ज्ञानदेवी साच । माऊलीच मूर्त । देतसे अमृत । साधकासी ।।
शांत मनोहर । देखणे नितळ । कोवळी विमळ । शब्द रत्ने ।।
निववी साधका । शब्दचि कौतुके । भाव अलौकिके । ठसविती ।।
ओवी ओवीतून । ज्ञान योग कर्म । दावितसे वर्म । ज्ञानदेवी ।।
सद्गुरुंच्या मुखे । अाकळे यथार्थ । मुख्य तो भावार्थ । ठाई पडे ।।
एकचित्त भावे । पठण मनन । ह्रदयी स्मरण । नित्य होता ।।
देतसे अाशिष । माऊली विशेष । साधका निःशेष । सप्रेमाने ।।
समाधान मुख्य । भक्तिभाव खूण । माऊली संपूर्ण । कृपा करी ।।
MI मराठी - आपलं अधिवेशन
अधिवेशनाची रूपरेषा आखणं ही खूप महत्वाची गोष्ट असते. ही रूपरेषा म्हणजे अधिवेशनाचा पाया असतो आणि त्यावरच नंतर अधिवेशनाचा संपूर्ण डोलारा उभा राहणार असतो. "अधिवेशन का करायचं?" या प्रश्नापासून ही रूपरेषा आखायला सुरुवात होते आणि एकदा "का?" या प्रश्नाचं उत्तर मिळालं, की मग "कसं?" ह्या प्रश्नाचं उत्तर मिळत जातं..
तुटो प्रपंचाची गोडी । जडो विठ्ठली अावडी ।
नावडो हे धन मान । नको तृष्णा विषयपान ।
येर सारे वाव नुरो । ह्रदी विठ्ठल संचरो ।
येई येई पांंडुरंगा । घेई घेई रे वोसंगा ।
निके प्रेमाचे भातुके । देई देई रे इतुके ।
----------------------
वाव -- खोटे, व्यर्थ
वोसंगा --- मांडी
निके -- खरे, शुद्ध
भातुके -- खाऊ, खाद्यपदार्थ
अंगाई
पाळण्यात चिऊताई
करीतसे गाई गाई
चांदो अाला अाकाशात
नीज कशी येत नाही
तारका या अाकाशात
झोपल्या गं किती गुणी
अजूनिया का गं जागी
अाज माझी परीराणी
खेळूनिया लपाछपी
चांदोबाही झोपी गेला
निंबोणीच्या झाडामागे
पार दिसेनासा झाला
नीज येते पापणीत
चळवळ थांबेना ही
मंद मंद झुलवून
अाई गातसे अंगाई
नीज येई डोळ्यावर
तरी खेळायचे हिला
झुलवून थके पार
डोळा अाईचा लागला..
आजच्या e-sakal मध्ये वाचलेली बातमी..
आंतरजालावरील भारतीय भाषकांची संख्या
भाषा युजर्स टक्केवारी
हिंदी 20.1 38
मराठी 5.1 9
बंगाली 4.2 8
तमिळ 3.2 6
तेलगू 3.1 6
(युजर्सची संख्या कोटींमध्ये)
रंग चितारी अाभाळावर जाताना दिनकर
लाजलाजुनी नवथर संध्या मोहरली तिथवर
काजळ किंचित भिरभिरले अन् पापणीत थरथर
ओष्ठद्वय रंगता उमलले गुलाब गालांवर
पदर जांभळा उचलून पाही हळूचकन् प्रियवर
दारातून ती पहात असता गेला कि झरझर
कृष्णवस्त्र हिरमुसून ओढी पुरते अंगावर
लुकलुकणारी एक चांदणी उमटे क्षितिजावर......
भाग - 1
प्रत्येक माणसाचा जगण्याचा दष्टीकोन हा वेगवेगळा असतो.. आता उदाहरण म्हणून एक किस्सा सांगतो .....
हि घटना आहे पाच वर्षा आधिची. आम्ही कॉलेजमध्ये होतो .. 12 वीचं वर्ष होतं.. अभ्यासाचा दबाव तर होताच... पण enjoyment full on. चालु होत...
तसा आमचा गृप पुर्ण कॉलेजमधे गाजलेला होता.. सगळ्याच बाबतीत आमचा गृप पुढे असायचा.. शक्यतो सगळ्यांचा स्वभाव सारखांच.. पण कोमल !!..
कृष्ण सावळा तो राधेचा कुठे हरवला तरी
व्याकुळलेली दिसे बावरी फिरते यमुनातीरी
सूर कुठे पाव्याचा घुमतो कान देऊनी उभी
झुळझुळणारा वारा वाहे नादावून ती खुळी
चमकून बघता अाभाळीचा मेघ शामवर्णी
कान्हा कान्हा शब्द विराले निश्चळ ती रमणी
मेघ थबकला माथ्यावरती राधा फुटली ऊरी
अलगद सुटता भान तयाचे बरसे वरचेवरी
चिंब भिजूनिया कृष्णप्रेमिका अंतरात श्रीहरी
जळ यमुनेचे कृतार्थतेने लोळे चरणांवरी
नाम घेता तुकोबांचे ।।
नाम घेता तुकोबांचे । ह्रदी रुजतसे साचे । बीज भक्ती वैराग्याचे । कैसे देणे तुकयाचे ।।१||
फिका वाटतो संसार । मुखी येते नित्य थोर । एक विठ्ठल नामाचे । कैसे देणे तुकयाचे ।।२॥
अास अंतरी जागते । ओढ विठूची लागते । अाम्ही भाग्याचे भाग्याचे । कैसे देणे तुकयाचे ।।३॥
ओढ लागतसे मना । कुणी भेटवा सज्जना । संगे गजर नामाचे । कैसे देणे तुकयाचे ।।४॥
गाथा ह्रदया निववी । हाता धरोनी चालवी । पिसे लागे अभंगांचे । कैसे देणे तुकयाचे ।।५॥
पुरे जाहला लौकिक । नसे मुक्तिचे कौतिक । द्यावे भातुके प्रेमाचे । माथा नमवूनी साचे ।।६॥