Submitted by मंजूताई on 27 September, 2016 - 05:58
केंद्र वर्गात मिनु बायदेव आसामीत एक गाणं गाऊ लागली अन अंगावर सरकन काटा आला .... आसामी भाषेतलं मला अ की ठ कळतं नाही पण ज्या आर्ततेने ती म्हणत होती ......ते थेट मनाला भिडलं होतं.... गाणं संपल्यावर मोडक्या तोडक्या हिंदीत तिने गाण्याचा भावार्थ सांगितला..... त्यातला मला किती कळला? पण एवढचं लक्षात आलं की प्रत्येक असमीया स्त्रीच्या मनात तिच्या बद्दल अपार माया व श्रध्दा आहे. मनांत कुठेतरी 'जयमती' रुतुन बसली व ती स्वस्थ बसू देईना. धेमाजीतली पुस्तक दुकाने, वाचनालय शोधले पण कुठे काही साहित्य मिळेना .
दादर माटुंगा बांद्रा माहिम या परिसरातील समुपदेशकांबद्दल माहिती हवी आहे. जवळच्या नात्यातील एका व्यक्तीला डिप्रेशन सिंड्रोम्स दिसत आहेत. कृपया कोणाला एखाद्या चांगल्या समुपदेशकाबद्दल माहिती असल्यास सांगा. धन्यवाद.
Submitted by मंजूताई on 20 September, 2016 - 06:49
वयच काय होतं तिचं! खेळण्या बागडण्याच दिवस होते तिचे! पण थोरामोठ्यांनी तोंडात बोट घालावं असं तिने अभूतपूर्व साहस अजाणत्या वयात करुन दाखवलंय व आज ती कित्येकांची प्रेरणास्थान बनली आहे. तिच्या धाडसाचं वर्णन भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरल्या गेलंय.
ही घटना आहे एकोणीसशे बेचाळीसची! महात्मा गांधीजींच्या चले जाव चळवळीने जोर धरला होता. लाखो लोक ह्या आंदोलनात सहभागी झाले होते. आसामातील जनताही ह्या चळवळीत सक्रीय सहभागी झाली होती. ठिकठिकाणी सभा, मोर्चे, सत्याग्रह होत होते.
लोकशाही टिकवण्याबरोबरच ती अधिकाधिक परिपक्व व्हावी, या हेतूनं दरवर्षी 'लोकशाही उत्सव' साजरा केला जातो. परिसंवाद, प्रदर्शनं, मैफिली, चित्रपट, नाटकं अशा अनेक कार्यक्रमांचं आयोजन या उत्सवात केलं जातं.
गेल्या वर्षीच्या लोकशाही उत्सवात प्रसिद्ध चित्रपट-दिग्दर्शक व लेखक श्री. सुनील सुकथनकर यांनी 'अभिव्यक्तिस्वातंत्र्य व आजची स्थिती' या विषयावर मांडणी केली होती.
१२ सप्टेंबर.उंचपुऱ्या देखण्या जेरेमी ब्रेट ला जगातून गेल्याला आज २१ वर्षं होतील.अजूनही जुने बी.आर.चोप्रा महाभारत पाहिलेल्यांच्या डोळ्यासमोर कृष्णाचं नाव काढलं की फक्त नितीश भारद्वाज येतो तसं शेरलॉक होम्स म्हटलं की जगातल्या बहुतांश लोकांच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त जेरेमी ब्रेट येतो.
Submitted by Suyog Shilwant on 9 September, 2016 - 17:37
लहान असल्यापासुन ते म्हातारं होई पर्यंत आपल्या धर्मामधे इतक्या छान छान गोष्टी सांगितलेल्या आहेत. मी लहान असताना माझ्या आईने एक श्लोक शिकवला होता. जेवायला बसलो कि म्हण असं ती म्हणायची तेव्हा मी कटकट करायचो. काय तो तोच तोच श्लोक म्हणायचा मला इथे भुक लागलेय समोर घोडा का शेरा दिसतोय पण आई आपली म्हणतेय अम्म्म्म पहिले म्हण आई हातावर फटका मारुन श्लोक म्हणवुन घ्यायची.
