तडका - विरोधी डोळे
विरोधी डोळे
यांनी म्हणायचं आहे आहे
त्यांनी म्हणायचं नाही नाही
आहे की नाही पाहता पाहता
ऊत्सुकतेची होते लाही लाही
जेव्हा जेव्हा आरोप टिकांचे
येऊ लागतात बारूदी गोळे
तेव्हा तेव्हा ऊताविळ होऊन
तराटले जातात विरोधी डोळे
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३