भाषा

मराठी..... भाषा आणि जात !!!!

Submitted by svaag on 29 August, 2016 - 06:57

मराठी..... भाषा आणि जात !!!!
खूप ऐकतो, खूप चर्चा करतो....... कुठे आहे मराठी भाषा...... कशी टिकणार आपली मायबोली.....
पण मराठी भाषा म्हणजे नक्की कोणती............. कारण इथेही मराठी भाषेपेक्षा जातीवर अवलंबून असणार्‍या मराठी भाषेवरून मराठी माणसांतच जुंपते.

पण त्यापलीकडे आपण काही करतो का????

बघायला छोटा पण खूप मोठा प्रश्न आहे हा..................

नाही नाही, इथे पुन्हा एकदा ह्या विषयावर चर्चा नाही करणार; तर एक किस्सा सांगणार आहे..... परवाच नकळत घडलेला...... पण पुन्हा ह्या विषयावरील विचारांत घेऊन जाणारा.

फुलपाखरू

Submitted by वैवकु रीटर्न्स on 4 August, 2016 - 03:35

जाऊ घरी तेंव्हा तुझ्या प्रॉब्लेमवर चर्चा करू
बागेत असतानातरी बघ फूल बघ फुलपाखरू

आधी जरा डोक्यातली ही जळमटे काढूत का
मग सावकाशीने मनाचा पोटमाळा आवरू

भाडेकरारावर सही केलीच नव्हती मी मुळी
देहा तुझ्या वट्यातला हा टॅक्स मग मी का भरू

प्रेमात पडले की म्हणे दुनिया दिवाणी वाटते
होऊ शहाणे एकदा ही सोय आपण वापरू

मिष्टान्न वाढावे तश्या तू ठेवल्या एकेक ह्या
नाही कळत आहे मला मी कोणती इच्छा धरू

होते दिवेलागण ,  तुझा पान्हा मला हाकारतो
येते पुन्हा गोठ्याकडे माझ्या मनाचे वासरू

~वैवकु

स्वप्निल जोशी, कोण होईल मराठी करोडपती २०१६ !

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 July, 2016 - 11:52

शेहनशाह अमिताभ बच्चन आणि किंग खान शाहरूख खान या बॉलीवूड सुपर्रस्टार्सनी एका उंचीवर नेऊन ठेवलेली मालिका कौन बनेगा करोडपती यंदाच्या मराठी वर्जनमध्ये घेऊन येत आहे तुमचा आमचा लाडका स्वप्नील जोशी !

या मालिकेविषयी चर्चा करायला हा धागा !

पण नुसती चर्चाच करत बसू नका, तर खालील लिंकवर जाऊन रजिस्ट्रेशन करून या पटकन..
कोणास ठाऊक स्वप्निल जोशी सोबत बसण्याचे आणि करोडपती होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होईलही.. Happy

ऑल द बेस्ट !!!!!!

लिंक - http://www.konhoeelmarathicrorepati.in/

विषय: 

आवड

Submitted by Suyog Shilwant on 29 July, 2016 - 05:21

तुम्हाला नक्की काय वाचायला आवडतं?

हा प्रश्न कधी तुम्ही स्वतःला विचारला आहे का? माझ्या मते नसेलच विचारला. कारण मी सुध्दा कधी असा प्रश्न स्वतःला विचारला नाही. आपल्या आवडीनिवडी नेहमी दुसरीच माणसं आपल्याला विचारत असतात. खरं आहे ना?

अगदी लहान पणा पासुन म्हणजे जेव्हा आपण बाराखडी शिकत होतो तेव्हा पासुनच आपलं एक नातं शब्दांशी जोडलं गेलं आहे. काय लपलेलं असतं ह्या शब्दांमधे ? विचार, ज्ञान, गोष्टी, कविता असं बरंच काही… पण काही गोष्टी नुसत्या गोष्टी नसतात. मग त्या खोट्या असो वा खऱ्या. त्यात लपलेल्या असतात भावना. ज्या आपल्याला त्या शब्दात असलेल्या भावाशी जोडत असतात.

शब्दखुणा: 

वेड्या पावसानं ...

Submitted by पुरंदरे शशांक on 12 July, 2016 - 02:03

वेड्या पावसानं ...

जीव वेडावला बाई कसा वेड्या पावसानं
अंग ओलावत जाई मन चिंब थरारून

असा भरारा पाऊस दिशा जाती काजळून
मना चाहूल कुणाची जरा जाते उजळून

टप टप पावसाची लय जातसे भिनून
एक शिरशिरी आंत नकळत खुणावून

येतो पाऊस माहेरा जरा थांबून थांबून
कळ आतली उगाच उठे दाटून दाटून

कुणा लुभावे पाऊस कुणा घेतो कवळून
डोळा लागला पाऊस कढ अंतरी पिऊन ....

