भाषा

कृष्ण सावळा तो राधेचा

Submitted by पुरंदरे शशांक on 21 April, 2017 - 04:52

कृष्ण सावळा तो राधेचा कुठे हरवला तरी
व्याकुळलेली दिसे बावरी फिरते यमुनातीरी

सूर कुठे पाव्याचा घुमतो कान देऊनी उभी
झुळझुळणारा वारा वाहे नादावून ती खुळी

चमकून बघता अाभाळीचा मेघ शामवर्णी
कान्हा कान्हा शब्द विराले निश्चळ ती रमणी

मेघ थबकला माथ्यावरती राधा फुटली ऊरी
अलगद सुटता भान तयाचे बरसे वरचेवरी

चिंब भिजूनिया कृष्णप्रेमिका अंतरात श्रीहरी
जळ यमुनेचे कृतार्थतेने लोळे चरणांवरी

नाम घेता तुकोबांचे ।

Submitted by पुरंदरे शशांक on 20 April, 2017 - 11:30

नाम घेता तुकोबांचे ।।

नाम घेता तुकोबांचे । ह्रदी रुजतसे साचे । बीज भक्ती वैराग्याचे । कैसे देणे तुकयाचे ।।१||

फिका वाटतो संसार । मुखी येते नित्य थोर । एक विठ्ठल नामाचे । कैसे देणे तुकयाचे ।।२॥

अास अंतरी जागते । ओढ विठूची लागते । अाम्ही भाग्याचे भाग्याचे । कैसे देणे तुकयाचे ।।३॥

ओढ लागतसे मना । कुणी भेटवा सज्जना । संगे गजर नामाचे । कैसे देणे तुकयाचे ।।४॥

गाथा ह्रदया निववी । हाता धरोनी चालवी । पिसे लागे अभंगांचे । कैसे देणे तुकयाचे ।।५॥

पुरे जाहला लौकिक । नसे मुक्तिचे कौतिक । द्यावे भातुके प्रेमाचे । माथा नमवूनी साचे ।।६॥

भरवसा

Submitted by पुरंदरे शशांक on 19 April, 2017 - 01:38

भरवसा

भरवसा डोळ्यांवर
भरवसा कानांवर
भरवसा दृढ थोर
माझ्याच तो बुद्धीवर

भरवसा धनावर
भरवसा लोकांवर
भरवसा असे माझ्या
मुला माणसांच्यावर

भरवसा तुटता तो
खंतावतो मनोमन
कोणी नव्हतेच माझे
फुकाचीच वणवण

सारे इथे नाशिवंत
देह जातो चितेवर
भरवसा का धरीला
व्यर्थ उगा अनावर

अाता अाशेने पहातो
दूर कुठे अज्ञातात
भरवसा वाटे जरा
पुन्हा पुन्हा त्या गर्तेत .....

शब्दखुणा: 

मी मराठी भाषाभिमानी आहे कि नाही!

Submitted by अदित्य श्रीपद on 9 April, 2017 - 13:03

(हा लेख मी मराठी पिझ्झावर आधी प्रसिद्ध केलेला आहे )
मी मराठी भाषाभिमानी आहे कि नाही हे हल्ली हल्ली मला ठाम पणे सांगता येईनासे झाले आहे.. मराठी भाषेचा अभिमान म्हणजे सध्या जो काही अर्थ प्रचलित होऊ पाहतोय तोच जर खरा अर्थ असे गृहीत धरले तर, भाऊ! आपण मराठी भाषाभिमानी नाही.( तसेच आजकाल अनेक ठिकाणी म्हणजे शाळा, कॉलेज, मराठी वाहिन्या ते अगदी नवनव्या रेडियो चानेलवरती जे काही मराठी म्हणून ऐकू येते ते जर मराठी असेल तर आपण मराठी भाषकही नाही.-भाषक आणि भाषिक ह्या दोन पूर्णपणे भिन्न शब्दांचा अर्थ तर आजकाल मराठी वृत्त वाहिन्याना तरी माहिती आहे कि नाही अशी दाट शंका येऊ लागली आहे.)

कथुकल्या [नवीन उपक्रम]

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 3 April, 2017 - 14:07

प्रतिभेचा महानायक श्री विनायकाला त्रिवार वंदन करून नवीन उपक्रमाला सुरुवात करत आहे.

कथा म्हटलं की दोन प्रकार आपल्यासमोर येतात – लघुकथा आणि दीर्घकथा. साधारणतः हजार शब्दांच्या वरील कथेला लघुकथा असं म्हटलं जातं. त्यापेक्षा छोट्या कथा आजकाल अधूनमधून लिहल्या जाऊ लागल्या आहेत. ह्या कथा पटकन वाचून होतात, लिहायला कठीण असतात आणि वाचकांना विचार करायला भाग पाडतात.

हजार शब्दांच्या आतील कथांचं नामकरण मी खालीलप्रकारे केलं आहे -

पं कुमार गंधर्व - येत्या जयंती निमित्त लेख

Submitted by आशयगुणे on 3 April, 2017 - 05:03

गेली अनेक शतके मनुष्याला अखंड साथ लाभत आली, ती स्वर आणि सूररूपी संगीताची! मात्र या प्रवासात अनेकदा अशी वळणे येतात, जेव्हा या कलेची मीमांसा करणे गरजेचे होऊन जाते. काही टोकदार प्रश्न विचारावे लागतात, प्रसंगी कलेच्या काही अंगांवर अभ्यासक-समीक्षकांना कठोर शब्दांत टीकादेखील करावी लागते. कारण, या संगीतकलेचा तिच्या उगमस्थानाशी असलेला संपर्क तुटलेला असतो.

विषय: 

केला इशारा! 'कट्टी' आणि 'बट्टी'चा.

Submitted by सचिन काळे on 2 April, 2017 - 14:20

सकाळी कामावर जाताना मी रोज लोकलने प्रवास करतो. आमच्या स्टेशनवरूनच गाडी सुटते. मी नेहमी ज्या सीटवर बसतो, त्याच्या समोरच्या सीटवर साधारण चार वर्षाची एक गोड छोकरी, मस्तपैकी शाळेच्या कडक छोटुकल्या गणवेशात आपल्या पप्पांसोबत बसलेली असते. आता रोजच्या येण्याजाण्यामुळे माझी त्या मुलीशी थोडीफार तोंडओळख झाली होती.

शब्दखुणा: 

श्री तुकोबांचे अभंग धन

Submitted by पुरंदरे शशांक on 29 March, 2017 - 00:08

श्री तुकोबांचे अभंग धन

परीसाचे अंगे सोने जाला विळा । वाकणे या कळाहीन नोहे ।१|
अंतरी पालट घडला कारण । मग समाधान ते चि गोड ।२|
पिकली सेंद पूर्वकर्मा नये। अव्हेरू तो काय घडे मग ।३|
तुका म्हणे अाणा पंगती सुरण । पृथक ते गुण केले पाके ।४|गाथा ३३२२॥

वाकणे - वक्र, कळाहीन - निस्तेज, परिस - नुसत्या स्पर्शाने लोखंडाचे सोने करणारा काल्पनिक पदार्थ, सेंद - एक फळ, अव्हेर - अस्विकार

माझु बोबला अन प्रुफरीडिंग (विज्ञानचुंबित कथिका*)

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 9 March, 2017 - 00:17

* ५०० ते १००० शब्दांमधील कथांना मी कथिका म्हणत असतो.
------------------------------------------------------------

Pages

Subscribe to RSS - भाषा