Submitted by आर्त on 19 March, 2021 - 15:56
पश्चिमेवर असता उन्हे
ऐक निळाईचे रडणे.
निशेस धरणी विचारी
ना आवडत तुज रंगणे?
निःशब्दशाही तूच सांग
का रे इथे पडले सुने?
शांततेत दडले असते
सोसत अपुले घाबरणे.
विषण्णता घेरा घाली
रोजचेच झाले बुडणे.
रात्र होते जर्द शाई
आपण पानी उतरवणे.
- आर्त. (१९.०३.२०२१)
टीप: मी गझल हा प्रकार नव्यानेच हाती घेतला आहे. जर कुणाला सुधारणा, अभिप्राय इत्यादी कळवायचे असेल, तर मुक्तपणाने बिनधास्त कळवा. आभारी.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
:-)....छान
...छान
शीर्षक पाहून मला वाटलं की सुनेला हाक मारून काही उपदेश आहे का......
छानच
छानच
आवडली
आवडली
आर्त,
आर्त,
मन लावून केलेला उत्तम प्रयत्न.
("माफ करा पण ही गझल होऊ शकत नाही") असे म्हणण्यापेक्षा असे म्हणू की यात सुधारणा होण्यासाठी आपण काही Activities करुयात.
१) http://sureshbhat.in/gazalechibarakhadi
ही बेसिक माहिती असलेली लिंक आहे.
२) यापुढे तंत्र समजून घेतल्या नंतर सवय होण्यासाठी
माबो च्या गझल कार्यशाळा ची लिंक. जी खुद्द वैभव जोशी यांनी घेतलेली होती.
https://www.maayboli.com/hitguj/messages/75/123104.html
३) गझल कार्यशाळा – २
https://www.maayboli.com/node/3604
माझी मनापसून केलेली विनंती:-
आधी मनसोक्त गझला वाचा.
यूट्यूबवर “गझलरंग” नावाचे एक चैनल आहे. तिथल्या गझला बघा , ऐका.
यासोबतच दोन्ही गझल कार्यशाळा मधील हर एक गझलेच्या खालचे प्रतिसाद देखील वाचा.
आणि स्लोलीSS स्लोलीSS प्रयत्न करा
टीप:- मी सुद्धा अत्ता अत्ता शिकलोय! किम्बहुना अजूनही शिकत आहे!
विविध प्रकारच्या वृत्तांची लिंक देत आहे. वरच्या लिंक्स नंतर त्यावरुन देखील नजर फिरवा
http://yallappakokane.blogspot.com/2017/09/blog-post_43.html?m=1
&&
http://www.sardesaikavya.com/
वैभव जोशी यांची एक गझल आहे
"शेवटी शेवटी खूप आल्या सरी
चातका सारखा जन्म गेल्यावरी"
https://www.youtube.com/watch?v=cK9jhbHESHU
Meter :- गालगा गालगा गालगा गालगा (स्त्रग्विणी वृत्त)
मला यावरून काल एक शेर सुचला होता...
जीव अडला तिथे प्रसविली मज गझल
गाल गा गा लगा गा लगा गा ल गा
दाद आली तुझी जीव गेल्यावरी
गाल गा गालगा गालगा गालगा
पण मी नवीन काफिये घेऊन vegaLich गझल बनवली...
कारण मला "अरी" वाले तेच ते नसले तरी तोच फ्लेवर असणारे काफिये नको होते!
बेफिकिर, द्वैत, निलेश वि.ना. शेलोटे, राहुल कुलकर्णी, भरत आणि किमयागार yanchyaamuLech मी आज जे लिहितोय ते लिहितोय. (कुणाचे नाव राहून गेले असल्यास क्षमस्व)
चु.भू.दे.घे.
" अनेक शुभेच्छा गझल शिकण्याच्या प्रवासासाठी "
@ आंबट गोड: हाहाहा असा विचार
@ आंबट गोड: हाहाहा असा विचार मनात नाहीच आला. प्रतिसाद वाचून मात्र खूप हसलो. दाद दिल्याबद्दल धन्यवाद.
@बन्या, तेजो: तुमचेही धन्यवाद
@प्रगल्भ: मान्य आहे. सध्या वाचन आणि श्रवण चालूच आहे. त्यासोबत थोडा सराव. 'कार्यातून शिक्षण' असे माझे आवडते ब्रीदवाक्य आहे. आणि त्यातून नव्या लोकांबरोबर संपर्क वाढतो आणि अजून शिकायला मिळतं. तुझ्या ह्या सविस्तर माहिती साठी प्रचंड आभारी आहे. मी नक्कीच ह्याचा खूप उपयोग करून घेईन. तुझ्याही गझली मी वाचल्या आहेत. छान लिहितोस.
तरीही गम्मत म्हणून, जर आपण म्हणालो की ही गझल नाही, तर का नसेल ही गझल? मान्य आहे ती वृत्तबद्ध नाही. मात्रा बद्ध मात्र आहे (माझ्या मते.) आणि हो, २-३ कडे सूट घेतली आहे, हे ही मान्य करतो.
तुझ्या प्रतिसादासाठी धन्यवाद.
" पश्चिमेवर असता उन्हे -->
" पश्चिमेवर असता उन्हे --> १४ मात्रा
ऐक निळाईचे रडणे " --> १४ मात्रा
हा तुमचा सवलत घेतलेला मतला आहे!
