कवी अनिल

Submitted by प्रगल्भ on 16 July, 2020 - 01:26

कवी अनिल,
कवी अनिल मला फक्त एकच माहिती होते. ज्यांनी 'त्या कोवळ्या फुलांचा' ही कविता लिहीलीय. पुढे या कवितेचं गाणं देखील झाल जे श्रीधर फडकेंनी संगितबद्ध केलं आणि गायले देखील. पण,

काल रात्री इंटरनेट चा बराच कोटा उरला होता. मी रोजचे कोर्सेस, लेक्चर्स, वेबिनार संपले की रात्री आठ साडेआठ पासून उरलेल्या नेट मध्ये वेगवेगळ्या वेब सिरीज चे एपिसोड्स डाऊनलोड करत असतो आणि सगळे एपिसोड्स डाऊनलोड करून झाले की मी एकाच दिवसात बघत असतो.
तर, सवयीनुसार काल देखील हेच करणार होतो पण का कुणास ठाउक मी काल कुमारजींबद्दल (कुमार गंधर्व) वेब , युट्युब सर्फिंग करत होतो.
आणि माझ्या हाती एक गाणंं लागलं! दुर्दैवाने ते कोणत्या चित्रपटातील आहे हे अजूनही मला कळलेले नाही. पण ते गाणे चित्रपटासाठीच शूट केलेले आहे हे नक्की! त्या गाण्यात श्रीराम लागू त्यांच्या पार्टनर नटीसोबत एका मैफिलीत कुमारजींना ऐकत आहेत. आणि त्या दोघांमधे एक छोटी मुलगी बसली आहे 7-10 वर्षातील असेल. ती उर्मिला मारतोडकर(आडनाव कसं लिहीतात माहीत नाही क्षमा असावी) आहे.
गाणंं होत "आज अचानक गाठ पडे" --> https://www.youtube.com/watch?v=0dSTTUBbo0Q

हे गाण ऐकल्यावर मला काय वाटाल नक्कि हे सांगता येणार नाही पण खरच बैचेन झालो. आणि कुणाला तरी('तिला') शेअर करावस वाटल पण...मी ते केलं नाही!! काल झोपायला उशीरच झाला जरा. मोबाईल 38 टक्के चार्जिंग वर होता...मी एअरप्लेन मोड वर टाकला...अगदी बारीक आवाज (काहीच नाही पासून फक्त दोन वेळा आवाज वाढवायची पट्टि दाबली)... उशीखाली हे गाण व्हिडीओ सॉंंग लावून झोपलो...किती वेळा गाण किती तास रिपीट झालं असेल कल्पना नाही... सकाळी आईने उशीखालून मोबाईल काढला...मोबाईल डेड... चर्जिंग ला लावला तिने. मग मी आवरून झाल की या गाण्याच्या गीतकाराबद्द्ल शोधाशोध करू लागलो.
लिरीक्स खूपच भारावून टाकणारे आहेत ---> https://www.aathavanitli-gani.com/Song/Aaj_Achanak_Gatha_Pade

मग कवी अनिल यांच नाव आलं. मी विचार केला की हे कसं शक्य आहे? कवी अनिल तर आत्ताच्या काळातील आहेत. मग त्यांचा 'विकी' बघितला.
'आत्माराम रावजी देशपांडे'!!
मी यांची काही गाणी वसंतरावांच्या आवाजात ऐकलेली होती.
गाणं 1 ----> https://www.youtube.com/watch?v=1f_ZNTKLGRA

