Submitted by पुरंदरे शशांक on 12 July, 2016 - 02:03
वेड्या पावसानं ...
जीव वेडावला बाई कसा वेड्या पावसानं
अंग ओलावत जाई मन चिंब थरारून
असा भरारा पाऊस दिशा जाती काजळून
मना चाहूल कुणाची जरा जाते उजळून
टप टप पावसाची लय जातसे भिनून
एक शिरशिरी आंत नकळत खुणावून
येतो पाऊस माहेरा जरा थांबून थांबून
कळ आतली उगाच उठे दाटून दाटून
कुणा लुभावे पाऊस कुणा घेतो कवळून
डोळा लागला पाऊस कढ अंतरी पिऊन ....
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
"असा भरारा पाऊस दिशा जाती
"असा भरारा पाऊस दिशा जाती काजळून
मना चाहूल कुणाची जरा जाते उजळून" ...विरोधाभास अर्थपूर्ण उतरलाय . चालीत ऐकायला गोड वाटेल ही कविता .
खुप सुंदर कविता ....
खुप सुंदर कविता ....
मस्तच शशांक..
मस्तच शशांक..
खूप सुंदर !!!
खूप सुंदर !!!
सर्वांचे मनःपूर्वक आभार.....
सर्वांचे मनःपूर्वक आभार.....
____/\____
कुणा लुभावे पाऊस कुणा घेतो
कुणा लुभावे पाऊस कुणा घेतो कवळून
डोळा लागला पाऊस कढ अंतरी पिऊन ... >>>> मस्तचं
सुंदर
सुंदर
मस्तच शशांक जी चालीत ऐकायला
मस्तच शशांक जी चालीत ऐकायला आवडेल आणि वाचतानाही आपोआप लय पकडली जाते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर ___/\____
अतिसुंदर !!!
अतिसुंदर !!!
सुंदर रचना शशांकजी..
सुंदर रचना शशांकजी..
खूप सुंदर...
खूप सुंदर...
कुणा लुभावे पाऊस कुणा घेतो
कुणा लुभावे पाऊस कुणा घेतो कवळून
डोळा लागला पाऊस कढ अंतरी पिऊन >>> खूपच छान !!
मस्त.!
मस्त.!
अप्रतीम...
अप्रतीम...
"असा भरारा पाऊस दिशा जाती काजळून
येथे
"असा भरारा पाऊस दिशा जाती झाकोळून
असे केले तर जास्त संयुक्तिक होईल असे वाटते
रात्रीने दिशा का़जळतात तर पावसाने झाकोळतात...
अर्थात अधिकार तुमचा...
राजेंद्र देवी
राजेंद्रजी, खूप सूक्ष्म व
राजेंद्रजी, खूप सूक्ष्म व मार्मिक निरीक्षण... अगदीच सुयोग्य... मनापासून धन्यवाद..... असेच लक्ष असूद्या...
मात्र संपादन करता येत नाहीये !!!
धन्यवाद...
धन्यवाद...
येतो पाऊस माहेरा जरा थांबून
येतो पाऊस माहेरा जरा थांबून थांबून
कळ आतली उगाच उठे दाटून दाटून
कुणा लुभावे पाऊस कुणा घेतो कवळून
डोळा लागला पाऊस कढ अंतरी पिऊन ....
व्वाह्... सुंदर कविता!