मुलांसाठी वाचन गट

Submitted by अल्पना on 19 January, 2017 - 23:43

आम्ही काही मैत्रिणी गेल्या काही दिवसांपासून मुलाच्या मित्र-मंडळींसाठी एखादा वाचनगट सुरु करण्याच्या विचारात आहोत. शाळेत असा काही उपक्रम नाही आणि जवळपास वाचनालयही नाही.
मुलांचा वयोगट ७-८ वर्षे आहे. सध्या तरी चार मेंबर तयार आहेत. उपक्रम सुरु झाल्यावर अजून मुले तयार होतिल.
वाचनाची आवड असणारी, रोज काही ना काही वाचायला हवे असणारी, कधीतरी वाचणारी आणि अजिबात न वाचणारी अशी सगळ्या प्रकारची मुले आजूबाजूला आहेत.
सगळ्यात मोठी अडचण पुस्तकांची येईल. आम्हाला माझ्या घरी असणाऱ्या आणि मी वाचनालयातून आणलेल्या पुस्तकांचा वापर करावा लागेल. एका पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या मिळणार नाहीत.

तुमच्यापैकी कुणाला बुकक्लब चालवण्याचा अनुभव असेल तर इथे लिहा. तुमचे अनुभव आणि सल्ले उपयोगी ठरतिल.

आम्ही महिन्यातून २ किंवा ३ वेळा भेटायचे ठरवत आहोत . इंग्रजीसोबत मधूनमधून हिंदी पुस्तकेसुद्धा वाचली जावीत अशी इच्छा आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अल्पना अगदी सेम पिंच,
मी आणि बायको आमच्या बिल्डिंगीत चालू करायचा ठरवतो आहोत उन्हाळ्याच्या सुट्टीत
सेम 7-8 यर्स वयोगट,
आम्ही ठरवलेली आउट लाईन अशी आहे,
3-4 मुले/मुली
एक पुस्तक सिलेक्ट करणार, पुस्तकाची स्टोरी थोडक्यात मराठीत आधी सांगणार , अगदी पहिल्या सेशन ला,
रोजच्या सेशन ला त्या दिवशी वाचल्या जाणाऱ्या भागाची स्टोरी सुरवातीला सांगणार,
प्रत्येक मुलाने एक पान मोठ्याने वाचायचे,एका सेशनला 3 पाने तरी व्हावीत,
कठीण शब्द लिहून ठेवणार, त्याच्या आजूबाजूचे शब्द असतील तर त्यांचा उल्लेख,
स्टोरीशी/शब्द/फ्रेझ शी रिलेटेड काही व्हिडीओ असेल तर तो, यूट्यूब वरून.
हे सगळे असेच execute होईल की नाही माहित नाही, पण उन्हाळाच्या 2 महिन्यात पुस्तक मोठ्याने वाचायचा कॉन्फिडन्स आला तरी खूप आहे.

छानच कल्पना अल्पना आणि @ सिम्बा,
मी पण विचार करत आहे बऱ्याच दिवसापासून मुलांना खेळता खेळता काहीतरी शिकवावं. वाचनालयाची आयडिया पण छानच आहे. अजून काही इंडियाज असतील तर कृपया कोणी SHARE करा. या वयात मुलांना वाचनाची गोडी लागावी, तरच ती पुढे वाढेल.
काहीतरी इंटरेस्टिंग असल्याशिवाय मुलं एखाद्या गोष्टी कडे आकर्षली जात नाहीत. ती गोडी कशी लावता येईल याचं पण मार्गदर्शन इथे नक्कीच मिळेल, माबोकर नेहमीच तय्यार असतात मदतीसाठी आणि कल्पना लढवण्यासाठी.

रोज काही ना काही वाचायला हवे असणारी, कधीतरी वाचणारी आणि अजिबात न वाचणारी >>

अल्पना अशी एकदम विळ्या भोपळ्याची मोट बांधायची आहे का ? अजिबात न वाचणारी मुलं आहेत त्यांचे पालक स्वतः कितपत वाचतात? ते किती कमिटेड असतील? खरोखर वाचनात इंटरेस्ट आहे का की नुसतंच आपल्या पाल्याला प्ले डेट / सेफ अ‍ॅक्टिव्हिटी म्हणून इंटरेस्ट आहे ?

इथे शाळेत जे बूक क्लब्स असतात त्यात वाचनात इंटरेस्ट असलेली मुलंच असतात. आई वडिलांनी मारुन मुटकून त्या क्लब मधे घातलंय असं होत नाही.

जर बूक क्लब मधे सहभागी व्हायचं असेल तर दर महिन्याला एक पुस्तक प्रत्येक मुलाने विकत घ्यावे असं काही ठरवता येइल का़ ? की पालक असा खर्च करायला तयार नसतील? आसपासच्या किंवा शाळेतल्या वरच्या यत्तेतल्या मुलांकडून जुनी पुस्तके विकत किंवा बॉरो करता येतील का ?

सात आठ वर्षाच्या मुलांसाठी जिरानिमो स्टिलटन, मॅजिक ट्री हाउस सिरिज ही पुस्तक सोपी आहेत. मुलांच्या आवडीचे विषय आहेत.