व्यक्तिमत्व

व्यक्तिमत्व

कहाणी मराठी ग्रीटींग्सची

Submitted by अश्विनी कंठी on 24 December, 2017 - 23:58

पुण्यात रहाणाऱ्याला डेक्कन जिमखान्यावरचे ‘ग्रीटवेल’ दुकान माहित असणारच. हे पुण्यातले पहिले वहिले फक्त ग्रीटिंग कार्ड्स आणि गिफ्ट आर्टिकल्स विकणारे दुकान! १९७८ मध्ये श्री. दिलीप जाधव आणि त्यांचे जेष्ठ बंधू श्री. नंदकुमार जाधव यांनी ग्रीटवेल सुरु केले. गेली एकोणचाळीस वर्षे या व्यवसायात असणाऱ्या जाधव सरांनी मराठी ग्रीटींग्स बाजारात रुजवण्याकरता अथक प्रयत्न केले आहेत. या विषयी त्यांच्याशी मारलेल्या गप्पा ......

रुंबा

Submitted by विद्या भुतकर on 30 November, 2017 - 23:33

काल आमच्या घरी एक नवीन मशीन आलं, iROBOT Roomba. गेल्या दोनेक वर्षांपासून ऐकलं होतं आणि लोकांकडे पाहिलंही होतं. खरं सांगायचं तर कॉलेजपासून 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' हा माझा आवडता विषय. माणसाचा मेंदू एका सेकंदात किती विचार करतो आणि किती निर्णय घेतो याचा अंदाज AI शिकताना येतो. समजा, तुम्ही गाडी घेऊन एका चौकात उभे आहात, आता तुमचा ग्रीन सिग्नल लागणार पुढच्या पाच सेकंदांत, समोरच्या बाजूचे लोक अजूनही जात आहेतच, शेजारी उभा राहिलेला गाडीवाला नुसता पेटलाय कधी एकदा रस्ता पार करतोय यासाठी, तुम्ही त्याच्याकडे, त्याच्या मागे असलेल्या मुलीकडे, समोर उभ्या असलेल्या काकूंकडे बघता.

जिव्हाळ्याच्या गोष्टी

Submitted by विद्या भुतकर on 28 November, 2017 - 23:15

आज पिठलं बनवत होते, गाठीचं, म्हणजे ज्यात बारीक बारीक गाठी दिसतात असं. मला ते घोटलेलं आवडत नाही. असो. तर ते बनवताना त्यात मी भरडलेले शेंगदाणे टाकते. ते माझ्याकडे असलेल्या कुटामधून निवडून टाकत होते. त्यावरून पुढे मग बरंच काही आठवलं. आणि वाटलं 'शेंगदाणे' या जिव्हाळ्याच्या विषयावर आपण अजून लिहिलं कसं नाहीये? म्हणून सुरुवातीपासून सुरवात करतेय.

तो - ती आणि.......

Submitted by सिम्बा on 22 November, 2017 - 07:15

एक उद्योग घराण्याची वारसदार, एक रिअलिटी tv शो जिंकणारा यशस्वी मॉडेल, एक राष्ट्रीय दर्जाची रौप्य पदक जिंकणारी अथलीट, आणि एक नौदलाचा तरुण सैनिक या सगळ्यांच्या जीवनकथेत एक सामायिक धागा आहे असे सांगितले तर तो शोधता येईल का?

जगात आढळणाऱ्या यच्चयावत जिवंत गोष्टींचे आपण पुल्लिंग किंवा स्त्रीलिंग म्हणून वर्गीकरण करून टाकले आहे. नाही म्हणायला कोर्टाच्या आदेशा वरून सरकारी पातळीवर तिसरे लिंग म्हणून “ट्रान्सजेन्डर” ला मान्यता मिळाली आहे,पण प्रत्यक्षात सरकारी form वर लिंग- या रकान्यात अजून तरी तिसरा पर्याय अवतरला नाही आहे.

