कवी अनिल

Submitted by प्रगल्भ on 16 July, 2020 - 01:26

कवी अनिल,
कवी अनिल मला फक्त एकच माहिती होते. ज्यांनी 'त्या कोवळ्या फुलांचा' ही कविता लिहीलीय. पुढे या कवितेचं गाणं देखील झाल जे श्रीधर फडकेंनी संगितबद्ध केलं आणि गायले देखील. पण,

काल रात्री इंटरनेट चा बराच कोटा उरला होता. मी रोजचे कोर्सेस, लेक्चर्स, वेबिनार संपले की रात्री आठ साडेआठ पासून उरलेल्या नेट मध्ये वेगवेगळ्या वेब सिरीज चे एपिसोड्स डाऊनलोड करत असतो आणि सगळे एपिसोड्स डाऊनलोड करून झाले की मी एकाच दिवसात बघत असतो.
तर, सवयीनुसार काल देखील हेच करणार होतो पण का कुणास ठाउक मी काल कुमारजींबद्दल (कुमार गंधर्व) वेब , युट्युब सर्फिंग करत होतो.
आणि माझ्या हाती एक गाणंं लागलं! दुर्दैवाने ते कोणत्या चित्रपटातील आहे हे अजूनही मला कळलेले नाही. पण ते गाणे चित्रपटासाठीच शूट केलेले आहे हे नक्की! त्या गाण्यात श्रीराम लागू त्यांच्या पार्टनर नटीसोबत एका मैफिलीत कुमारजींना ऐकत आहेत. आणि त्या दोघांमधे एक छोटी मुलगी बसली आहे 7-10 वर्षातील असेल. ती उर्मिला मारतोडकर(आडनाव कसं लिहीतात माहीत नाही क्षमा असावी) आहे.
गाणंं होत "आज अचानक गाठ पडे" --> https://www.youtube.com/watch?v=0dSTTUBbo0Q

हे गाण ऐकल्यावर मला काय वाटाल नक्कि हे सांगता येणार नाही पण खरच बैचेन झालो. आणि कुणाला तरी('तिला') शेअर करावस वाटल पण...मी ते केलं नाही!! काल झोपायला उशीरच झाला जरा. मोबाईल 38 टक्के चार्जिंग वर होता...मी एअरप्लेन मोड वर टाकला...अगदी बारीक आवाज (काहीच नाही पासून फक्त दोन वेळा आवाज वाढवायची पट्टि दाबली)... उशीखाली हे गाण व्हिडीओ सॉंंग लावून झोपलो...किती वेळा गाण किती तास रिपीट झालं असेल कल्पना नाही... सकाळी आईने उशीखालून मोबाईल काढला...मोबाईल डेड... चर्जिंग ला लावला तिने. मग मी आवरून झाल की या गाण्याच्या गीतकाराबद्द्ल शोधाशोध करू लागलो.
लिरीक्स खूपच भारावून टाकणारे आहेत ---> https://www.aathavanitli-gani.com/Song/Aaj_Achanak_Gatha_Pade

मग कवी अनिल यांच नाव आलं. मी विचार केला की हे कसं शक्य आहे? कवी अनिल तर आत्ताच्या काळातील आहेत. मग त्यांचा 'विकी' बघितला.
'आत्माराम रावजी देशपांडे'!!
मी यांची काही गाणी वसंतरावांच्या आवाजात ऐकलेली होती.
गाणं 1 ----> https://www.youtube.com/watch?v=1f_ZNTKLGRA

गाणंं 2 ---> https://www.youtube.com/watch?v=JTryvwRnLMc

गाणं 3 ---> https://www.youtube.com/watch?v=6WH71_fX40o

पण मी गीतकाराबद्द्ल जाणून न घेताच ऐकत होतो!!
पण आज वाचलच कवी अनिल यांच्याबद्दल.
यांच्या सगळ्या कविता मुक्तछंदातील होत्या.
पण काय ती काव्यशैली... डायरीत आजवर 25-26 कविता लिहिल्या तरी स्वत:ला कवी म्हणवून घेण्यास मी सर्वथैव नालायक आहे!
(यात कुठेही तुलना नाही फक्त आपण स्वत: अजून छोट्यातले छोटे आणि नर्मदेतील गोटे आहोत हेच अधोरेखित करायचं होतं)
असं मला प्रामाणिकपणे वाटलं यांच्या वरील गाण्यांचे लिरीक्स वाचल्यावर!
लिरिक्स वाचायचे असल्यास खालीलप्रमाणे
कुणी जाल का सांगाल का ----> https://www.aathavanitli-gani.com/Song/Kuni_Jaal_Ka
वाटेवर काटे वेचित चाललो ----> https://www.aathavanitli-gani.com/Song/Vatevar_Kate_Vechit
अजूनी रुसूनि आहे, खुलता कळी खुलेना ----> https://www.aathavanitli-gani.com/Song/Ajuni_Rusun_Aahe

