आज या सिझनची पहिली रेस, ५K. माझी नाही, मी बरी असते तर माझीही. संदीप गेला रेसला, कधीतरी पहाटे एकटाच. आणि इतक्या दिवसांत आपल्याला पळता येत नसल्याचा सर्वात जास्त त्रास झाला. आयुष्यात काय गमावलं हे कळलं की जास्त त्रास होतो. तर एरवी आम्ही दोघेही जाणार असू तर ही रेस म्हणजे नुसतं पळणं नसतं. आदल्या दिवशी ठरवून ठराविक एक भाजी, पोळी, वरण भात जेवायला बनवणं, रेसचे बिब उद्या घालायच्या कापडयांना लावून ठेवणं, मुलांचं काय करायचं त्यानुसार त्यांना कुणाकडे सोडून येणं आणि तिथे रेसच्या जागेपर्यंत पोहोचणं हाच एक मोठा प्रवास आणि प्रत्येकाने एकदा तरी घ्यावाच असा अनुभव असतो.
दगडूबाई...अगदी कथेत शोभेल असं नाव आणि व्यक्तिमत्त्व ही तसंच. कपाळावर ठसठशीत कुंकू, सावळा रंग, नऊवारी साडी, खणाचं पोलकं, टापटीप राहणी, काटक शरीर आणि अंगात कमालीचा उरका. प्रत्येक काम मनापासून आणि उत्साहानं करण्याची वृत्ती, अशी होती आमची दगडूबाई. आमची मदतनीस, मोलकरीण नव्हे तर घरातलीच एक. ती, तिचं वागणं, काम करणंच असं होतं की ती घरातली कामवाली नं राहता घरातलीच एक केंव्हा होऊन गेली ते आम्हाला कळलं ही नाही. अंगात चिकाटी, पडेल ते काम करण्याची तयारी असलेली आणि सतत आनंदाने सळसळणारी अशी दगडूबाई. आळस, कंटाळा हे शब्दं जणू ठाऊकच नव्हते तिला.
नुकतंच एका मित्राला सांगत होते, एका विषयावर एक सलग लिही, अजिबात वाहवत न जाता, निबंध लिहितात ना तसं, प्रत्येक मुद्दा मांडत, ओळीने. त्याला वाहवत जाण्याची सवय आहे. पण त्या वाहण्यात बरंच काही बाहेर येतं. विसंगत वाटलं तरी जसं आहे तसंच बाहेर पडतंय असं वाचताना तरी वाटतं. तसं लिहायला यायला हवं. मनात येईल तो प्रत्येक शब्द कागदावर येऊ द्यायचा. पण माझं तसं होतं नाही. शाळेत असताना एका बाईंनी आम्हांला सलग १० विसंगत वाक्यं एका पाठोपाठ बोलायला लावली होती. तिसऱ्या वाक्यापर्यंत माझी विसंगती संपली होती. भरकटत जाणं मला जमलं नाही तेव्हाही आणि आताही बरेच वेळा जमत नाही.
अनेकदा काही विचार मनात येतात आणि समोर असलेल्या कागदावर लिहून टाकले जातात. त्याचे फोटो काढून ठेवू लागले कारण तो कागद पुन्हा सापडेल याची खात्री नाही. मग ठरवून कधीतरी ते डायरीत उतरवून ठेवते. हे असे विचार म्हणजे एखादा लेख, कथा लिहिताना अवांतर सुचलेलं काही असतं तर कधी तो एक क्षणाचा विचार असतो. हे सर्व लेखाच्या स्वरुपात मांडलं जात नाही त्यामुळे माबो वर येत नाही. यातल्या प्रत्येक कागदात एखादी गोष्ट दडलेली असेल असं वाटतं. ती कधी कागदावर येईल माहीत नाही. आज यातलेच काही आज एकत्र पोस्ट करत आहे, चिटोऱ्या.
विद्या .
