डिजे वाजे

Submitted by Poetic_ashish on 14 September, 2016 - 11:59

डिजे वाजे, वरात आली घोडीवर घोडा कसा साजे,
गल्लीमधले आम्ही ग बया राजे ताजे ताजे,

बाबा लगीन बाबा लगीन म्हणत होता नवरा,
उतावळा बाशिंग बाधूंन झाला कसा बावरा,
पोराला पोरगी साजे,आम्ही ग बया राजे ताजे ताजे,

फुलराणी सजून आली रडू आलं तिला,
अश्रूनी भिजवून गेली तिच्या आईबाबाला,
आता सगळे वाटे खुजे, आम्ही ग बया राजे ताजे ताजे,

कोकलून कोकलून आमचा घसा झाला कोरडा,
आयटम तेथे आली तेव्हा घातला किती ओरडा,
घामाने आता सगळे भिजे,आम्ही ग बया राजे ताजे ताजे,

कवी आशिष

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users