" वदनी कवलं घेता नाम घ्या श्री हरी चे,
सहज हवन होते नाम घेता फुका चे||
जिवन करी जिवित्वा अन्न हे पुर्ण ब्रह्म ,
उदर भरणं नोहे, जानियेजे यज्ञ कर्म || "
Submitted by स्वीटर टॉकर on 8 September, 2016 - 12:53
माझे वडील स्टेट बॅन्केत असल्यामुळे आम्ही दर काही वर्षांनी महाराष्ट्रातच पण नवीन ठिकाणी स्थलांतरित व्हायचो. माझ्या आईवडिलांना भाषणं ऐकायची अतिशय आवड होती. गावात कोणीही चांगला वक्ता आला की दोघही मला घेऊन जायचे. वसंत व्याख्यानमाला तर कधीही चुकवली नाही. त्या विचारवंतांचे विचार, ते मांडण्याची पद्धत, एखादा अवघड मुद्दा सोप्या उदाहरणांचा आधार घेऊन समजावून देण्याची हातोटी आणि मुख्य म्हणजे त्यांनी केलेलं कार्य, हे सगळं बघून मी भारून जायची.
तुमच्या आमच्यासारखेच हे लोक, पण अवतीभवतीच्या जगाच्या निरीक्षणातून, त्यांना आलेल्या चांगल्यावाईट अनुभवांतून, संकटांमधून हे किती वेगळी आणि सकारात्मक शिकवण घेतात!
Submitted by अजातशत्रू on 8 September, 2016 - 07:33
जगणं सुंदर आहेच पण या सुंदर जगण्याचा भयाण नरक कसा होतो व आयुष्याची, स्वप्नांची धूळधाण कशी होते याची आर्त शोकांतिका म्हणजे देखण्या विमीची चित्तरकथा ..... विम्मी जेंव्हा अनंताच्या यात्रेस गेली तेंव्हा तिचा मृतदेह शेंगा-फुटाणे विकायच्या ठेल्यावरून सांताक्रूझच्या स्मशानभूमीत नेला होता ! तिच्या सर्वांगाला दारूचा वास येत होता आणि तिचा मित्र जॉली याच्यासह फक्त चारेक माणसे तिचं पार्थिव ठेवलेला तो हातगाडा ढकलत नेत होते. हिंदी सिनेमाच्या इतिहासात सर्वात उपेक्षित असा भयाण मृत्यू विमीचाच झाला होता.
Submitted by अजातशत्रू on 3 September, 2016 - 03:59
राजकारण साभाळत सांस्कृतिक नाती जपणे हे शरद पवारांनी अगदी नेमकेपणाने सिद्ध केले. शरद पवार, पुलं, गदिमा आणि पी सावळाराम यांची ही आठवण वाचकांनाही समृद्ध करून जाईल यात शंका नाही.
२००३ साली शरद पवारांनी बारामतीत गदिमांच्या नावाने मोठे सभागृह बांधले, त्यावेळी दस्तुरखुद्द शरद पवारांनी सांगितलेला हा किस्सा आहे. ग.दि.माडगूळकर आणि पी.सावळाराम या प्रतिभावंत साहित्यिकांशी हा किस्सा संबंधित असल्याने याला वेगळी किनार आहे.....
राजकारणाचे एक युग गाजवलेल्या अन आपल्याच पक्षाच्या सद्य विचारसरणीहून भिन्न विचारशैली व मर्यादेचे सजग समाजभान असणारया, आपल्या विचारधारांशी समर्पित राहिलेल्या राष्ट्रतेज अटलजींची आज उणीव भासत्येय आणि त्यांची किंमत अधिक प्रखरतेने लक्षात येतेय. वाजपेयीजींच्या काळातील लोकसभेच्या निवडणुकात मी भाजप उमेदवारास पसंती दिली होती. अपेक्षित असलेले बदल त्यांच्या काळात मोठ्या प्रमाणात झाले नाहीत त्याच बरोबर फारशी निराशाही पदरी पडली नाही. यथातथा असे ते अनुभव होते. मात्र काँग्रेसच्या भ्रष्ट शासनापेक्षा त्यांचे सरकार उजवे वाटायचे.