अजि म्यां पु.ल. पाहिले

Submitted by अश्विनी कंठी on 19 November, 2017 - 21:06

माझ्या वडिलांनी श्री.वसंतराव देशपांडे यांचा एक वाढदिवस आमच्या गच्चीवर अनेक मित्र मंडळीबरोबर साजरा केला होता.आम्ही त्या निमित्ताने पु. ल. देशपांडे ह्यांना देखील आमच्या घरी येण्याची विनंती केली होती.त्या प्रसंगी प्रोफेशनल फोटोग्राफर बोलावून आम्ही त्या दोघांचे काही फोटो काढले होते. त्यातला एक फोटो पु. ल. देशपांडे यांना आवडला होता. त्याची कॉपी सुनीताबाईंनी मागितली होती. माझ्या वडिलांनी मला मुद्दाम आई बरोबर फोटो द्यायला जायला सांगितले.आणि म्हणूनच माझ्या आयुष्यात तो सुवर्ण क्षण आला होता.

प्रांत/गाव: 

हनम्या !

Submitted by विद्या भुतकर on 19 November, 2017 - 18:14

हनम्या उठला तर तांबडं फुटलं हुतं. दारात दोन कुत्री अंगावर चढून सकाळच्या पारीच सुरु झाल्याली. त्यांच्या केकाटन्यानंच जाग आल्याली. 'आरं हाड !' म्हणत त्यानं एक दगड हनला. पर त्यान्ला लईच जोर आल्याला. ती काय जाईनात. हनम्यानं त्यांचा नाद सोडला आन कांबरून उचलाय सुरुवात केली. घोंगड्याची वळकटी बांधून कोपऱ्यात लावली. गोधडीची शिस्तीत घडी केली. त्यावर उशी ठिवून दोन्ही एका कोनाड्यात ठेवलं. झोपेतच तंबाकूचा तोबरा भरून त्यानं लोटा हातात घेतला. परसाकडला जाऊन यीस्तवर उजाडलं हुतं.
परतीच्या रस्त्यावरच त्याला मामा दिसला. मामा म्हंजी त्याचाच मामा गावाच्या वेशीकडं जाताना दिसला.

!! श्रद्धांजली !!

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 13 November, 2017 - 01:03

एखादी व्यक्ती जन्माला येते ती अनेक गुणांचे पुंजके घेऊनच. आयुष्याच्या वेगवेगळ्या वाटेवर त्यांचे विविध पैलू विखुरले जात असतात. अशीच एक विविध पैलूंनी आपले आयुष्य जगून गेलेली व्यक्ती म्हणजे माझे वडील कै. शशिकांत गणपत घरत उर्फ अण्णा. अण्णांचा जन्म रायगड जिल्ह्यातील उरण येथील फुंडे गावचा. आई,वडील चार भाऊ आणि पाच बहिणी असा आग्री समाजातील भला मोठा परिवार. अण्णा भावांमध्ये शेंडेफळ. अण्णांचे वडील रेल्वेमध्ये कामाला होते. घरी शेती व मिठागरे होती. अण्णांचे वडील म्हणजे माझे आजोबा शिस्तीने कडक व शिक्षण प्रिय असल्याने सगळ्या मुलांना सक्तीने शाळेत घातलेले.

पोस्ट दिवाळी डीटॉक्स

Submitted by विद्या भुतकर on 24 October, 2017 - 23:09

डिस्क्लेमर: या पोस्टमध्ये 'पोस्ट दिवाळी डीटॉक्स' बद्दल कुठलेही शॉर्टकट मिळणार नाहीत. पण दिवाळीनंतर एकदम हॉट टॉपिक असल्याने त्याचं नाव हे दिलंय. तितकेच कुणी वाचेल तर चांगलेच आहे. Happy

अनामिक...

Submitted by सेन्साय on 12 October, 2017 - 22:08

.

.

वेचीत संसर्ग पुरुषत्वाचे
कुंथत चाले कुड़ी प्राणाचे
नाते अगतिक आवेगाचे
प्रेमरहित फक्त भोगाचे

अवयव मांसल की गोरे
परिक्षण येथे सर्व निलाजरे
नशिबाचे भोग हे सारे
क्रुर चटके कधी न संपणारे

निश्चल मन अचल शरिरे
वासनेचे येथे रंग गहिरे
पांढरपेश्याची ही लक्तरे
कामांध निव्वळ लांडगे सारे

अनामिक उद्वेग सुरुवातीचे
भयही सरले बलात्काराचे
दुश्चक्र फेर धरोनि नाचे
गणित हरवले वेळ काळाचे

Pages

Subscribe to RSS - व्यक्तिमत्व