पण सुरुवात करायला हवी.....
डिस्क्लेमर- ही पोस्ट मी किती भारी वगैरे लिहिण्यासाठी लिहिलेली नाहीये. जे काय शो ऑफ करायचा आहे तो वीकेंडला आधीच करून घेतला आहे.
व्यक्तिमत्व
डिस्क्लेमर- ही पोस्ट मी किती भारी वगैरे लिहिण्यासाठी लिहिलेली नाहीये. जे काय शो ऑफ करायचा आहे तो वीकेंडला आधीच करून घेतला आहे.
एप्रिलच्या चैत्रवणव्यात भर दुपारी २ वाजता ट्रेनची अनाऊन्समेंट झाली, तेव्हा कुमार यश मोबाईलवर ‘स्नेक-२’ गेम खेळत बसला होता. त्यापूर्वी थोडा वेळ तो उभाच होता. उभं राहून कंटाळा आला तेव्हा तो जवळच्याच एका लोखंडी खांबाला टेकायला गेला. पण खांब उन्हामुळे तापलेला होता आणि कुमार यशने स्लीव्हलेस टी-शर्ट घातलेला होता! त्याच वेळी कुमार यशच्या पुढ्यातून त्याच्यापेक्षा वयाने जराशीच लहान एक मुलगी आईचं बोट धरून निघाली होती. तिच्याकडे मोबाईलफोनयुक्त तुच्छतेने पाहण्याच्या नादात इकडे दंडाला बसलेल्या चटक्याने कुमार यशला दचकायला झालं. हातातून मोबाइल पडता पडता वाचला.
सकाळी शेवटी डॉकटरकडे जाऊन आले. तीन दिवस बिघडलेल्या पोटावर सर्व प्रयोग करून झाल्यावर, नाईलाजाने. अर्थात सर्व शहाण्या भारतीय नागरिकांप्रमाणे मीही दुकानातून औषध आणलं होतं आणि ज्या लोकांना मला बरं वाटत नाहीये माहित होतं त्या सर्वांनी सांगितलेले सर्व घरगुती उपचारही करून झाले होते. डॉक्टरकडे जाणे म्हणजे जणू तुमच्या या सर्व उपचारांची हारच! त्याच हरलेल्या, पडलेल्या मानेने आम्ही गेलो. सुरुवातीचे पैसे वगैरे घेण्यासारखी महत्वाची कामे झाल्यावर तपासण्यासारखी मामुली कामे करायची वाट बघत बसलो. समोर टीव्हीवर ढिगाने चौकोनी बॉक्स दिसत होते.
प्रत्येकाच्या पावसाच्या अनेक तऱ्हेच्या आठवणी असतात तशा माझ्याही आहेत. त्यातलीच एक आठवण आहे शांतव्वाची. तिची आठवण येताच डोळ्यातले अश्रू थिजून जातात. अंगावर शिरशिरी येते, नकळत मन विद्ध होते. एका पावसाळ्यात पहाटे कधीतरी ती रस्त्यावर मरून पडली होती, ओला होता तिचा देह पण काळजातली धग म्लान चेहऱ्यावर निखाऱ्यांच्या रेषा चितारून गेली होती. तिच्या मुठी खुल्याच होत्या, जबडा बंद होता अन चांदवलेले डोळे सताड उघडे होते. कदाचित ती मरताना अस्मानातून चंद्र तिच्या डोळ्यात उतरला असावा, मायेने विचारपूस करताना तिच्या डोळ्यातल्या वेदनांच्या खाऱ्या पाण्यात विरघळून गेला असावा....
मायबोलीवर स्त्रीया बरेचदा फॅशन ,कपडे,हेअरस्टाईल यावर धागे काढुन चर्चा करताना दिसतात.आवडते कपडे कुठे मिळतात,ऑनलाईन कोणत्या वेबसाईट चांगल्या आहेत यावर चर्चा होताना दिसते.बर्याच चांगल्या चर्चा असतात या.
पण मायबोलीवर पुरुषांसाठी असा कुठलाही धागा नाही.तसा विभाग नाही.नुकताच मी स्वतः चा मेकोव्हर केला,लांब केस कापून स्लीक्ड बॅक अंडरकट हेअरस्टाईल ठेवली. लेटेस्ट फॅशन ट्रेंड चाळताना मायबोलीवर फार काही मिळालं नाही ,म्हणून हा प्रपंच.
मागच्या आठवड्यात मुलं आणि नवरा भारतात आले आणि मी एकटीच बॉस्टनमध्ये. दोन आठवड्यानी मी येणारच होते. सुरुवातीला हे असं बुकींग केलं तेंव्हा मनात बरेच मनोरे रचले होते. आता 'आई' म्हणून ते समोर मांडले की त्यावर टीकाही होऊ शकते पण दोन आठवडे एकटीच असताना भरपूर टीव्ही पाहायचा, मनोसक्त आराम करायचा आणि बरेच लिखाण पूर्ण करायचे असं ठरवलं होतं. मुलं घरातून गेली आणि घर एकदम शांत झालं. रविवारी बरीचशी कामे पूर्ण केली. तरीही भरपूर वेळ उरला. पण लिहिण्याची मात्र अजिबात इच्छा होत नव्हती. मन एकदम सुन्न झालं होतं. तिसऱ्याच दिवशी तिकीट बदलून घेतलं आणि चार दिवसांत घरी पोचले.
फार पुरातन काळा पासून माणसं त्यांना पडणाऱ्या स्वप्नांचे अर्थ लावण्याचा प्रयत्न करत आलेत. स्वप्नात भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत, पूर्व सूचना मिळतात असे मानले जाते. माणसाना भेडसावणाऱ्या चिंता स्वप्नांचे रूप घेऊन येतात किंवा ईश्वर बऱ्याचदा आपल्या भक्तांशी संवाद साधायला स्वप्न एक माध्यम म्हणून वापरतो असेही मानले जाते. अनेक कवी, लेखक, नाटककार, चित्रकार आदींना त्यांच्या कलाकृती साकार करण्याची प्रेरणा स्वप्नातून मिळाल्याचे सांगितले आहे.
लोकांच्या मते एक वय असतं उत्साहाचं, उमेदीचं, काहीतरी शिकण्याचं, करून दाखवण्याचं........ त्या मताला कधीही काडीमात्र सुद्धा किंमत देऊ नये.
पण कॉलेज संपलं, नोकरी लागली, लग्न संसार यात अडकलं की नवीन काहीतरी शिकण्याचा, करण्याचा उत्साह कमी होत जातो. वय, वेळ, affordability, संकोच, संसाराच्या जबाबदाऱ्या, लोकांच्या नजरा/टोमणे.... एक ना अनेक कारणं....
अरे आता या वयात कुठं जाऊ गाडी शिकायला?
अरे पण वेळ कुठंय? मुलांच्या शाळा, माझा जॉब, घराची कामं, जाणार कधी?