शब्दखुणा: 

झुंबर ढगांचे

Submitted by पुरंदरे शशांक on 3 July, 2016 - 23:16

झुंबर ढगांचे

झुंबर ढगांचे
झुलते तालात
गाणे पावसाचे
पेरते वनात

सावळे सावळे
घन आभाळात
सल उकलवी
भुईचे अल्लाद

थेंब पावसाचे
येती आवेशात
मुग्ध रान सारे
बेहोशी उरात

दाटला कल्लोळ
गगनी अवनी
जलरुप घेई
स्वये नारायणी

विनवणी

Submitted by पुरंदरे शशांक on 1 July, 2016 - 00:05

विनवणी

क्षणाक्षणाला पडतो खाली
उठुनी पुन्हा उचलतो पाऊली

नसे साथीला दिसे कुणीही
रणरण अवघी नसे सावली

बघुनी सारे राजमार्ग ते
वाटबिकटशी हीच निवडली

तुम्हासारखे दिग्गज कोणी
कधी चालले याच दिशेनी

केशर-बुक्का खुणा पाहुनी
दिशा हीच ती नाही चुकली

गाथेमधल्या शब्दांना मी
कधी मस्तकी उरी सांभाळी

त्या बोलाच्या साथीने तर
चालतोच ही वाट निराळी

आळी पुरवा एक एवढी
करी विनवणी माथा लवुनी

नसेल उत्कट भाव तरीही
घ्या ओढूनी घ्या हो जवळी
-------------------------------

अवघे सावळ

Submitted by पुरंदरे शशांक on 29 June, 2016 - 02:44

अवघे सावळ

उतरले पूर्ण | तुकोबा जीवन | यथार्थ दर्शन | गाथेमाजी ||

चिंतनी मननी | भक्तांसी तुकोबा | नवल विठोबा | करीतसे ||

अभंग तुक्याचे | निरखी विठ्ठल | मनी कुतुहल | फार दाटे ||

कैसी ही आगळी | भक्तिची माधुरी | शब्दी खरोखरी | सामावेना ||

मिटूनी नयन | बैसे स्वस्थचित्त | श्रीहरि एकांत | भोगतसे ||

तुकोबा तुकोबा | गजर अंतरी | आनंद सागरी | देव बुडे ||

विठ्ठल का तुका | तुका कि विठ्ठल | अवघे सावळ | एकरुप ||

संतांचे उपकार

Submitted by पुरंदरे शशांक on 27 June, 2016 - 23:43

संतांचे उपकार

भक्तासाठी देव | होतसे प्रगट | येरा तो अदृष्ट | आकळेना ||

भाव ऐसा थोर | देवापायी नित्य | जीवभाव सत्य | लुप्त होई ||

आठविता चित्ती | एकमात्र हरि | लौकिक विसरी | पूर्णपणे ||

वेड लागे देवा | भक्ताचेच पूर्ण | सांडिले निर्गुण | अरुपत्व ||

ठाकतसे उभा | भक्ताचे ह्रदयी | निर्गुण सामायी | सगुणत्वे ||

आकळावे वाटे | कोणासी श्रीहरि | अभंग उच्चारी | सप्रेमाने ||

ज्ञानेश्वरी गाथा | मनन - चिंतन | स्वये नारायण | दृष्य होई ||

माध्यमांमधील मराठी

Submitted by बे-डर on 23 June, 2016 - 16:06

मराठीविषयी सातत्यानं चर्चा सुरू असते. वृत्तपत्रं, दूरचित्रवाणी यांची भाषा, त्या माध्यमांमधील जाहिरातींचे (चुकीचे) अनुवाद, खरं तर भाषांतर; चुकीची वाक्यरचना, इंग्रजी धाटणीची वाक्यरचना, अतिरिक्त विशेषणांचा वापर, चुकीच्या शब्दांचा सर्रास वापर, इंग्रजी किंवा मराठी शब्दांची अयोग्य संक्षिप्त रूपं (त्यांची चुकीची पूर्ण रूप), परभाषांतील नावांच्या चुका... अशा अनेक गोष्टी आढळतात. त्याबद्दल संताप, हताशपणा, वैफल्य अशा भावना व्यक्त केल्या जातात. काही जण दुर्लक्ष करतात, तर काही जण हसून साजरं करतात.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - भाषा