857 चे स्वातंत्र्यसमर’
पण अजून पुर्ण वाचून झालेलं नाहीये.
मी लहान असताना आईच्या माहेरी गेल्यावर मला माझ्या मामाने कपाटातल्या एका कप्यात ‘1857 चे स्वातंत्र्यसमर’ या ग्रंथाच्या काही कॉपीज दिसल्या होत्या(7-8 असतील). मी फक्त कपाट उघडलं जायचं तेव्हा बघायचो. कालांतराने कॉपीज ची संख्या कमी होताना दिसली...जेव्हा चारच उरलेल्या दिसल्या... त्या दिवशी मी अक्षरश: त्यातील एका कॉपीची भिक मागितली अगदी कळवळून! माझं वय तेव्हा 11 वर्षं असेल... आजोबा लगेच म्हणाले अरे! ते पुस्तक मोठ्या माणसांसाठी आहे. पण मी ऐकतच नव्हतो... मला ‘1857 चे स्वातंत्र्यसमर’ या पुस्तकाबद्द्ल त्या वयात काडीचीही ही कल्पना नव्हती... पण त्या जाड पुस्तकाच्या उभ्या पट्टीवर सावरकरांच नाव स्पष्टपणे दिसत होतं. आणि म्हणूनच मी ते मागत होतो.
ज्या वस्तूवर “विनायक दामोदर सावरकर” हे नाव असेल ती प्रत्येक वस्तू माझ्याकडे असावी असं मला त्या वयात देखील वाटायचं... आणि आता असं वाटतं की सावरकर नुसते समोर जरी आले तरी माझी छाती चिरून त्यातलं हृदय नावाचं काहीतरी बाहेर काढून त्यावर अंदमानच्या तुरुंगात असताना, तुरूंगातील भिंतींवर जे शब्द कोरले त्यासारखे काही शब्द कोरावेत!
निदान एक ‘सावरकरप्रेमी’ म्हणून तरी!! त्यानंतर लगेच आयुष्यही लगेच संपावं अगदी सहज....“क्षण तो क्षणात गेला” या काव्य-पंक्तिसारखं...अगदी सहज!!
(मी लिहिलेला लेख माझ्या अल्पमतितुन आलेला आहे. वाचकांंनी नि:संकोच यथाशक्ति कॉमेंट्स मधून भर घालावी आणि या
लेखाला 'अग्रणी' हे उपनाम दिलं कारण मला सावरकरांबद्दल चा , किंवा त्यांच्या साहित्याबद्द्ल माहिती असलेला
धागा कुठेही मायबोलीवर सापडलेला नाहीये!)
लेख आवडला. आपण यात अजूनही भर
लेख आवडला. आपण यात अजूनही भर टाकू शकतो. उत्तुंग व्यक्तीमत्व. मलाही तुझ्यासारखाच / इतकाच आदर वाटतो.
माझ्याकडे 'सहा सोनेरी पाने' आहे.(अर्धेच वाचलेय) खूप दर्जेदार पुस्तक आहे. इतिहासाकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन मिळतो.
हा निमिता यांनी लिहिलेला लेख.
https://www.maayboli.com/node/74847
@मी_अस्मिता सजेस्टेड नोड
@मी_अस्मिता सजेस्टेड नोड वरचा निमीता यांचा लेख खूपच मस्त आहे अत्ताच वाचला.
मला शाळेत असताना अंदमान या विषयावर एक धडा होता. त्यात देखील सेल्युलर जेल च सेम टू सेम वर्णन आहे.
खूप खूप धन्यवाद
अरे वा.. शाळेचे दिवस ताजे
अरे वा.. शाळेचे दिवस ताजे केलेत... धन्यवाद... सावरकरांच्या धाग्यावर विषयांतर नको म्हणून जास्त लिहत नाही त्याबद्धल...
सावरकरांचे सहा सोनेरी पाने हे पुस्तक मी माझ्या पहिल्या जॉब ला लागल्यानंतर बेंच वर आल्यानंतर वाचले होते... अप्रतिम पुस्तक... सावरकरांची जयोस्तुते जयोस्तुते अजूनही मोठं मोठ्याने गातो ... तेवढे मोटिवेश्नल काहीच नाही... अंगावर रोमांच येतात...
खूप छान लेख. रोमान्स - प्रणय.
खूप छान लेख. रोमान्स - प्रणय. माबोवर सावरकरभक्त भेटल्याबद्दल आज मी खूप आनंदी आहे.
@च्रपस खरच शाळा आणि देश
@च्रपस खरच शाळा आणि देश सोडल्यावरच त्यांची आठवण येते !
@किशोर मुंढे धन्यवाद सर ,
@किशोर मुंढे धन्यवाद सर , सावरकरांचा भक्त होणं हे साक्षात शिवाचा भक्त होण्यासारखं आहे अस मला वाटतं.
कारण दोघेही उग्र!!
पण मला स्वतः ची लाज वाटते की मी संघात भरती झालो नाही !