व्यक्तिमत्व

व्यक्तिमत्व

आजीबाईंची शाळा

Submitted by सेन्साय on 15 February, 2017 - 22:09

तुम्हाला अभिमान वाटेल, भारतातली पहिली आजीबाईंची शाळा भरतेय महाराष्ट्रातल्या एका खेड्यात...
या शाळेत नाव दाखल करायचं असेल तर तुमचं वय किमान ६० वर्षं असायला हवं बरं का... ही भारतातली पहिलीच आजीबाईंसाठीची शाळा आहे. ही शाळा पुण्यासारख्या मोठ्या शहरात नाही, तर आहे एका लहानशा खेडेगावात. या नावाचं गावही तुम्ही कधी ऐकलं नसेल. हे आहे आपल्या ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यातलं फांगणे नावाचं गाव. गेल्या वर्षी ८ मार्च २०१६ ला म्हणजेच जागतिक महिला दिनी या शाळेचं उद्घाटन झालंय आणि महिन्याभरात या शाळेला एक वर्ष पूर्णही होईल.

तडका - काळजी घ्या

Submitted by vishal maske on 9 February, 2017 - 09:12

काळजी घ्या

सहज तोडता येतो म्हणून
आकलेचा तारा तोडू नये
जोडायचा म्हणून ऊगीच
काहिही संबंध जोडू नये

आपलं बोलणं म्हणजे कधीच
तो बाताड्या तुण-तुना नसावा
आपल्या प्रत्येक बोलण्याला
प्रबळ वास्तवी कणा असावा

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

बाळ! तू मोठेपणी कोण होणार?

Submitted by सचिन काळे on 5 February, 2017 - 21:23

'बाळ! तू मोठेपणी कोण होणार?' हा प्रश्न मला वाटतं बालपणी कोणालाही चुकलेला नाही. घरी आलेले पाहूणे सहज कौतुकाने बाळांना विचारत. आणि बहुतेक बाळांचे ह्यावर ठरलेले उत्तर असायचे. "मी ना! डाकतल होणार आणि सर्वांना टोची टोची कलणाल" नाहीतर "मी ना! अमिता बच्चन होणार आणि ढिशुम ढिशुम कलणाल" ह्यावर पाहुणे बाळाचा गालगुच्चा घेऊन "हो का रे लब्बाडा!" असे म्हणत बाळाची प्रेमाने पापी घेत. आणि तिकडे बाळाच्या आईवडिलांनाही आपल्या बाळाला कुठे ठेऊ आणि कुठे नको असं होऊन जाई. काही बाळांना मोठेपणी 'परी' तर काहींना 'बाप्पा' व्हावेसे वाटे.

शब्दखुणा: 

तडका - पक्ष सोडण्यास कारण की

Submitted by vishal maske on 2 February, 2017 - 19:29

पक्ष सोडण्यास कारण की

जिकडे डाळ दिसेल तिकडे
हल्ली पोळ्या जाऊ लागल्या
अन् आयारामांच्या टोळ्यांसह
गयाराम टोळ्या होऊ लागल्या

स्वार्थाविना राजकारणास
त्यांचे मनही संमत नाही,.?
पक्ष सोडण्यास कारण की
तुमचे आमचे जमत नाही,.!

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - दारू बंदी,...!

Submitted by vishal maske on 31 January, 2017 - 08:13

दारू बंदी,...!

कित्तेकजण सांगुन गेलेत
कुणी अजुनही सांगत आहेत
दारूला वाईट म्हटलं तरीही
दारूने माणसं झिंगत आहेत

दारूच्या आहारी गेलं तर
सुखी कुटूंबही खपत आहे
मात्र इथली दारूबंदी तर
जाणीवपुर्वक रापत आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - व्यक्तीमत्व विकास

Submitted by vishal maske on 27 January, 2017 - 09:49

व्यक्तीमत्व विकास

माणसाचं मन सदैव
प्रसिध्दिसाठी फिरते
माणसाची किंमत हि
व्यक्तीमत्वावर ठरते

जरासं जमजुन घेतलं तर
हे जीवन होईल झकास
आपल्या व्यक्तीमत्वाचा
आपणच करावा विकास

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

भारत म्हणजे काय ?

Submitted by वि.शो.बि. on 26 January, 2017 - 03:13

भा म्हणजे "तेज" आणि रत म्हणजे "रमलेला" असा तेजात रमलेला देश म्हणजे माझा भारत देश
या देशा बद्दल काहि scientist काहि नोबेल विजेता काहि प्रतिष्टित लोकांनी काढलेले उदगार भारत वासियानसाठि..........

भारत की प्रशंशा में कहे गए कथन

Quote 1:We owe a lot to the Indians, who taught us how to count, without which no worthwhile scientific discovery could have been made.In Hindi :हम भारतीयों के कृतज्ञ हैं , जिन्होंने हमें गिनना सिखाया , जिसके बिना कोई सार्थक वैज्ञानिक खोज नहीं की जा सकती थी .
........Albert Einstein ऐल्बर्ट आइन्स्टीन

सोनी टीव्ही: पेशवा बाजीराव मालिका

Submitted by निमिष_सोनार on 24 January, 2017 - 05:09

सोनी TV वर हिंदीतून २३ जानेवारी २०१७ पासून रोज (सोम-शुक्र) संध्याकाळी ७:३० वाजता भव्य दिव्य "पेशवा बाजीराव" मालिका सुरु झाली आहे. पहिला एपिसोड मी बघितला. एका तासाचा होता. मला खूप आवडला. एखादा भव्य दिव्य ऐतिहासिक चित्रपट बघतोय असेच वाटत होते.

उत्तम आणि श्रीमंत निर्मितीमूल्ये आहेत. कलाकारांचा अभिनय छान वाटला. एडिटिंग टाईट आहे. कथा रेंगाळत नाही! यात घटना खूप नाटकीय पद्धतीने पेश केल्या आहेत तरीही त्यामुळेच बघायला इंटरेस्ट वाटतो नाहीतर मग अशा ऐतिहासिक कथा डॉक्युमेंटरी वाटण्याची भीती असते.

तडका - लाच

Submitted by vishal maske on 20 January, 2017 - 19:21

लाच

घेताही येत नाही
देताही येत नाही
तरी देखील लाच
बंद का होत नाही

कुठे ना कुठे रोज-रोज
हि समाजात भेटते आहे
विकासाच्या प्रगतीचा
लाच गळा घोटते आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - जन आकांक्षा

Submitted by vishal maske on 19 January, 2017 - 08:35

जन आकांक्षा

कुणी म्हणाले जुळून येईल
कुणी म्हणाले तुटून जाईल
युती जुळणार की सुटणार हे
घोषणे अंतीच पटुन येईल

मात्र चर्चा-चर्चांमधून ऊगीचंच
शंका-कुशंका विणल्या आहेत
अन् राजकीय सुत्र हेरता-हेरता
जन आकांक्षा ताणल्या आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

Pages

Subscribe to RSS - व्यक्तिमत्व