तडका - कर्जातलं जीणं

Submitted by vishal maske on 1 April, 2016 - 22:57

कर्जातलं जीणं

गरजा भागत नाहीत
भागवाव्या लागतात
सुखी मनाच्या आशा
जागवाव्या लागतात

डोईवरती कर्ज घेऊन
दिवस ढकलले जातात
जगता-जगता माणसं
सहज पेकाळले जातात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त तडका.

<<
जगता-जगता माणसं
सहज पेकाळले जातात
<<

चेकाळणे माहिती आहे, पण हे 'पेकाळ'ने काय आहे?