काही व्यक्ति माणसाच्या जिवनात अनपेक्षितपणे येतात आणि जिवनातील बदलांना सहजपणे कारण होतात. कधीकधी त्यांनाच माहीती नसतं की आपण समोरच्याच्या जिवनात काय बदल घडवला. अशा जिवनात आलेल्या व्यक्ती दिर्घकाळ लक्षात राहतात. ह्या व्यक्ती जर पुढील जिवनात आपल्या सोबत राहील्या तर जीवनाला निराळाच अर्थ प्राप्त होतो.पण अशी सोबत शक्य नाही अशी जाणिव दोन्हीकडे असेल आणि एकमेकांप्रती कुठल्याही अपेक्षा ठेवल्या नाहीत तर एकमेकांच्या सानिध्यात घालविलेला *लहानसा काळ*सुद्धा संस्मरणीय होऊन आठवन बनून जिवनभर सोबत करतो. जिथं अपेक्षा नसतात तिथं शुद्ध प्रेम असतं! आपलेपणा असतो.
काही दिवसांपूर्वी 'हिंदी मिडीयम' पाहिला. खूप आवडला. त्याचा शेवट कसा असला पाहिजे वगैरे मुद्दे सोडून अगदी नुसत्या इरफान खान साठी आवडला. त्यातला तो बारका पोरगा होता ना सुरुवातीला त्या मुलीसाठी तिच्या आवडीचा ड्रेस शिवणारा तोही आवडला. आजकाल होतं काय? कुठलेही चित्रपट पाहिले तरी त्यात तो व्यक्ती दिसत राहतो. म्हणजे शाहरुख खान, सलमान किंवा अक्षय कुमार वगैरे. कथा कशीही असो त्यात कथेतला नायक दिसत नाही, फक्त 'हिरो' दिसत राहतो. आणि त्या गोष्टीचा मला भयंकर कंटाळा आला आहे.
कविता - माणूस नावाच एक झाड असत !
झाड
माणूस नावाचं एक झाड असतं !
रंग, रूप, आकार विविध तरी
सर्वांचं मूळ - मन एकच असतं
त्या मनाच्या गाभ्यातून बीज अंकुरतं,
माणूस नावाचं एक झाड असतं !
प्रत्येक दिवसाचं पान उगवतं
नवं खुलतं, जुनं गळतं !
कधी आठवणींच्या फांदीवरती
हिरवा फुलोरा बनून टिकून राहतं,
माणूस नावाचं एक झाड असतं !
प्रत्येक ऋतूचा अनोखा रंग, गंध
पिवळा रुक्ष, ओला हिरवा वृक्ष
लाल गुलाबी शेंदरी, पानांत खुलतं
जुनी कात टाकून ऋतुरंगात न्हातं,
माणूस नावाचं एक झाड असतं !
त्या दिवशी माझी एक मैत्रिण सहज बोलली, "₹!हुल स्वत:ला update कर."
वेडं असतं मन! जे स्वप्नांत रमतं, कल्पनाविलास करतं.तरीही ही मानवी जिवनाला मिळालेली अनमोल देणगी आहे. आपलं भावविश्व अधिक समृद्ध करणारी प्रतिभा आहे! कल्पनेला वास्तवाची जोड मिळाल्यावर जे काही तयार होतं ते म्हणजेच जिवन जगण्याचे संदर्भग्रंथ होत.जगण्याला अधिक अर्थ मिळवून देण्याचं काम असलं साहीत्य करतं..ज्यावेळी आपलं कुणीच नसतं अशावेळेस पुस्तकं जवळ ची वाटतात. मग सुरू होतो प्रवास वाचण्याचा. त्यातूनच मनात विचारांच्या लाटा निर्माण होतात, विभिन्न मतप्रवाह तयार होतात. यातूनच आपली वैचारिक जडणघडण होत असते आणि शेवटी याचं रूपांतरण लिखाण करण्यात होतं.
माणसे वाचताना.
काही दिवसांपूर्वी फेसबुक वर फिरता एक पोस्ट दिसली
“Meet people who aren’t your age. Hang out with people whose first language isn’t the same as yours, get to know someone who doesn’t come from your social class, This is the only way to see the world. This is how you grow."
आणि पुढे कुठल्यातरी travel डेस्टीनेशन चे फोटो. पण त्या मिनिटाला ती वाक्ये मला फार अपील झाली.
भरगच्च भरलेला सायंटिफिक सोसायटीचा हॉल, पायर्यांवर व व्हरांड्यात उभे असलेले श्रोते असं चित्र आता नागपूरकरांसाठी नवीन नाही. हे असं चित्र वर्षातून तीनदा नक्कीच, कधीकधी चार-पाच वेळा दिसत आलं आहे गेली तेवीस वर्षं! दर्दी रसिकांची गर्दी म्हणजे ‘स्वराली' हे समीकरण आता पक्कं झालंय!
शनिवारी, यावर्षीची बॉस्टन ऍथलेटिक असोशियनची पहिली रेस झाली ५किमी अंतराची. यावर्षी १० किमी आणि हाफ मॅरॅथॉनही आहे. याला खरेतर रेस म्हटलंच नाही पाहिजे. कारण मला कुठेही पहिले बक्षीस मिळवायचे नसते. अर्थात हवे असले तरी ते काय जमणार नाहीये. इथे भले भले लोक सुसाट वेगाने पळत असतात. त्यांच्याशी स्पर्धा करणे हे ध्येय नाहीच मुळी भाग घेण्याचे. पण तरीही आपलं लोक म्हणतात म्हणून 'रेस' म्हणायचं. तर ही ५किमीची रेस शनिवारी पार पडली. आता हे अंतर तसं फार जास्त वाटत नाही आणि नसतंही.
आमच्या घराजवळ एक सायकल ट्रेल आहे. एक जुनी रेल्वे लाईन होती ती काढून तिथे सायकलिंग साठी चा रस्ता बनवला आहे, मस्त सलग १० मैलापेक्षा जास्त लांबपर्यंत आहे. आम्ही मुलांना सायकली घेऊन त्यांच्यामागे रनिंग करत जातो. त्यामुळे गेल्या वर्षीपासून नवऱ्याला सायकल घ्यायची होती. यावर्षी त्याची घेतली आणि मी एकटीच राहिले होते. थोड्या दिवसांपूर्वी माझ्यासाठीही सायकल घेऊन आलो. काय माहित पण सायकल घेतानाही उगाच जमेल की नाही अशी शंका येत होती. एकतर माझी उंची कमी आणि सायकल चालवून बरीच वर्षं झाली आहेत. विकत घेण्यासाठी चालवून बघतानाही नीट जमत नव्हती. पण किंमत, उंची, रंग अशा महत्वाच्या गोष्टी पाहून घेऊन टाकली.