Submitted by सेन्साय on 12 October, 2017 - 22:08
.
.
वेचीत संसर्ग पुरुषत्वाचे
कुंथत चाले कुड़ी प्राणाचे
नाते अगतिक आवेगाचे
प्रेमरहित फक्त भोगाचे
अवयव मांसल की गोरे
परिक्षण येथे सर्व निलाजरे
नशिबाचे भोग हे सारे
क्रुर चटके कधी न संपणारे
निश्चल मन अचल शरिरे
वासनेचे येथे रंग गहिरे
पांढरपेश्याची ही लक्तरे
कामांध निव्वळ लांडगे सारे
अनामिक उद्वेग सुरुवातीचे
भयही सरले बलात्काराचे
दुश्चक्र फेर धरोनि नाचे
गणित हरवले वेळ काळाचे
नाती गोती जुनी विसरोनि
गतकाळ रंगित सारा पुसोनी
असहाय्य येथे मरणेच्छा धरोनी
बदनाम वस्ती अनामिक रस्त्यानी
उरलीय आता .... फक्त कामिनी
― अंबज्ञ
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अंबज्ञ, अगदी हृदयद्रावक कविता
अंबज्ञ, अगदी हृदयद्रावक कविता आहे.
अगदी हृदयद्रावक कविता आहे>+१
अगदी हृदयद्रावक कविता आहे>+१
_/\_https://www.maayboli.com
_/\_
https://www.maayboli.com/node/63456
आंबद्न्य - तुम्हाला सरस्वती
आंबद्न्य - तुम्हाला सरस्वती प्रसन्न आहे.. अतिशय करुण लिहिले आहे.. खूप खूप शुभेच्छा !
अगदी हृदयद्रावक कविता आहे>
अगदी हृदयद्रावक कविता आहे>+१११
अप्रतिम...
अप्रतिम...
अगदी हृदयद्रावक कविता आहे>+१११
नाती गोती जुनी विसरोनि
नाती गोती जुनी विसरोनि
गतकाळ रंगित सारा पुसोनी
असहाय्य येथे मरणेच्छा धरोनी
बदनाम वस्ती अनामिक रस्त्यानी
उरलीय आता .... फक्त कामिनी
विदारक सत्य !!!
अगदी हृदयद्रावक कविता आहे>
अगदी हृदयद्रावक कविता आहे> +११११११
VB, दत्तात्रय, मेघा, सायुरी,
VB, दत्तात्रय, मेघा, सायुरी, च्रप्स, सचिनजी, अक्षय, राहुल
सर्वांचे मनपूर्वक आभार.