व्यक्तिमत्व

व्यक्तिमत्व

तडका - Valentine फिड

Submitted by vishal maske on 13 February, 2016 - 20:34

Valentine फिड

प्रेम करण्यासाठीही
मुहूर्त शोधला जातो
१४ फेब्रुवारी दिवस
व्हँलेंटाइन वदला जातो

आम्ही हे मान्य करतो की
यात तरूणाईचं लीड असतं
पण लहानांपासुन वृध्दांपर्यंत
व्हँलेंटाइनचं फीड असतं

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - चर्चा

Submitted by vishal maske on 12 February, 2016 - 19:56

चर्चा

कोण कसा तर्क काढील
याचा काही नियम नसतो
वास्तव जाणून घेण्याइतका
माणसांकडे संयम नसतो

म्हणूनच विषय मिळताक्षणी
जणू त्यांना लागतातच मिर्च्या
अन् पडता फक्त ठिणगीही
ऊधाणी भडकतात चर्चा

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - स्टेटस

Submitted by vishal maske on 11 February, 2016 - 19:35

स्टेटस

जो येतोय,तो रमतोय
ऑनलाइन युगात या
हर्षासह रूसवे-फूगवे
डिजिटल ओघात या

सोशियल मिडियाचे फिड
वर-वरतीच पांगु लागले
अन् मनातील भावनाही
हल्ली स्टेटस सांगु लागले

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - फरफटक

Submitted by vishal maske on 10 February, 2016 - 21:43

फरफटक

जगण्यासाठी जगताना
जगवण्यासाठी जगावे
परिस्थितीची जाण ठेऊन
माणसांनी वागावे

ऊन्मादाने भलतीकडेच
भरकटत जाऊ नये
माणसांकडूनच माणसांची
फरफटक होऊ नये

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - चौकशीचं घोडं

Submitted by vishal maske on 10 February, 2016 - 10:22

चौकशीचं घोडं

सत्तेच्या दुरूपयोगाने
केली म्हणे गफलत
पण कायद्याच्या कचाट्यातुन
कशी मिळेल सफलत,..?

एका-एकाच्या नावानं
आता वेग धरू लागलं
अन् चौकशीचं घोडं हे
नेत्यांदारी फिरू लागलं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - प्रपोज डे

Submitted by vishal maske on 7 February, 2016 - 20:42

प्रपोज डे

प्रेम व्यक्त करण्यासाठी
एक डे ठरवला स्पेशल
प्रपोज करण्या एकमेका
मनं ऊत्सुकली सपसेल

मात्र प्रेमाच हे नातं
कधीच ना सिमित असतं
"डे" ठरवले असले तरीही
प्रपोज साठी निमित्त नसतं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - विषय सिनेमांचे

Submitted by vishal maske on 7 February, 2016 - 09:47

विषय सिनेमांचे

सिनेमांचे विषय हल्ली
भलते चर्चिले जातात
चर्चेसाठी वेळ आणि
पैसेही खर्चिले जातात

सिनेमांच्या सादरीकरणाने
कित्तेक मनं दुखावतात
तरीही मात्र असे सिनेमे
चलतात म्हणून दाखवतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - आपले रस्ते

Submitted by vishal maske on 6 February, 2016 - 22:57

आपले रस्ते

रस्त्यावरून जाताना
रस्त्यावरून येताना
आपण सर्रास पाहतो
रस्ते खराब होताना

सगळीकडे हिच अवस्था
गाव,शहर आणि वस्त्यांची
आपणच घ्यावी काळजी
आता आपल्या रस्त्यांची

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - बोलावं ते पोहचेल का,...?

Submitted by vishal maske on 4 February, 2016 - 09:37

बोलावं ते पोहचेल का,...?

बोललो तेच पोहचावं
सर्वांनाच असते अपेक्षा
होतात तरीही वेगळ्या
शब्दा-शब्दांतुन उपेक्षा

शब्दांना समजुनही शस्र
कितीही ते जपुन वापरा
मात्र आपल्या सोयीनेच
काढतो अर्थ ऐकणारा

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - समर्थन

Submitted by vishal maske on 3 February, 2016 - 19:45

समर्थन

अडवतात रस्ते
फोडतात गाड्या
निदर्शनासाठी अशा
करतात काड्या

पाठिंबा दाखवा
पण बेवर्तन नव्हेे
गुंडागर्दी करणे
हे समर्थन नव्हे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

Pages

Subscribe to RSS - व्यक्तिमत्व