म्हणजे ह्या गझलेतल्या शेरांची प्रत्येक oL ही १४ च मात्रान्न्ची यायला हवी
पण पहिल्याच शेरात,
निशेस धरणी विचारी
लगाल ललगा लगागा --> १३ मात्रा
ना आवडत तुज रंगणे?
गा गाललल लल गालगा --> १४ मात्रा झालेल्या आहेत!
First of all I want to be honest with you. मी तुमच्यात स्वत:ला पाहतोय.
कारण मी सुद्धा काही महिन्यांपूर्वी फक्त तांत्रिक बाबी लक्षात घेऊन काव्य लिहित होतो. पण अक्षरगण वृत्ताच्या दृष्टीने.
जे तुम्ही मात्रा वृत्ताच्या दृष्टीने घेताय सध्या...
https://www.maayboli.com/node/75663 ---> मी हे काव्य लिहिल तेव्हा खूप खुश होतो. कारण तांत्रिक बाजू बघता sagaLe शेर वृत्तात होते. आपसुकच मात्रा देखील बरोबर होत्या!
पण वाचणारयाला हे भावत नव्हत कारण हे saraL - तरल नव्हत!
कविता म्हणून ठीक आहे... पण गझल हा काव्यप्रकार लक्षात घेतला तर दोन मुद्दे मांडतो.
१) "समोर बोललयासारखी गझल लिहिली गेली पाहिजे! समोर बोलतोय माणूस , वर्णन करतोय असे वाटायाला पाहिजे... सोप्पे लिहा"
https://www.youtube.com/watch?v=_L4Y59FL8nE ---> त्याचीच ही लिंक.
२) गझल तांत्रिक रित्या अगदी योग्य लिहिली... मान्य!... राजमान्य!
पण कवीला (गझलकाराला) काय म्हणायचे आहे हे नीटसे उधृत होत नसेल तर ती गझल होऊ शकत नाही. वाचल्या वाचल्या समजल पाहिजे
उदा:-
काव्य -
त्याच्यानुसार आज मी हे लिहीतो
कोणास ठावे कसा...
तमसंध्येच्या पोटात अस्त निजतो
उष्मा सूर्याचा जसा...
मैफिलीत इथल्या कावळेच गाती
सावर्ण त्यांची प्रभा...
त्यांच्या मधील गीत मी जे स्मरतो त्या
भैरवीला नाही मुभा...
अजून दोन कडवी आहेत पण उदाहरणासाठी एवढे पुरे होईल.
आता ही कविता तुम्ही काय किंवा कोणीही अगदी वरवर स्थूल मनाने वाचली(ग्रेसच्या भाषेत).... तर पटकन लिंक लागत नाही.
ऑ, त्याच्यानुसार लिहितो म्हणजे नक्की कुणाच्या सारखे लिहितो?
तमसंध्येच्या पोटात अस्त निजतो, ऊष्मा सूर्याचा जसा --> ही विरोधाभासिक oL आहे नीट विचार केला तर...
पुढचे कडवे,
अशी कोणती मैफ़िल आहे जिथे कावळेच गात असतील बुवा ??
आणि गातात तर गातात रंग kaLaa असून देखील त्यांची प्रभा ही सावर्ण कशी असेल???
बरं, पण शेवटी काय तर तू त्यांची मैफिल आइकत आहेस ना... मग तू कुणाच्या तरी भैरवीला का स्मरतों आहेस??
हे असे प्रश्न उद्भवतात एकांदरीत...
पण
गझल उदा: म्हणून वैभव जोशीच्या वर दिलेल्या गझलेची लिंक पाहा...
तुला भेटून कळते काय असते चांदणे
तसे कायम तुझ्या देहात वसते चांदणे
तसे रात्री लाखो दिवे मी पाहतो
तुझ्या इतके कधीही लख्ख नसते चांदणे
आता हा मतला आणि हा शेर वाचून कोणत्याही श्रोत्याच्या मनात कोणताही प्रश्न येईल का ??
व्वा अशी दाद सोडल्यास सामान्य माणूस त्या काव्याला, विचाराधीन होणार नाही...
And That Thing Called गझल
आई होप आय Am Clear
टीप :-
उदाहरणा दाखल दिलेली कवितेतील दोन कडवी ही माझ्या कवितेतील आहेत. आणि गझलेचे उदाहरण हे वैभव जोशी च्या गझलेचे आहे
@ प्रगल्भ: तुझ्या खुलेपणासाठी
@ प्रगल्भ: तुझ्या खुलेपणासाठी आणि खरेपणासाठी धन्यवाद. तु ज्या आत्मीयतेनं इतकं सविस्तर सोदाहरण लिहिलं आहेस, त्यासाठीही धन्यवाद. वाचन, शिक्षण आणि अभ्यास चालू राहील. ह्या निमित्तानं गप्पा झाल्या. भेटत राहू माबो वर
"भेटत राहू माबो वर Happy" --
"भेटत राहू माबो वर Happy" --> मी थोडे दिवस मायबोली बंद ठेवणार आहे. मला माझा Codecademy चा कोर्स संपवून माझ्या एका मित्रा सोबत Commonwealth Bank ची online internship करायची आहे!
पण No Worries
तुमच्या कडून पहिली गझल येईस्तोवर मी काही तुम्हाला असतस सोडणार नाहीये. आजच संपर्कातून मेल पाठवेन.
"भेटत राहू माबो वर " ---> "भेटत राहू
माबोMail वर "