व्यक्तिमत्व
व्यक्तिमत्व
पाच किलोमीटर आणि बरेच काही...शेवटचा भाग !
पळणं म्हणजे नक्की कसं? तुम्ही जर कुत्रं मागे लागल्यासारखं किंवा आपल्या दोन वर्षाच्या मुलामागे लाडाने किंवा दोस्ताना मधल्या अभिषेक बच्चन सारखं पळत असाल तर... चूक!!! माझा गुढगा दुखायला लागला आणि मग मी अनेक गोष्टी वाचल्या कि कसं पळलं पाहिजे. खांदे ताठ, मान आणि नजर समोर, कंबर पाण्याची घागर घेऊन जाताना असते तशी स्थिर, पाठ सरळ, हनुवटी बाहेर नको, हाताच्या मुठीत अंड घेउन जात आहे असे अलगद वळलेल्या, पाय जमिनीवर पडतानाही पंजे आधी आणि टाच नंतर पडली पाहिजे. श्वास इतकाच जोरात असावा कि शेजारी कुणी असेल तर त्याच्याशी बोलता आलं पाहिजे.
पाच किलोमीटर आणि बरेच काही...भाग २
'मला वाटतय त्या शामचाच काहीतरी हात असणार बघ', म्हणत मी रात्री सोफ्यावर बसले. एक तीस मिनिटांची हिंदी मालिका बघायची, मेल, फेसबुक चेक करायचे आणि झोप हाच काय तो दिवसभरात स्वत:साठी मिळालेला वेळ. तेही सानू आणि स्वनिक झोपल्यावर. नाहीतर मग रहाटगाडगं चालूच. बरं बसावं म्हटल टीव्ही लावून पोरं जागी असताना तर ते झोपल्यावर बघून अपराध्यासारखं वाटत की तेव्हढाही वेळ दिला नाही म्हणून त्यांना. तर हे असं होणारच होतं. त्यामुळे मी जेव्हा स्वत:साठी दुपारी का होईना वेळ काढुन पळायला जायला लागले तेव्हा सही वाटलं. आणि ५ किमी पळाल्यावर तर अजूनच भारी वाटत होतं.
पाच किलोमीटर आणि बरंच काही…. भाग १
ही गोष्ट आहे माझ्या पहिल्या वहिल्या हाफ मॅरॅथॉन ची. आता इतके लोक इतक्या शर्यती पळतात. त्यात माझी विशेष अशी काही नाही. पण माझ्यासाठी खासंच ती. कारण त्याची सुरुवातच झाली ती माझ्या तिशीनंतर. माझं खूप काही वय वगैरे झालं नाहीये पण वयाच्या तीस वर्षापर्यंत अभ्यास, कॉलेज, नोकरी, मुलं, इ जे काही सर्व लोक करतात तसं करून झालं. थोडं- फार इकडे तिकडे. कधीही खेळात, कुठल्या शर्यतीत भाग घेतला नाही शाळेत. त्यामुळे पहिली हाफ मॅरॅथॉन माझ्यासाठी खासच होती. तिची सुरुवात मात्र एका ५ किमी अंतराच्या रेसने झाली. आजची पोस्ट त्याच्याबद्दलच.
‘प्रसारमाध्यमांत सर्व भाषांचा बळी जातोय, ही विचारशक्तीला मारक गोष्ट आहे’ - मुलाखत - श्री. दिलीप पाडगांवकर / श्री. आनंद आगाशे
ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत श्री. दिलीप पाडगांवकर यांचं परवा पुण्यात निधन झालं. पॅरिसमध्ये उच्चशिक्षण घेतल्यानंतर वयाच्या चोविसाव्या वर्षी ‘टाईम्स ऑफ इंडिया’नं त्यांची तेथील प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली होती. १९७८ ते १९८६ या काळात त्यांनी 'युनेस्को'त बँकॉक आणि पॅरिस इथे काम केलं. पुढे १९८८ साली 'टाईम्स ऑफ इंडिया'च्या संपादकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. सहा वर्षं ते या पदावर होते. पुढे या ना त्या स्वरूपात त्यांचा 'टाईम्स'शी असलेला संबंध कायम राहिला. डॉ.
तडका - आपले अधिकार
आपले अधिकार
माणसं फसतात म्हणून
सहज फसवले जातात
पैशाचे अमिश दाखवुन
सहज ऊसवले जातात
स्वाभिमान ठेवत गहाण
कुणी पैशा पुढे झूकू नयेत
माणसांनी आपले अधिकार
कवडीमोल विकू नयेत
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
कर्मयोगी एकनाथजी रानडे भाग १
सरदार वल्लभभाई पटेल म्हणतात, मला जर का लोकं लोह पुरुष म्हणत असतील तर एक पोलादी पुरुषही आहे आणि तो म्हणजे 'एकनाथजी'
विवेकानंदांच्या विचारांचा अभ्यास करणाऱ्या व त्यांच्यापासून प्रेरणा घेणाऱ्या अनेक व्यक्ती आहेत पण त्यांच्या रक्तात, नसानसात विवेकानंद भिनलेले आहेत अश्या प्रामुख्याने व ठळक तीन व्यक्ती आहेत प्रथम क्रमांकावर भगिनी निवेदिता, सुभाषचंद्र बोस व तिसरी व्यक्ती माननीय एकनाथजी रानडे!
कर्मयोगी एकनाथजी रानडे भाग १
सरदार वल्लभभाई पटेल म्हणतात, मला जर का लोकं लोह पुरुष म्हणत असतील तर एक पोलादी पुरुषही आहे आणि तो म्हणजे 'एकनाथजी'
विवेकानंदांच्या विचारांचा अभ्यास करणाऱ्या व त्यांच्यापासून प्रेरणा घेणाऱ्या अनेक व्यक्ती आहेत पण त्यांच्या रक्तात, नसानसात विवेकानंद भिनलेले आहेत अश्या प्रामुख्याने व ठळक तीन व्यक्ती आहेत प्रथम क्रमांकावर भगिनी निवेदिता, सुभाषचंद्र बोस व तिसरी व्यक्ती माननीय एकनाथजी रानडे!
कर्मयोगी श्री एकनाथजी रानडे- भाग २ :कहाणी विवेकानंद शिलास्मारकाची
एकनाथजी रानडे यांचे कार्य:
शिलास्मारकाची कथा एकनाथजींच्या आत्मचरित्रापासून वेगळी करणे अशक्य आहे. ज्यांनी प्रत्येक अडथळा संधीमध्ये परिवर्तित केला, प्रत्येक आव्हानाचे रूपांतर विजयात केले, अश्या असामान्य व्यक्तित्वाचे गुण सांगणे एका छोट्या लेखात शक्य नाही. तरीही हा छोटासा प्रयत्न:
अशी कोणतीही समस्याच नव्हती त्यावरचा उपाय त्यांच्याजवळ नव्हता,
त्यांचे स्वतःचे शब्दच द्यायचे तर ," प्रत्येक डावपेचाला प्रति-डावपेच, प्रत्येक शस्राला प्रतिशस्त्र असतेच ", या सत्याने समग्र दर्शन, निवारण होणारच अशा अडचणीतून एकनाथजींनी कसा मार्ग काढला यातून होते.