एका झपाटयात लागोपाठ कॉमनवेल्थ गेम्स २०१०, इस्तंबुलमध्ये २०११ FILA विश्व कुस्ती चॅम्पियनशिप आणि लंडन ऑलंपिक्स २०१२.. या स्पर्धांमध्ये सुल्तान भारताला विजय मिळवून देतो हे पचनी पडत नाही, कारण या गोष्टी खजूर खाल्ल्यासारख्या अन विटांचे ढिगारे उचलण्याइतक्या सोप्या नसतात. आपल्याकडे पब्लिकला 'च्यु' समजून काहीही दाखवायची दिग्दर्शकांना खोड आहे. उदाहरणार्थ - 'बागबान'मधल्या अमिताभला पहिल्याच पुस्तकासाठी थेट बुकर मिळते असं दाखवलं होतं. 'स्वदेस'मधला शाहरुख थेट नासात 'इमाणाचे राकेट' उडवतो.
दोन मित्रांचे लग्न एकाच स्त्रीशी आलटून पालटून झाले तर ? हे सामंजस्याने घडू शकते का ?
खऱ्या मैत्रीत स्त्री संबंध कधीच दुरावा आणू शकत नाहीत याचा प्रत्यय देणारी वेधक मित्र- प्रेमाची शायरीने सजलेली सत्यगाथा..
दोन जिवलग मित्र. दोघेही अप्रतिम प्रतिभावंत शायर.
त्यापैकी वयाने मोठा असणारा असगर आणि कमी वयाचा जिगर.
जिगरची आई १० व्या वर्षी वारलेली तर वडील १५ व्या वर्षी निवर्तलेले. शिवाय त्याचा निकाह जिच्यासोबत झाला होता ती देखील लवकर वारली.
वाहिदन असं त्या अभागी स्त्रीचं नाव होतं.
या नंतर तो आग्र्याच्या एका वेश्येच्या प्रेमात पडला होता, शिराज तिचं नाव.
हडकुळा, घामटलेला, करपलेल्या चेहऱ्याचा 'तो' रात्र रस्त्यात वितळताच गुहेतून श्वापद बाहेर पडावा तसा पडतो. 'तो' हिशोबात कमजोर आहे, त्याचे हिशोब वेगळे आहेत. मात्र त्याची नजर एकाच वेळी दया यावी अशी अन भीतीही वाटावी अशी आहे. तो देवाशी बोलतो, कुत्र्यांच्या अंगावर धावून जातो, भिंतींवर ओरखडे काढतो, खिडकीच्या गजांत डोळे भिनवतो, वटवाघळासारखा झोंबाडत राहतो. त्याला चालताना सगळीकडे बुद्धीबळातले पट अंथरावे तसे दोनच रंग दिसतात. काळा आणि पांढरा रंग. त्याला सगळी जमीन,रस्ते सारं काही ह्या काळ्या रंगातच दिसतात. तो यातल्या फक्त काळ्या चौकोनांवरून चालतो ! त्याला वाटते की पांढऱ्यावरून चाललो की आपण आऊट !
ओढ ज्याची त्याची.....
तो 'अखेरचा रोमन' आता जवळ जवळ गलितगात्र होऊन गेलाय अन ती 'हिमगौरी' आता थकून गेलीय....
पण त्यांनी अजून हार मानली नाही, त्याची स्वप्ने त्याचा पिच्छा सोडत नाहीत
अन ती त्याची सेवासुश्रुषा थांबवत नाहीये..
त्याचा श्वास हाच जणू तिचा ध्यास झालाय...
त्याचे श्वास अलीकडे मंद होत चाललेत..
त्याच्या डोक्याखाली तिने आपल्या हाताचीच उशी केलीय.
तिच्या डोळ्याखालची काळी वर्तुळे आता अधिक गडद होत चाललीत अन त्याच्या देखण्या चेहऱ्यावरचे सुरकुत्यांचे जाळे अधिक दाट होत चाललेय..
त्याच्या देहाची त्वचा आता सैल झालीय, त्याला ऐकायला जवळपास येत नाहीये अन दृष्टी बरयापैकी धूसर झालीय.