गाणंं 2 ---> https://www.youtube.com/watch?v=JTryvwRnLMc

गाणं 3 ---> https://www.youtube.com/watch?v=6WH71_fX40o

पण मी गीतकाराबद्द्ल जाणून न घेताच ऐकत होतो!!
पण आज वाचलच कवी अनिल यांच्याबद्दल.
यांच्या सगळ्या कविता मुक्तछंदातील होत्या.
पण काय ती काव्यशैली... डायरीत आजवर 25-26 कविता लिहिल्या तरी स्वत:ला कवी म्हणवून घेण्यास मी सर्वथैव नालायक आहे!
(यात कुठेही तुलना नाही फक्त आपण स्वत: अजून छोट्यातले छोटे आणि नर्मदेतील गोटे आहोत हेच अधोरेखित करायचं होतं)
असं मला प्रामाणिकपणे वाटलं यांच्या वरील गाण्यांचे लिरीक्स वाचल्यावर!
लिरिक्स वाचायचे असल्यास खालीलप्रमाणे
कुणी जाल का सांगाल का ----> https://www.aathavanitli-gani.com/Song/Kuni_Jaal_Ka
वाटेवर काटे वेचित चाललो ----> https://www.aathavanitli-gani.com/Song/Vatevar_Kate_Vechit
अजूनी रुसूनि आहे, खुलता कळी खुलेना ----> https://www.aathavanitli-gani.com/Song/Ajuni_Rusun_Aahe

कवी अनिल उर्फ आत्माराम रावजी देशपांडे यांच्या अजून काही कविता, गाणी मिळवण्याचा , ऐकण्याचा प्रयत्न करतोय. तरी वाचकांकडे काही माहिती, काही सल्ले हे ऐका, ते ऐका इ. असल्यास जरूर शेअर करावेत!!

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

>>मी कुठेही बोललो नाहीये की 'त्या कोवळ्या फुलांचा' हे कवी अनिल उर्फ आत्माराम रावजी देशपांडे यांनी लिहीली आहे >> :डोक्यावर हात: अक्षर ओळखीचं आहे की काय!
शुभेच्छा!

@अमितव डोक्याला हात वगैरे म्हणाण्याची खरच गरज नाहीये.
खरच सांगतो कवी अनिल कांबळे असा उल्लेख माझ्या समोर तरी झालेला नव्हता, माझ्या वाचनातही आलेला नव्हता.
जो उल्लेख झाला तो 'कवी अनिल' एवढाच होता. मी तिथे चुकलो मान्य करतो.
पण मी लिहीलेलं आहे की मला फक्त एकच कवी अनिल माहीत होते ज्यांनी 'त्या कोवळ्या फुलांचा' हे लिहीलय.

आणि काही लोक फक्त चुकाच काढू शकतात.
मागच्या वेळी माझ्या कादंबरितील भागाची 'सेमेंटिक एरर' ऑफिशीअल मेल हे 'जीमेल', 'याहू' , 'रेडीफ' वरून येत नसतात. आणी आलेच तर कोणी बघतही नाही. अस म्हणाला होतात. तुम्ही तिथे सुचवू शकला असतात की ऑफिशिअल वर्क साठी मेल आय डी कसे असतात. एखादं उदाहरण देऊन सांंगितलं असतं. पण नाही... अहो मी तर अजून विद्यार्थीदशेत आहे. पण तुम्ही अनुभवी!! तुम्ही सउदाहरण चूक दुरुस्त करू शकला असतात. पण फक्त चूक दाखवून मोकळे झालात...वाईट वाटतय...त्या नंतर मी विचारलं देखील होत की ऑफिशीअल कम्युनिकेशन कशा प्रकारच्या मेल आयडी स्वरूपात होतं? पर्सन टू पर्सन च होत असेल ना?!! पण तुम्ही दुर्लक्ष केलत!!

@जिज्ञासा चुकलं असेल तर मला माफ करा
मला कळत नाहीये हा टोमणा आहे का कौतूक!
पण प्रामाणिकपणे मला वाटतंं की कोर्‍या फळ्यावर/ कोर्‍या कागदावर शून्यांनंतर येणारा एक काढून दाखवणंं हे ज्ञान देणं आहे.
दहा मधला शून्य पुसून टाकून किंवा खोडून त्यातील एक दाखवण हे ज्ञान नाहीये!!

