Submitted by पुरंदरे शशांक on 27 April, 2017 - 01:04
अंगाई
पाळण्यात चिऊताई
करीतसे गाई गाई
चांदो अाला अाकाशात
नीज कशी येत नाही
तारका या अाकाशात
झोपल्या गं किती गुणी
अजूनिया का गं जागी
अाज माझी परीराणी
खेळूनिया लपाछपी
चांदोबाही झोपी गेला
निंबोणीच्या झाडामागे
पार दिसेनासा झाला
नीज येते पापणीत
चळवळ थांबेना ही
मंद मंद झुलवून
अाई गातसे अंगाई
नीज येई डोळ्यावर
तरी खेळायचे हिला
झुलवून थके पार
डोळा अाईचा लागला..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान अंगाई! (आजोबा का? :फिदी:)
छान अंगाई! (आजोबा का?
)
वाचून मलाही झोप आली.
मस्त .
मस्त .
मस्त..
मस्त..
मी निंबोणीच्या झाडामागेच्या चालीत म्हणुन पाहिली
मी निंबोणीच्या झाडामागेच्या
मी निंबोणीच्या झाडामागेच्या चालीत म्हणुन पाहिली>>> मि पण
सुंदर
सुंदर
खूपच छान..
खूपच छान..