व्यक्तिमत्व

व्यक्तिमत्व

तडका - जात पंचायत खल्लास

Submitted by vishal maske on 13 April, 2016 - 11:23

जात पंचायत खल्लास

जातपंचायती राड्यांचा
आता ना ऊल्हास असेल
कायद्याच्या कचाट्याने
जातपंचायत खल्लास असेल

सामाजिक बहिष्काराचा
ढोंगीपणा हटला जाईल
कायद्याला साक्ष ठेऊन
समाजही नटला जाईल

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - प्रश्न महत्वाचे

Submitted by vishal maske on 12 April, 2016 - 23:04

प्रश्न महत्वाचे

जे दाखवायला हवेत
ते दडवले जात अाहेत
जे दाखवायला नको
ते दौडवले जात आहेत

महत्वाचे प्रश्न देखील
षढयंत्रांचे बळी आहेत
अन् नको त्या प्रश्नांच्या
मिडीयात खळी आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

मेंदू, भावना व वर्तणूक : भाग १

Submitted by मंजूताई on 12 April, 2016 - 06:45

सेतू – A Conscious Parents’ Forum ह्या पालकांच्या सपोर्ट ग्रुप च्या वतीने नागपुरात दर महिन्यात पालकांसाठी एका चर्चा सत्राचे आयोजन केले जाते. मुलांच्या वाढीच्या वयात शाळा- अभ्यास तर महत्त्वाचे असतातच पण मुलांचा नुसताच बौद्धिक विकास झाला तर तो विकास एकांगी होईल. मुलांसंदर्भात पालक म्हणून आपल्याला इतरही अनेक गोष्टींची माहिती असणे आवश्यक असते. मुलांची शारीरिक - मानसिक - बौद्धिक वाढ, क्तिमत्त्वातील वेगवेगळ्या पैलूंचा विकास, विविध शास्त्रे, समाजजीवन, मूल्य – नैतिकता, कला – संस्कृती, सौदर्यदृष्टी ह्या सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

शब्दखुणा: 

तडका - फुलेंना वाहू फुले

Submitted by vishal maske on 10 April, 2016 - 21:12

फुलेंना वाहू फूले

सावित्रीची घेऊन साथ
दिप लावला ज्ञानाचा
स्रीयांना देऊन शिक्षण
मान दिधला मानाचा

स्री शिकुन प्रगत झाली
ते फेल ठरले डाव खुळे
स्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या
तुज वाहतो ही भाव फूले

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

दुर्लक्षित आंबेडकर

Submitted by घायल on 10 April, 2016 - 04:18

एका खाजगी बैठकीत शरद पवार यांनी एका विद्वानाला भाक्रा नांगलचे नियोजनकर्ते कोण असा प्रश्न विचारला तेव्हां त्यांनी पंडीत जवाहरलाल नेहरू असे उत्तर दिले ( नेहरुंच्या नावावर अनेक प्रकल्प आहेत, त्यात वाद्च नाही). तेव्हां पवारसाहेबांनी मिश्कील हसत डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे उत्तर देऊन त्या विद्वानांना खजील आणि गप्प केले होते. हे विद्वान दलित होते. खरं म्हणजे बाबासाहेबांची पूर्ण माहिती सर्व भारतियांना नाही

तडका - प्रतिक्षेची कहाणी

Submitted by vishal maske on 7 April, 2016 - 11:16

प्रतिक्षेची कहाणी

तो येणार म्हणून
ती दिवसभर बसायची
त्याची वाट पाहत
ओले डोळे पुसायची

तीच्यासाठी त्याचं येणं
प्राणप्रिय वाटु लागलं
त्याला विलंब होताच
तीचं मनही दाटू लागलं

तो समाधानाचा अंकुर होता
नव्या दमाची फूंकर होता
तीला प्रतिक्षेत ठेवणारा
तो पाण्याचा टँकर होता

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - बडा सवाल

Submitted by vishal maske on 6 April, 2016 - 10:37

बडा सवाल

नैसर्गिक संकटामध्ये
माणसं होरपळत आहेत
घोटभर पाण्यासाठी
रानो-रानी पळत आहेत

गावो-गावी माणसं इथले
दुष्काळाने भाजत आहेत
तरीही मात्र सरकार मार्फत
वेगळेच प्रश्न गाजत आहेत

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - नव्या योजना

Submitted by vishal maske on 4 April, 2016 - 10:40

नव्या योजना

काढायच्या म्हणून ऊगीच
नव्या योजना काढू नयेत
नव्या योजनांनी जनतेच्या
मनात असंतोष वाढू नयेत

जनतेची करण्या लुबाडणूक
नव्या योजनेचा फतवा नसावा
योजना या जनकल्याणी हव्या
कर वसुलीचा बटवा नसावा

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - भावना सादर करताना

Submitted by vishal maske on 3 April, 2016 - 21:09

भावना सादर करताना

कधी कधी जोडतात
कधी कधी मोडतात
या मनातील भावना
मना-मनात दौडतात

जिथे भावनेला आदर
तिथेच कराव्या सादर
जिथे होत नाही कदर
तिथे पसरू नये पदर

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - वादात

Submitted by vishal maske on 2 April, 2016 - 22:03

वादात

पेटलेला वाद विझताना
लगेचच तेल घेतले जाते
नव-नविन फूनग्यांनी
वादांवरती घातले जाते

जसा वाद भडकू लागेल
तसे माणसंही भडकतात
लावणारे राहतात बाजुला
वाद खेळारेच तडकतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

Pages

Subscribe to RSS - व्यक्तिमत्व