इथे आपुलकीने सल्ले देणारे बरेच जण तुझ्यापेक्षा वयाने, ज्ञानाने आणि अनुभवाने मोठे आहेत. तू ज्या प्रकारे त्यांच्या प्रतिसादावर react होतो आहेस आणि ज्या हिरीरीने स्वतःच्या मतांना defend करतो आहेस यात तुझेच नुकसान आहे. यापेक्षा त्यांनी काय सांगितले आहे ते नीट वाचून त्यावर काही मनन चिंतन केलेस तर तुला त्यातून बरेच काही शिकायला मिळेल. असेच आततायी प्रतिसाद देत राहीलास तर कोणी सांगायला येणार नाही तुला. प्रयत्न करून पहा. तुला शुभेच्छा!

@जिज्ञासा "चुकीला माफी नाही" असं असलं तरी माफी असावी!! मला स्वत:ची चूक असल्यावर काय नसल्यावर सुद्धा माफी मागायची सवय झालीय. माझा अतातायीपणा जास्त काळ मायबोलीवर रहाणार नाही ही ग्वाही देतो.
आणि
अनभिज्ञ चा आजचा सातवा भाग 'विश्वामित्र'
उद्या एक धागा 'सावरकर साहीत्य' अर्थात 'अग्रणी' या नावाने तयार केला जाईल.
परवा अनभिज्ञ चा शेवटचा भाग (नाव नाही ठरलय अजून) पोस्ट करून माझं मायबोलीवरचं अकाउंट बंंद होईल.
खरं तर परवाच करणार होतो 'वसिष्ठ' पोस्ट केल्यावर. पण वाचकांना(संख्या महत्त्वाची नाही निदान माझ्या मते तरी) अर्ध्यावर सोडून लेखन बंद करायचा अधिकार लेखकालही नसतो जोपर्यंत त्याला मृत्यु थांबवत नाही!

आणि या धाग्यावरच्या सर्वांना सॉरी जे दुखावले गेले असतील, नसतील.... सॉरी!!
कोणीही मला मायबोलीवरच अकाउंट डिअ‍ॅक्टीव्हेट कसं करायचंं या विषयी संदेश पाठवू शकतो. मी त्याप्रमाणे माझ अकाउंट परवा डि-अ‍ॅक्टीव्हेट करेन.

इथे कोण कशाला दुखावलं जाईल? आणि उठता बसता माफी मागण्याचा फंडा काय आहे? It's irritating!
मायबोलीवर रहा वा नको राहू - हा तुझा प्रश्न आहे. मी काही तुझी कथा/कादंबरी वाचली नाहीये सो मला काही ते कळलं नाही. शुभेच्छा!

तुम्ही इथे रहा/ जा तो तुमचा प्रश्न.
त्या मेल आयडी वरुन मला जे वाटलं ते पहिल्याच प्रतिसादात स्पष्ट लिहिलं. त्यावर तुम्ही तुमच्या बाजुने स्पष्टीकरण दिलंत. मला जे म्हणायचं होतं ते आधीच म्हणून झालेलं आणि त्यावर चर्चा करण्यासारखं काही न्हवतं. त्यावर चर्चा ही वायफळ आणि तुमच्या बीबीच्या मूळ विषयाशी सुसंगत नाही वाटली, आणि बीबी भरकटवायची अजिबात इच्छा न्हवती, सो माझ्याकडून पुन्हा प्रतिसाद न देता विषय संपवला.
असो.

चुकलं तर चुकलं म्हणावं प्रगल्भ, वकिली पलटी मारू नये.. हेच नाही तर इतर मराठी संकेतस्थलांवर सुद्धा लोक असेच प्रतिसाद देतील चुकलात तर.. आणि हो, इथे चूक म्हणजे मूळ मुद्दलात असलेली चूक. फॅक्ट मध्ये असलेली चूक. बाकी तुम्ही जे लिहिता ते आवडलं नाही तरी "नाही आवडलं" असा प्रतिसाद कुणीच देत नाही.

ह्यासाठी लिखाण सोडू नका.. अर्थात थांबाच असं कुणी म्हणणार नाही कंपूशिवाय.

Pages