कवी अनिल
कवी अनिल,
कवी अनिल मला फक्त एकच माहिती होते. ज्यांनी 'त्या कोवळ्या फुलांचा' ही कविता लिहीलीय. पुढे या कवितेचं गाणं देखील झाल जे श्रीधर फडकेंनी संगितबद्ध केलं आणि गायले देखील. पण,
कवी अनिल,
कवी अनिल मला फक्त एकच माहिती होते. ज्यांनी 'त्या कोवळ्या फुलांचा' ही कविता लिहीलीय. पुढे या कवितेचं गाणं देखील झाल जे श्रीधर फडकेंनी संगितबद्ध केलं आणि गायले देखील. पण,
मला कुणी मोठ्ठं समजतच नाही
मी लहानाचा मोठ्ठा जसा झालोच नाही ||धृ||
अभ्यास कर अभ्यास कर सतत सांगता
निट लक्ष दे बोलतात उठता बसता
अभ्यास तर तो होतच असतो
त्याशिवाय का मी पास होतो?
तरी बोलतात तुला काही समजतच नाही ||१||
अभ्यासाच्या ताणातुन सुटकेसाठी
खेळ खेळणे चांगले आरोग्यासाठी
बोलणे हे खोटे आहे तुमचे सारे
कारण खेळ कोणते खेळावे ते तुम्हीच ठरवावे
अशाने ताण कधी कमी होतच नाही ||२||
सुरसुरी सुरसुरी सुरसुरी अरे सुरसुरी सुरसुरी सुरसुरी,
गरागरा फिरते, फराफरा जळते, भिर्रकन वळते,
अशी ही फिरकी, कशी घेते गिरकी, जणू गाय मारकी,
हिला पाहीलं की येते तरतरी,सुरसुरी सुरसुरी सुरसुरी
घेउन आग तनात, देउन वेग मनात, नेउन रग जनात,
भागन् भाग दानात्,घेतली राख पदरात,उद्याची जाग उदरात,
हिला पाहीले की वाटे फूरफूरी,सुरसुरी सुरसुरी सुरसुरी
इतरांच्या सुखासाठी स्वतः भस्म होते, अनंतात विलीन होते,
क्षणिक आनंदासाठी पेटून ती घेते, आठवण फक्त उरते,
हिच्यासमोर फिकी वाटे जरतारी, सुरसुरी सुरसुरी सुरसुरी
काय द्याचं बोला राव काय द्याचं बोला, कायदा टांगला खुंटीला,
लोणी खा टाळूवरचं, म्या नाय रडणार आतडं आतडं सोला,
नसलेल्या जमीनीला मिळतया कर्ज, लाच द्यायला नसली तर पडून राहतो अर्ज,
या रोगाला नसे मर्ज, म्या नाय रडणार आतडं आतडं सोला,
खालपासून वरपर्यंत पोखरला सगळा, डोळं मिटून मासा खातोय बगळा,
जितेपणी सतावून मेल्यावर काढती गळा,म्या नाय रडणार आतडं आतडं सोला,
कवी आशिष
झिंगलेल्या ह्या क्षणाना, पिंगलेल्या ह्या मनांना,
रंगलेल्या ह्या सणाना, श्वासात श्वास, भासात भास ,
आशेत आस, अडखळते, थोडी वळते, सळसळते,
उधारीची जिंदगी विसरून, थोडसं मूद्दामच घसरून,
द्यावं भोकाड पसरून, वेळात वेळ काढून्,मेळात
मेळ वाढून, स्मरणची गावे, मरण जगावे, कारण वदावे,
मस्तराम असो वा सुस्तराम, अगदी असला जरी झंडु बाम
चक्का झाला जरी जाम, सुस्तीत व्यस्त, वस्तीत सुस्त,
सगळं स्वस्त मस्त, जमा करावे, व्याज भरावे, शिलकीत उरावे....
कवी आशिष
आवरू कशी , मी झाली बावरूशी, अशी कशी,
प्रितीचा गंध ह्र्द्याशी, अनूबंध तूटले जगाशी, अशी मी कशी,
सैल झालं कशाशी, घालमेल उशाशी, अशी मी कशी,
प्रेमवीन होते उपाशी, साजणा आता अधाशी, अशी मी कशी,
गावं वाटे स्वर्गाशी, जावं वाटे ढगाशी, मी वेडीपिशी,
पाण्यात खोल डोहाशी, मनात ओल मोहाशी, वेशीपाशी,
कट्टी झाली नात्यांशी, मामा असो वा मावशी, गे माझे आवशी,
जीव जडला साजणाशी, श्वास जडला श्वासांशी, अशी मी कशी,
कवी आशिष
डिजे वाजे, वरात आली घोडीवर घोडा कसा साजे,
गल्लीमधले आम्ही ग बया राजे ताजे ताजे,
बाबा लगीन बाबा लगीन म्हणत होता नवरा,
उतावळा बाशिंग बाधूंन झाला कसा बावरा,
पोराला पोरगी साजे,आम्ही ग बया राजे ताजे ताजे,
फुलराणी सजून आली रडू आलं तिला,
अश्रूनी भिजवून गेली तिच्या आईबाबाला,
आता सगळे वाटे खुजे, आम्ही ग बया राजे ताजे ताजे,
कोकलून कोकलून आमचा घसा झाला कोरडा,
आयटम तेथे आली तेव्हा घातला किती ओरडा,
घामाने आता सगळे भिजे,आम्ही ग बया राजे ताजे ताजे,
कवी आशिष
छंद हवा मज छंद हवा नात्यांचा,
गंध हवा मज अनुबंध हवा प्रेमाचा,
कुणीतरी हवे ज्यास म्हणेन आपुले,
ह्र्द्यात केव्हापासून जिचे प्रेम जोपासले,
श्वास नवा मज आभास नवा,
छंद हवा मज छंद हवा,
भरलेल्या घरातही वाटते आता एकटे,
उरलेल्या आयुष्यात कोण येइल दुकटे,
बदलले वेग आता बदलली हवा,
छंद हवा मज छंद हवा,
कधीतरी कल्पनेतून समोर उभी टाक ना,
तुझा हा तोरा सोडून ह्र्द्यात माझ्या झाक ना,
गडी नवा अन राज्य नवा,
छंद हवा मज छंद हवा,
कवी आशिष