व्यक्तिमत्व

व्यक्तिमत्व

तडका - छडीचा शॉट

Submitted by vishal maske on 12 March, 2016 - 20:34

छडीचा शॉट

छडी वाजायची छम-छम
विद्याही यायची घम-घम
तरी शाळेत जाण्यासाठी
पोरं पळायची रम्-पम्

पण आज मात्र शिक्षणात
नविन बदल घडवला आहे
घाबरवणारा छडीचा शॉट
शिक्षणातुन दडवला आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - पाणी वापरताना

Submitted by vishal maske on 9 March, 2016 - 21:50

पाणी वापरताना

होणार्‍या दुष्परिणामांची
जाणीव असावी थोडकी
दुष्काळानं घेरलं आहे
पाण्याची झाली कडकी

हे संकट आलं असलं तरी
संरक्षण करा आपलं-आपुन
पाण्याचं महत्व जाणून घ्या
पाणी वापरा जपुन-जपुन

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - खुम-खुमी

Submitted by vishal maske on 4 March, 2016 - 20:23

खुम खुमी

कुणी कुणाला कमी नाही
प्रत्येककाला ज्ञात आहे
तरीही एकमेकांचा
इथे वारंवार घात आहे

"ध" चा "मा" करणारेही
अजुन इथे कमी नाहीत
असे लोक कुठे मिळतील
ज्यांच्यात खुम-खुमी नाहीत

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

ट्रोल माझा

Submitted by भरत. on 2 March, 2016 - 23:31

चालू घडामोडींपासून प्रेरणा घेऊन सुरेश भटांच्या 'दु:ख माझे' ही कविता माझ्यासाठी आणि माझ्यासारख्याच अन्य काहींसाठी थोडी बदलून

ट्रोल माझा
माझियामागे असू दे !

तो बिचारा एकटा जाईल कोठे?
मी असोनी का अनाथासारखे त्याने फिरावे?

माझियावाचून** त्याला
आसरा आहे कुणाचा?

जन्मला* तेव्हापुनी
श्वानापरी
माझ्याच मागे राहिला तो!

ट्रोल माझा
माझियामागे असू दे!

तडका - रहा औकातीत

Submitted by vishal maske on 1 March, 2016 - 20:33

रहा औकातीत

थोडा जोर वाढल्याने
होऊ नये अवलक्षित
पोलिस आहेत म्हणूनच
समाज आहे सुरक्षित

पोलिसांवर हल्ले करणे
हि संस्कृती आपली नाही
भ्रमात राहू नये की त्यांनी
तुमची औकात मापली नाही

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

पुण्यातील चांगले प्लास्टिक सर्जन (Breast Lift, Augmentation etc.)

Submitted by अबक१ on 28 February, 2016 - 21:10

कुणाला माहिती असल्यास प्लीज सर्जन्सची नावे सुचवा. पुणे सिटी अथवा थोडे बाहेरही चालेल. धन्यवाद.

तडका - कारटं स्मार्ट करण्यासाठी

Submitted by vishal maske on 24 February, 2016 - 08:59

कारटं स्मार्ट करण्यासाठी

आपल्याच्याला बाबु अन
लोकाच्याला कारटं म्हणतात
कवडीची अक्कल नसतानाही
आमचंच भलतं स्मार्ट म्हणतात

विरोध होत नसला तरीही
मुद्दाम विरोधात धाडलं जातं
कारटं स्मार्ट करण्यासाठी
प्रकाश झोतात ओढलं जातं

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

औषधवाल्या शेख आजी!

Submitted by कृष्णा on 24 February, 2016 - 01:02

सध्या मायबोली वर डॉक्टरांविषयी चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे धागे सुरु आहेत! मी त्यात माझेही काही बरे वाईट अनुभव शेअर केलेत. पण हा मात्र अगदी शेख आजींचा आलेला दैवी अनुभव म्हणुन त्या साठी एक वेगळे लिखाण. अलोपॅथी आयुर्वेद होमिओपॅथी युनानी अश्या अनेक विषयवार मंडळी अगदी जोशात भांडत असतात आपापले अनुभव मते मांडत असतात..

आमच्या औषध वाल्या शेख आजी!

तडका - ट्विटर वॉर

Submitted by vishal maske on 23 February, 2016 - 20:04

ट्विटर वॉर

इकडून सोडले ट्विट
तिकडून सोडले ट्विट
ऑनलाइन खेळू लागले
हे ट्विटर वॉर स्वीट

एकदा खेळून भागत नाही
पुन्हा पुन्हा ओढ लागते
पण ट्विटर वॉर खेळायलाही
कौशल्याची जोड लागते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - विचार महापुरूषांचे

Submitted by vishal maske on 19 February, 2016 - 21:27

विचार महापुरूषांचे

समाजाच्या एकीसाठी
विचार आहेत मोलाचे
त्रिकालबाधी टिकतील
अशा वैचारिक खोलाचे

जीवन सफल करण्यासाठी
वेग-वेगळ्या पर्वांनी
महापुरूषांच्या विचारांचे
आचरण करावे सर्वांनी

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

Pages

Subscribe to RSS - व्यक्तिमत्व