पश्चिमेवर असता उन्हे
ऐक निळाईचे रडणे.
निशेस धरणी विचारी
ना आवडत तुज रंगणे?
निःशब्दशाही तूच सांग
का रे इथे पडले सुने?
शांततेत दडले असते
सोसत अपुले घाबरणे.
विषण्णता घेरा घाली
रोजचेच झाले बुडणे.
रात्र होते जर्द शाई
आपण पानी उतरवणे.
- आर्त. (१९.०३.२०२१)
टीप: मी गझल हा प्रकार नव्यानेच हाती घेतला आहे. जर कुणाला सुधारणा, अभिप्राय इत्यादी कळवायचे असेल, तर मुक्तपणाने बिनधास्त कळवा. आभारी.
वेडं असतं मन! जे स्वप्नांत रमतं, कल्पनाविलास करतं.तरीही ही मानवी जिवनाला मिळालेली अनमोल देणगी आहे. आपलं भावविश्व अधिक समृद्ध करणारी प्रतिभा आहे! कल्पनेला वास्तवाची जोड मिळाल्यावर जे काही तयार होतं ते म्हणजेच जिवन जगण्याचे संदर्भग्रंथ होत.जगण्याला अधिक अर्थ मिळवून देण्याचं काम असलं साहीत्य करतं..ज्यावेळी आपलं कुणीच नसतं अशावेळेस पुस्तकं जवळ ची वाटतात. मग सुरू होतो प्रवास वाचण्याचा. त्यातूनच मनात विचारांच्या लाटा निर्माण होतात, विभिन्न मतप्रवाह तयार होतात. यातूनच आपली वैचारिक जडणघडण होत असते आणि शेवटी याचं रूपांतरण लिखाण करण्यात होतं.
माबो वर … गडप्रवासाचे लिखाण टाकत होतो ….
मजाक मजाक मध्ये लिखाण बराच मोठा झाला , पण तो पुर्ण पणे टाकता येत नाही अर्थवटच टाकला जातोय …
या विषयी मदत हवी आहे