वेडं असतं मन! जे स्वप्नांत रमतं, कल्पनाविलास करतं.तरीही ही मानवी जिवनाला मिळालेली अनमोल देणगी आहे. आपलं भावविश्व अधिक समृद्ध करणारी प्रतिभा आहे! कल्पनेला वास्तवाची जोड मिळाल्यावर जे काही तयार होतं ते म्हणजेच जिवन जगण्याचे संदर्भग्रंथ होत.जगण्याला अधिक अर्थ मिळवून देण्याचं काम असलं साहीत्य करतं..ज्यावेळी आपलं कुणीच नसतं अशावेळेस पुस्तकं जवळ ची वाटतात. मग सुरू होतो प्रवास वाचण्याचा. त्यातूनच मनात विचारांच्या लाटा निर्माण होतात, विभिन्न मतप्रवाह तयार होतात. यातूनच आपली वैचारिक जडणघडण होत असते आणि शेवटी याचं रूपांतरण लिखाण करण्यात होतं. लिहीण्याची प्रक्रिया म्हणजे जणूकाही Thermodynamic cycle च! फक्त एक स्टार्ट मिळणं गरजेचं असतं. कुठं तो स्टार्ट, extrinsic motivation नं मिळतो तर कुठं intrinsic motivation नं. जर तो start intrinsic असेल तर लिहीण्यासाठी विशेष वेगळा असा प्रयत्न करावा लागत नाही. आपल्या मनात निर्माण होणारे विचारतरंग, भावभावना अगदी मोहोरून आल्याप्रमाणं आविष्कारतात आणि स्वत:च्याही नकळत ते कागदावर अलगदपणे उमटवण्यासाठी आपले हात सरसावतात.
―₹!
लिहीणं- माझ्या नजरेतून
Submitted by र।हुल on 8 June, 2017 - 11:12
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मस्त..
मस्त..
धन्यवाद !
धन्यवाद !
(No subject)
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
फक्त एक स्टार्ट मिळणं गरजेचं असतं. >>> हो ना!!!
धन्यवाद मेघा आणि सचिन
धन्यवाद मेघा आणि सचिनजी