आम्ही काही मैत्रिणी गेल्या काही दिवसांपासून मुलाच्या मित्र-मंडळींसाठी एखादा वाचनगट सुरु करण्याच्या विचारात आहोत. शाळेत असा काही उपक्रम नाही आणि जवळपास वाचनालयही नाही.
मुलांचा वयोगट ७-८ वर्षे आहे. सध्या तरी चार मेंबर तयार आहेत. उपक्रम सुरु झाल्यावर अजून मुले तयार होतिल.
वाचनाची आवड असणारी, रोज काही ना काही वाचायला हवे असणारी, कधीतरी वाचणारी आणि अजिबात न वाचणारी अशी सगळ्या प्रकारची मुले आजूबाजूला आहेत.
सगळ्यात मोठी अडचण पुस्तकांची येईल. आम्हाला माझ्या घरी असणाऱ्या आणि मी वाचनालयातून आणलेल्या पुस्तकांचा वापर करावा लागेल. एका पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या मिळणार नाहीत.
चैतंन्य, अजिंक्य आणि मल्हारी गुरुजींना सुयुध्दने गुरु विश्वेश्वरांच्या घरात घुसताना पाहिले व तो ही त्यांच्या मागे मागे घरात शिरला. गुरु आतल्या खोलित ध्यानस्थ होते. जेव्हा ते तिघे आत शिरले ते सरळ गुरुंच्या खोलीकडे गेले होते. सुयुध्द्ने माजघरात कोणी नाही हे पाहुन खोलीकडे जाण्याचे ठरवले. खोलीच्या दाराशी जाऊन तो थांबला. आत चैतंन्य गुरु विश्वेश्वरांना काही सांगत होते. त्याने कानेसा घ्यायला म्हणुन दाराशीच उभे राहुन ते काय बोलत आहेत हे ऐकण्याचा प्रयत्न केला. चैतंन्य गुरुजी बोलत होते. तो त्यांचा आवाज ओळखत होता.
नविन सुधारीत मायबोली वर लिखाण कुठे करायच?? लिखानाची खिडकीच गायब आहे
मि आजच प्रथम एक अभंग share करत आहे
निसर्गाने दिलेली एक सुंदर अशि वास्तु किंवा सौंदर्य.
जणु समुद्राला हि हेवा वाटावा अस आपल जिवन.
त्याला काहि नविन माझे मित्र- मैत्रिनि व्यसन अंगि कारुन स्वत:ला आगेत झोकुन देत आहेत.
आपल शरिर म्हणजे काय exchange offer वाटली काय....
म्हणुन एका अभंगातुन तुम्हाला नविन सुंदर अश्या जगात घेउन जात आहे. जणु रायगडाच्या पाय्थ्याला जसा झुरु झुरु वाहणारा वारा, थंडित शरिराला गरम उब देनारी, मायच्या साडिची गोधडिच. असच वाटेल हि शरिराला मुक्ति देनारा अभंग.......
निसर्गाचि देन अभंग "शरिर"
हात करि कृत्य, पाय करि वाटचाल
ज्याच्या त्याच्या हाती आहे, कर्तवव्याचे माफ!
हात जाइ पुढे पुढे
माझ्या गोष्टीवेल्हाळ बाराखडीतला एक साहित्यिक पाठ....
"वडाच्या झाडापाशी बराच वेळ वाट पाहून झाल्यावर सांजेस सुजित नजरेस पडला तेंव्हा कौमुदीस बरे वाटले..." या एकपंक्तीय घटनेची मराठी साहित्यिकांनी कल्पनाविलासाद्वारे कशी मांडणी केली असती याचे हे प्रकटन.