कवी अनिल उर्फ आत्माराम रावजी देशपांडे यांच्या अजून काही कविता, गाणी मिळवण्याचा , ऐकण्याचा प्रयत्न करतोय. तरी वाचकांकडे काही माहिती, काही सल्ले हे ऐका, ते ऐका इ. असल्यास जरूर शेअर करावेत!!

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

"कवी अनिल आणि आमचे अत्यन्त घरोब्याचे संबंध होते. थोड्यावेळाने सविस्तर पोस्टतो.." ---> चालेल की
ऋणी राहीन आपला. वेगळा धागा काढून लिहिलंं तरी चालेल 'ललितलेखन' भागात, आवर्जून वाचेन. Happy

@ प्रगल्भ : मी माझा प्रतिसाद डिलिट च केला... तुम्हाला पर्सनल मेसेज करिन. उगा इतक्या थोरा-मोठ्या व्यक्ती शी फुकट जवळीक दाखवतो
असं कुणी म्हणायला नको Wink पण अप्पांविषयी मायबोली वर धागा आला पाहिल्यावर राहावलं गेलं नाही...

"थोरा-मोठ्या व्यक्ती शी फुकट जवळीक दाखवतो"---> मी तर इथल्या सगळ्या व्यक्तिंना ताई-दादा म्हणत होतो
परवा परवा पर्यंंत तर मला देखील 'नसती सलगी' दाखवली म्हणून बोलणी खावी लागली आहेत... हा! हा! हा!
आपण सविस्तर बोलू शकतो. मेल/ व्हॉट्स अ‍ॅप कुठेही
पण मला खरच कवी अनिल यांच्याबद्दल फार आत्मीयता वाटत आहे,
जर प्रेमात पडायला एक क्षण देखील पुरतो तर, आत्मियता वाटायला कवीचं एखाद गाणं पुरू नये?!!!!
nobinobita1857@gmail.com ---> एक मेल केलात तरी चालेल. मला अप्पांंविषयी जाणून घ्यायला आवडेल सर!

>> पण अप्पांविषयी मायबोली वर धागा आला पाहिल्यावर राहावलं गेलं नाही..<<
भाग्यवान आहांत. प्लीज लिहा या मनस्वी कवीच्या आठवणी...

त्यांच्या कवितेवर संगीतबद्ध केलेलं "केळीचे सुकले बाग"; हे एक आवडतं गाणं...

हे गीत चित्रपटात वापरलं आहे हे माहीत नव्हतं.

त्यांच्या कविता वाचल्यात. शाळेत कोंबडा ही कविता अभ्यासाला होती ती अजून लक्षात आहे.
त्यांच्या कवितांची झालेली गीतेही सुंदर आहेत.

मराठीत मुक्तच्छंद त्यांनीच आणला.

माझी स्मरणशक्ती दगा देत नसेल तर दशपदी हाही प्रकार रूढ केला.

कवी अनिलांचा "दशपदी" नावाचा काव्य संग्रह आहे. त्या काव्य संग्रहाला १९७७ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.

दशपदी हाही प्रकार रूढ केला. >> हो, दशपदी काव्य म्हणजेच फक्त दहा ओळींची कविता. एक प्रयोगशील कवी म्हणून अनिलांची ख्याती आहे.

"माझी स्मरणशक्ती दगा देत नसेल तर दशपदी हाही प्रकार रूढ केला."---> तुमचं बरोबर आहे भरत!! विकी मध्ये हे होतं पण मी अजून एकही दशपदी नाही वाचलीय :0

कोंबडा या कवितेच्या काही ओळी टाकल्यात तर दुधात साखर!!

