झिंगलेल्या ह्या क्षणाना

Submitted by Poetic_ashish on 14 September, 2016 - 12:40

झिंगलेल्या ह्या क्षणाना, पिंगलेल्या ह्या मनांना,
रंगलेल्या ह्या सणाना, श्वासात श्वास, भासात भास ,
आशेत आस, अडखळते, थोडी वळते, सळसळते,

उधारीची जिंदगी विसरून, थोडसं मूद्दामच घसरून,
द्यावं भोकाड पसरून, वेळात वेळ काढून्,मेळात
मेळ वाढून, स्मरणची गावे, मरण जगावे, कारण वदावे,

मस्तराम असो वा सुस्तराम, अगदी असला जरी झंडु बाम
चक्का झाला जरी जाम, सुस्तीत व्यस्त, वस्तीत सुस्त,
सगळं स्वस्त मस्त, जमा करावे, व्याज भरावे, शिलकीत उरावे....

कवी आशिष

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users