Submitted by पुरंदरे शशांक on 20 April, 2017 - 11:30
नाम घेता तुकोबांचे ।।
नाम घेता तुकोबांचे । ह्रदी रुजतसे साचे । बीज भक्ती वैराग्याचे । कैसे देणे तुकयाचे ।।१||
फिका वाटतो संसार । मुखी येते नित्य थोर । एक विठ्ठल नामाचे । कैसे देणे तुकयाचे ।।२॥
अास अंतरी जागते । ओढ विठूची लागते । अाम्ही भाग्याचे भाग्याचे । कैसे देणे तुकयाचे ।।३॥
ओढ लागतसे मना । कुणी भेटवा सज्जना । संगे गजर नामाचे । कैसे देणे तुकयाचे ।।४॥
गाथा ह्रदया निववी । हाता धरोनी चालवी । पिसे लागे अभंगांचे । कैसे देणे तुकयाचे ।।५॥
पुरे जाहला लौकिक । नसे मुक्तिचे कौतिक । द्यावे भातुके प्रेमाचे । माथा नमवूनी साचे ।।६॥
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुकोबांचे नाव वाचूनच इथे आलो
तुकोबांचे नाव वाचूनच इथे आलो.
अधिक सांगणे न लगे.
_/\_
अतुलनीय
अतुलनीय
सुंदर !
सुंदर !
सुंदर !
सुंदर !
अप्रतिम !!
अप्रतिम !!
सर्वांचे मनापासून अाभार.....
सर्वांचे मनापासून अाभार.....
अप्रतिम...
अप्रतिम...
छान....
छानच....
परंपरा राखली जातेय याचे सगळ्यात जास्त समाधान आणि आनंद....
हा वारसा असाच पुढे चालावा ही त्या तुकोबा रायांच्याच चरणी प्रार्थना.... _/\_ _/\_
वा !!!!!अप्रतिम
वा !!!!!अप्रतिम
आदरपूर्वक नमस्कार
आदरपूर्वक नमस्कार
आपल्यासाठी आणि रचनेसाठी
सर्वांचे मनापासून अाभार......
सर्वांचे मनापासून अाभार......
श्री तुकोबांच्या चरणकमली दंडवत.....