चैतन्य राजाच्या दरबारी
रुपसुंदरी दासी मिरा
जगकौतुक करती ज्याचे
नयनी त्याच्या चित्र दासीचे
गोष्ट पसरली परराज्यातून
लहर निंदेची आली पत्रातून
नावं बुडालं, ढासळली कीर्ती
अट आली चैतन्याच्या कानी
काय हवे तुझं, राज्य वा प्रीती?
क्षणाचाही विलंब न करता
चैतन्य उभा समीप मिरा
मुकुट काढुनी केलं हस्तांतर
दरबार सोडूनी निघाला चैतन्य
जाता जाता बोलले शिवराज
काय मिळवले चैतन्य राजा?
हास्य उमगवून म्हणी चैतन्य
प्रेम मिळविले शिवराजा.
.
– दिपक.
जीवनात येणार्या बर्याचशा छोट्या-मोठ्या किचकट समस्या सोडवण्यासाठी तर्क (logic) या विचारपध्दतीचा उपयोग होतो.पण प्रत्येक व्यक्ती याचा उत्तम प्रकारे उपयोग करुन घेण्याइतपत हुशार असेलच नाही.पण उत्तमपैकी तार्किक विचार करता येणं ही काही जन्मजात देणगी नव्हे.बर्यापैकी अचूक तर्क कसा करायचा हे व्यवस्थित समजल्यास,थोडा अभ्यास केल्यास,सराव केल्यास यात बर्यापैकी प्रगती होऊ शकेल.अनेक समस्या सहज सुटू शकतील.समस्यांनी चिंताग्रस्त होऊन हतबल होण्याऐवजी आणि भावनेच्या भरात काहीवेळा चुकीचा निर्णय घेऊन नुकसान होण्याऐवजी तर्काने समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणं कधीही चांगलंच!
मी कॉलेजमध्ये असताना मावशीचं घरंही जवळच होतं. महिना-पंधरा दिवसांतून मावशीकडे जायचे. एकतर एरवी मेसमधलं जेवण असायचं आणि मावशीचं जेवण असंही खासच. त्यामुळे तिथे गेलं की मेजवानीच व्हायची. खरं सांगायचं तर अनेकवेळा असंही व्हायचं की मी दुपार मावशीकडे पोचले आहे. तोवर त्यांचं सर्व जेवण उरकून, भांडी आवरून झालीत आणि आता वामकुक्षीची वेळ झालीय. मी पोचले की मावशी दुपारच्या जेवणातलं छोट्या छोट्या वाट्यात काढून ठेवलेलं वाढून द्यायची. नेहमी वाटायचं, इतकंसं कसं पुरेल मला, पोट भरेल का? पण असं कधीच झालं नाही की मी गेलेय आणि अर्धवट पोट भरलंय. उलट चार घास जास्तच जायचे.
दोन महिन्यांपासून चाललेलं आजारपण, त्यातून ठरलेली सर्जरी, ती झाल्यावर औषधांच्या अंमलात असलेली गुंगी, मधूनच येणारं डिप्रेशन आणि इतक्या सर्वातून जाऊनही 'पुढे सर्व ठीक होईल की नाही' हा मोठा प्रश्न!!सर्जरीच्या आधी धुतलेले केस आणि त्यानंतर एकदोन वेळा जमेल तसं अंगावर घेतलेलं पाणी. औषधं, आजारपण यातून उतरलेला चेहरा. आज सकाळी उठल्यावर पाहिलं तर गळत असलेले केस, ओढून आलेला चेहरा,सगळं कसं नको वाटू लागलं. अजून किती दिवस, महिने, वर्षं हे असं चालणार या विचारांनी अजूनच वाईट वाटू लागलं. नवीन दिवस उजाडला, थोडं खाऊन घेतलं, औषध घेतलं तरी मन काही 'उंच भरारी' घेण्याच्या मूड मध्ये नव्हतंच.