राजकीय फडात
कधी कात्रीत कधी सैल
फैलावल्या जातात रेंज
परिस्थितीनुरूप कधी
स्टेज सुध्दा होतात चेंज
कधी लोकाचे आपले तर
आपले कधी लोकाचे असतात
राजकीय शत्रु अन् मित्रत्वाचे
कधीच निर्णय टोकाचे नसतात
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
शान महाराष्ट्राची
या भुमीवर शौर्य ऊजळती
अहो गरजती यश वल्गना
चरा चरातुन मिळतो सन्मान
नव पिढीच्या कला गुणांना
वैचारिक त्या क्रांतीमधली
इथे सदाबहर ही ऊत्तराची
महाराष्ट्रवासी राखु सदैव
जगी शान ही महाराष्ट्राची
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
विरोधक
कोणी विरोधक नसेल
तर लढायला मजा नाही
म्हणूनच तर जीवनात
विरोधकही खुजा नाही
स्वेच्छेने विरोध करणे
विरोधक मनावर घेतात
सर्वात जास्त प्रसिध्दी
विरोधकच तर देतात
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
***** ऊन्हाळी प्रेम *****
भर ऊन्हामधी मी
वाट तुझी गं पाहतो
तु ना दिसता दुरवर
जाळ काळजात होतो
अशी आस ही मनाला
सखे तुझी गं लागली
काळजातं खोलवर
प्रीत तुझी ही जागली
जीव तुटतो तीळ-तीळ
याद तुझी ही घेताना
मनी दाटते काहूर
विरह तुझा हा पिताना
का तु दुर गं माझ्या
मी का दुर गं तुझ्या
तु ना दिसते आस पास
झाल्या सावल्या खुज्या
कुण्या क्षितिजाच्यापार
सखे दडलीस तु
तार माझ्या गं मनाची
आज छेडलीस तु
तु ना येता आस-पास
देते तुझा भास हा
स्तब्ध होतं माझं मनं
आणि फूलतो श्वास हा
राहू नको दूर दूर
आता ये ऊन्हात गं
प्रेम माझं हे ऊन्हाळी
घे तुझ्या मनात गं
विशाल मस्के
विवाह प्रवाह
कुणा-कुणाच्या नशिबी
विलासाचा भोग आहे
विवाहाच्या प्रवाहाचा
शाही शाही ओघ आहे
ज्यांच्याकडे पैसा आहे
त्यांना अमाप पाणी आहे
ज्यांच्याकडे पैसा नाही
त्यांचं मरणं रानी आहे
माणसांच्याच महा चुकींमुळे
जगताना माणूस खचला जरा
माणसांना जगवण्याचा जिम्मा
आता माणसांनो ऊचला जरा
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
घोटाळी भरभराट
घोटाळ्यांचा होतोय विकास
गल्लीचे वेगळे,दिल्लीचे वेगळे
धारण करून नविन स्वरूप
पुर्वीचे आणि,हल्लीचे वेगळे
अशा योजनी कळ्या नाहित
ज्यांना कुणी खुडल्या नाही
घोटाळे करत घोटाळेबाजांनी
हवाई जागाही सोडल्या नाही
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
नाही... सॅम अंकल नाहीये ते. सम अंकलच. मुळात सोम अंकल. खरतर काहीही म्हटलेलं चालायचं आम्ही पोरांनी त्यांना. पोरच काय बाकीचेही त्यांना वेगवेगळ्या नावांनी बोलवायचे.
मिस्टर सोमसुंदरम, मिस्टर सोम, सोम अंकल, नुस्तच ओ काका.. ते सम अंकल वगैरे मग आम्हा पोरांनी सुरू केलेली धतिंग.
मारलेल्या हाकेबरहुकुम ते उत्तरायचे.. म्हणजे. येस्सार... पासून काय गं पोट्टे ... ते... ’धा’!
सोनसाखळी चोरांनो
समाजात झाला
चोरांचा हुरसूळा
सोनसाखळी वर
चोरांचा डोळा
साखळी चोरांस
फसावं लागेल
पाच वर्षे कैदेत
बसावं लागेल
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
सोनसाखळी चोरांनो
समाजात झाला
चोरांचा हुरसूळा
सोनसाखळी वर
चोरांचा डोळा
साखळी चोरांस
फसावं लागेल
पाच वर्षे कैदेत
बसावं लागेल
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
काम देई नाम
काम करताना
राखावे भान
प्रत्येक कामात
जपावी शान
तरच जीवनात
मिळेल मान
नाही तर जीवन
क्षणात तमाम
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३