तडका - लालची लोक
लालची लोक
जोपर्यंत विरोध आहे
तोपर्यंत विरोध करतात
एकदा विरोध मावळता
क्षणात रंगही बदलतात
जिथे स्वार्थ वाटत नाही
तिथे हे लोक थपकतात
जिथे मलिदा दिसेल तिथे
नंबर मारण्या टपकतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
व्यक्तिमत्व
लालची लोक
जोपर्यंत विरोध आहे
तोपर्यंत विरोध करतात
एकदा विरोध मावळता
क्षणात रंगही बदलतात
जिथे स्वार्थ वाटत नाही
तिथे हे लोक थपकतात
जिथे मलिदा दिसेल तिथे
नंबर मारण्या टपकतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
कर्जातलं जीणं
गरजा भागत नाहीत
भागवाव्या लागतात
सुखी मनाच्या आशा
जागवाव्या लागतात
डोईवरती कर्ज घेऊन
दिवस ढकलले जातात
जगता-जगता माणसं
सहज पेकाळले जातात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
सोशियल मिडीयात
सोशियल मिडीया वापरणं
जणू कोंडी भासत होती
जेव्हा व्यक्ती स्वातंत्र्याला
कायद्याची गदा ढासत होती
आता मात्र आय.टी. अॅक्ट
स्वातंत्र्यापुढे नमला आहे
सुप्रिम कोर्ट निर्देशामुळे
६६ (अ) हा शमला आहे
हि श्रेया सिंघालची जीत मात्र
आनंद तर नेटकर्यांचा आहे
तरी मिडीयात विवेकी वागणं
जिम्मा मात्र सार्यांचा आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
असं समजूया की नगरपालिकेचा पाणी पुरवठा विभागाचा एक कर्मचारी तुमच्या भागातलं पाणी सकाळी नऊ वाजता उघडतो आणि दुपारी दोन वाजता बंद करतो. असं समजा की त्याच्या साहेबानी त्याला सांगितलं की “आज नऊ वाजता पाणी उघडल्यावर त्याच्या जवळंच आखणी करून ठेवली आहे तिथे झाडं लावण्यासाठी एक तीन बाय तीन बाय तीन फुटांचा खड्डा कर आणि त्या रस्त्यावरचा सहावा दिवा चालत नाहिये तो बदल! तोपर्यंत दोन वाजतील. मग पाणी बंद कर आणि मगच ऑफिसला परत ये!” तर कसला स्फोट होईल!! जाऊ दे! कल्पना करण्यातंच पॉइंट नाही.
तसे आपण सगळेच गुणदोषयुक्त असतो. माणूस म्हणून परिपूर्ण, आदर्श, सर्वगुणसंपन्न असं या जगात कोणीही नाही. त्यामुळे व्यक्तिपरिचय द्यायचा तरी हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्या कामांसाठी परिचय दिला आहे त्यात ती व्यक्ति परिपूर्ण आहे. म्हणूनच मी माझ्या बाबांच्या कार्याचा परिचय देणार आहे. आईबाप हे कायमच लाखमोलाचे- नव्हे पृथ्वीमोलाचेच असतात. कारण 'आईबाप' म्हणून जे जे सर्वोत्तम असतं ते ते द्यायचा त्यांचा प्रयत्न असतो. माझ्याही आईबाबांनी त्यांच्या मते जे जे उत्तम होतं ते द्यायचा प्रयत्न केलाच.
वाहन अवाहन
हल्ली वाहन म्हटलं की
गरजेची गोष्ट झाली आहे
कित्तेक कामांची जबाबदारी
वाहनांवरती आली आहे
प्रवासासह इतरही कामे
वाहन बिगीनं करू शकते
पण त्याची काळजी न घेणं
हे जीव घेणंही ठरू शकते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
वादग्रस्त विधान
कधी कुठे काय बोलावं
याची थोडी अक्कल असावी
योग्य प्रत्युत्तर कसं द्यावं
याचीही जरा शक्कल असावी
आपल्या वाणीने समाजात
वादंगी पडसाद फिरू नये
वादग्रस्त विधान खांडण्याला
वादग्रस्त विधान करू नये
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
मुर्खपणाचे मोजमाप
आयत्या पिठावर रेघोट्या
मालकी हक्कानं मारतात
दुसर्यांनाच करतात पुढे
स्वत:चे अंगही चोरतात
त्यांचा मुर्खपणा मोजायला
सोपी-साधी शक्कल आहे
त्यांच्याच बोलण्यात कळते
त्यांना किती अक्कल आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३