तिचा सूड....... भाग १
तिचा सूड....... भाग १
प्रीती आणि रिया...... एकविसाव्या शतकातील आणि आजच्या आधुनिक युगाला साजेश्या (प्रातिनिधिक म्हणू शकतो) अशा जिवलग मैत्रिणी. एकाच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या. प्रीती नावाप्रमाणेच प्रेमळ आणि रिया तितकीच बिनधास्त.
.....................................................................................................................................
"रिया लवकर यार.... किती स्लो चालवतेस. सगळे एव्हाना पोहोचले सुद्धा असतील आणि आपण, ६ वाजत आले तरी अजून वाईला सुद्धा पोहोचलो नाही. काय करतेयस. चल ना, पळव ना गाडी."