प्रगल्भ, लेख ठीक ठाक आहे. पण अभ्यास थोडा कमी पडल्याचं जाणवतं.
यांच्या सगळ्या कविता मुक्तछंदातील होत्या. >>> असं नाहीये. अनीलांनी मुक्तछंद हा काव्यप्रकार रुढ केला. पण त्यांच्या खूप सार्‍या कविता यमक जुळवलेल्या, मीटरमधे बसणार्‍या आहेत. अगदी दशपदी मधल्या देखील.

"पण अभ्यास थोडा कमी पडल्याचं जाणवतं." ---> खूपच कमी पडलाय. मी फक्त विकी वाचलय. आणि अजून वाचन मिळावं यासाठीच हा धागा काढलाय Happy

चांगली माहिती प्रगल्भ

कवी अनिलांच्या पत्नी म्हणजे कुसुमावती देशपांडे बहुतेक.
त्यांचा दमडी नावाचा धडा होता शाळेत .

कोवळ्या फुलांचा बाजार पहिला मी > ही गजल अनील कांबळेंची आहे.
कवि अनिल म्हटले की मला 'तळ्याकाठी' ही खुप आवडती कविता आठवते..
पुढे देतोय.

अशा एखाद्या तळ्याच्या काठी
बसून राहावे, मला वाटते,
जिथे शांतता स्वत:च निवारा
शोधीत थकून आली असते

जळाआतला हिरवा गाळ
निळ्याशी मिळून असतो काही
गळून पडत असताना पान
मुळी सळसळ करीत नाही

सावल्यांना भरवीत कापरे
जलवलये उठवून देत
उगीच उसळी मारून मासळी,
मधूनच वर नसते येत

पंख वाळवीत बदकांचा थवा
वाळूत विसावा घेत असतो
दूर कोपर्‍यात एक बगळा
ध्यानभंग होऊ देत नसतो

हृदयावरची विचाराची धूळ
हळूहळू जिथे निवळत जाते
अशा एखाद्या तळ्याच्या काठी
बसून राहावे, मला वाटते!

– कवी अनिल

तपशीलाच्या बऱ्याच चुका झाल्यात तुमच्या लेखात. लिहिल्यावर एकदा तपासून मगच प्रकाशीत करत जा.
पुलेशु

गजल अनील कांबळेंची आहे. >> +1
कुणी जाल का त्यांचं आहे लक्षात न्हवत. आवडतं आहे एकदम.
' अजुनी रुसूनी आहे ' त्यांची पत्नी गेल्यावर सुचलेलं असं वाचलंय.

पुमबा, 'तळ्याकाठी' बद्दल धन्यवाद.

शाळेत व कॉलेजात अनिलांच्या कविता अभ्यासायला होत्या. आता आठवत नाहीयेत Happy . अनिल व कुसुमावती यांचा एकत्रित काव्यसंग्रह पण आहे बहुतेक.

"तपशीलाच्या बऱ्याच चुका झाल्यात तुमच्या लेखात. लिहिल्यावर एकदा तपासून मगच प्रकाशीत करत जा."----> कवी अनिल कांबळेंचा उल्लेख देखील 'कवी अनिल' असाच झाला होता निदान माझ्या समोर तरि! आणि आपण एकदा परत लेख वाचून बघावं. मी कुठेही बोललो नाहीये की 'त्या कोवळ्या फुलांचा' हे कवी अनिल उर्फ आत्माराम रावजी देशपांडे यांनी लिहीली आहे Sad
तस असत तर मला पहिलीच प्रतिक्रीया नकारात्मक मिळाली असती!!!आणि मी आधीच कबूल केलय मी फक्त 'विकी' वाचून आलोय कवी अनिल उर्फ आत्माराम रावजी देशपांडे यांचा!!
माफी असावी अर्धवट माहिती होती मला 'अनिल कांबळे' या संपूर्ण नावाबद्द्ल!

@भरत आपण बर्‍याच कवींच्या काव्यसंग्रहांची यादी दिली आहे.
आपण विसरलात का की हा धागा मुळात 'कवी अनिल' या नावाने आहे
'मराठी कवी' किंवा 'मराठी कविता', 'मराठी काव्यसंग्रह' या नावाने नाहीये Happy

"आभार. Post deleted"----> का केलीत डिलीट मी पाहीली देखील नव्हती ;(

"एंजॉय..." ----> @राज खूप खूप धन्यवाद Happy मी काल रात्री डाऊंलोड केली आहेत दोन्ही गाणी

Pages