वि. स. खांडेकर-
खूपदा असं होतं, की आपण आपल्याशी संबंधित बोलण्याचे, आजुबाजुच्या व्यक्तींच्या वागण्याचे किंवा वर्तमानपत्रात किंवा पुस्तकातून वाचनात येणा-या आपल्याशी अजिबात संबंध नसणा-या घटनांचेही चुकीचे अन्वयार्थ लावतो. कुणाकुणाबद्दल ओळख नसतानाही आपले काही पूर्वग्रह असतात, कुणाकुणाकडून आपल्याला चांगले अनुभव आलेले नसतात, काही वेळेला ह्यापैकी कोणतंही कारण नसलं तरी उगीचच त्यांच्याबद्दल आपलं मत चांगलं नसतं. अशा बाह्य घटनांच्या मिसइंटरप्रिटेंशन्सनी आपल्या आयुष्यावर तसा फारसा दृष्य परिणाम होत नाही.
नमस्कार!
२०१२ मधे 'मराठी दिनानिमित्त' आपल्या मायबोलीने 'मराठी बोलु कवतुके' या सदरांतर्गत २-३ प्रसंग देवुन त्यावरील आपापल्या बोलीभाषेतील संवाद मागवले होते.
त्यातली ही माझी एन्ट्री: खान्देशी लग्नातली छोटीशी झलक! अगदी 'पिव्वर' अहिराणी नाही जमली तरी थोडाफार प्रयत्न केलाय.
सर्वांना समजेल अशी आशा आहे..
प्रसंग असा आहे:
आज घरात लग्नकार्य आहे. सगळी पाहुणेमंडळी एकत्रित आलेली आहेत. वधूच्या घरी सगळी मानापानाची मंडळी जमली आहेत.अगदी लगीनघाई चालली आहे. कार्यालयात जातांना सर्वांची उडालेली तारांबळ इथे शब्दबद्ध करतेय.
.....
माझ्या खेड्यात अनेक जाती धर्माची माणसं आहेत. कुंभारवाडा आहे, महारवाडा आहे, मांगवाडा आहे, बागवान मुलाण्याची घरे आहेत. टेकावर न्हाव्याची वस्ती आहे. गावच्या मध्यभागी वीस खणी ब्राह्मणवाडा आहे. परिटांची अनेक घरे आहेत. बोळात लव्हाराची बैठी घरे आहेत. सोबत गुरवांची चार दोन घरेही आहेत. अशा अठरापगड जमाती आहेत. पण आपसात कधी हेवेदावे होत नसत. मारामाऱ्या झालेल्या कधी ऐकीवात न्हवत्या.
लहान असल्यापासुन ते म्हातारं होई पर्यंत आपल्या धर्मामधे इतक्या छान छान गोष्टी सांगितलेल्या आहेत. मी लहान असताना माझ्या आईने एक श्लोक शिकवला होता. जेवायला बसलो कि म्हण असं ती म्हणायची तेव्हा मी कटकट करायचो. काय तो तोच तोच श्लोक म्हणायचा मला इथे भुक लागलेय समोर घोडा का शेरा दिसतोय पण आई आपली म्हणतेय अम्म्म्म पहिले म्हण आई हातावर फटका मारुन श्लोक म्हणवुन घ्यायची.
" वदनी कवलं घेता नाम घ्या श्री हरी चे,
सहज हवन होते नाम घेता फुका चे||
जिवन करी जिवित्वा अन्न हे पुर्ण ब्रह्म ,
उदर भरणं नोहे, जानियेजे यज्ञ कर्म || "
तिचा सूड....... भाग १
प्रीती आणि रिया...... एकविसाव्या शतकातील आणि आजच्या आधुनिक युगाला साजेश्या (प्रातिनिधिक म्हणू शकतो) अशा जिवलग मैत्रिणी. एकाच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या. प्रीती नावाप्रमाणेच प्रेमळ आणि रिया तितकीच बिनधास्त.
.....................................................................................................................................
"रिया लवकर यार.... किती स्लो चालवतेस. सगळे एव्हाना पोहोचले सुद्धा असतील आणि आपण, ६ वाजत आले तरी अजून वाईला सुद्धा पोहोचलो नाही. काय करतेयस. चल ना, पळव ना गाडी."