ही गाथा नुसत्या चहाची नाही तर गावाकडच्या साध्याभोळ्या माणसांची आहे...
चहा 'ताजमहाल'मधला असो की 'टेटली टी' असो त्याची चव आमच्या गणूच्या 'अमृततुल्य'पुढे फिकीच !
नावाप्रमाणेच अमृततुल्य चवीचा हा चहा म्हणजे अनंत प्रश्नावरचा 'रामबाण' उपाय !
हा चहा पिण्यासाठी लोकांची पावले आपसूक त्याच्या टपरीकडे वळत..
त्याच्या टपरीत फराफरा आवाज करणारया गॅस स्टोव्हच्या निळ्या पिवळ्या ज्योती म्हणजे जणू तल्लीन होऊन एकसमान तालात कथ्थक करणाऱ्या निळ्या पिवळ्या वेशातील नर्तिकाच !
त्या अद्भुत स्टोव्हवरती त्याचे लख्ख पितळी भांडे मुकाटपणे दिवसभर तापत असते.
५ जून १९६६च्या मार्मिकच्या अंकात एक आवाहन छापून आले होते. "यंडुगुंडूंचे मराठी माणसाच्या हक्कांवरील आक्रमण परतवून लावण्यासाठी शिवसेनेची लवकरच नोंदणी सुरू होणार ! विशेष माहितीसाठी ‘मार्मिक’चा पुढील अंक पाहा !"१९ जून १९६६ ला 'मार्मिक'चा पुढचा अंक आला आणि त्यातील आवाहन वाचून मुंबईकर भारावून गेला त्याने तुफान प्रतिसाद दिला ! नोंदणीचे २ हजार तक्ते अवघ्या तासाभरात संपले ! प्रबोधनकार ठाकरे यांनी नाव दिलेल्या ‘शिवसेना’ या चार अक्षरी मंत्राची रीतसर स्थापना झाली. 'मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा' या वचनाप्रमाणे मराठी माणसाच्या हक्कासाठी म्हणून शिवसेनेची स्थापना झाली.
शारीरिक ओढीच्या पलीकडचे प्रेम कसे असते ? जाणून घ्यायचंय ?
मग अवश्य वाचा सच्च्या प्रेमाची मधुर गाथा ....
ती एक हळव्या मनाची किशोरी ; वयाच्या १६ व्या वर्षी असंवेदनशील, व्यसनी आणि थोराड पुरुषाबरोबर तिचं लग्न झालं तर ?
ती त्याच्याशी विवाह करते, मात्र त्याला पूर्णतः स्वीकारत नाही, ती त्याला तन देऊ शकते पण मन देऊ शकत नाही.
एकमेकाचे विचार भिन्न असूनही एकत्र राहणे योग्य की अयोग्य ?
मग 'तिला'च याची जाणीव होते अन ती स्वतःची सारी कुचंबणा त्याच्या गळी उतरवते. पुढे ते विभक्त होतात, पण तोवर तिच्या पोटी त्याचं बीज वाढतं.
फारच गमतिशिर प्रश्न आहे. जे आपल्या शरीराला कायम ताब्यात ठेवत, ज्याला आपण कधीच कंट्रोल करू शकत नाही। आणि जे सतत आपल्याला वेगवेल्या भावनेत अडकवून ठेवत। तेच हे मन.
ज्याच्यावर आपली सगळी सुख दुख अवलंबून असतात किंवा जे ह्य सगळ्यांचा उगम स्थान आहे. ते मन.
ज्याचा आपण साधा विचारही करात नाही. (हे माझ्याचसाठी होतं) जिम , योग, डान्स इतर अनेक प्रकार केले पण मन साठी काय.
*********************
पण हे मन नक्की असता कुठं ? माझ्या शरीरात माझा मन नक्की कुठे आहे ?
***************************************************
मुलाच्या शाळेतुन वर लिहिलेल्या कोर्सवर एक कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की अंतर्मुख मुलांसाठी हा कोर्स फार उपयोगाचा आहे. त्यामुळे मुलांना इतरांशी सहजपणॅ मिसळणे शक्य होईल. कुणी हा कोर्स केला आहे का?
http://www.helenogrady.co.in/website/index.php/about