महाराष्ट्रातील प्रसिध्द कवी,वात्रटिकाकार "विशाल मस्के" यांची अपंगांची ऊमेद व्यक्त करणारी कविता,.....
धावायचंय मला
स्वत:चं वेगळं स्थान,मिळवायचंय मला
संकल्प आहे मनी,धावायचंय मला,...||घृ||
ना झुंजीत हारलेला
भित्रा मी फरारी
घेण्यास आहे सज्ज
मी धाडशी भरारी
रस्त्यातल्या या गर्दीत हरवायचंय मला
संकल्प आहे मनी,धावायचंय मला,...||१||
मन शुर-वीर आहे
जीवनाच्या लढतीला
घेईल कवेत आज
सुखाच्या बढतीला
जनी सुख देत देत,मिरवायचंय मला
संकल्प आहे मनी,धावायचंय मला,...||२||
यशाच्या शिखरांना
मी स्पर्शुनीच येईल
जिद्दीचा हा आदर्श
समाजास देईल
माणूसकीत माणूस,गोवायचंय मला
शेवंता तेलीण म्हणजे अजब रसायन होतं. लिंबाच्या बुंध्यागत भरल्या अंगाची ठसठशीत बाई ! गाजरासारखा रंग अन नितळ काया. अंगणात बसली तर तिच्या केळीच्या खोडासारख्या तराट गोरयापान पिंडरयाकडे जादू झाल्यागत नजर जाणारच. तटतटलेल्या पायावर रंगीत घुंगरांचे सैलसर चांदीचे पैंजण उगाच चाळा करत रहायचे अन बघणारा गपगार व्हायचा. तिच्या काजळ घातलेल्या पाणीदार मोसोळी डोळ्यात सदोदित एक आवतण असायचं. मोठ्या कपाळावर माळ्याच्या बाया लावायच्या तसा आडवा रेषेचा अन गोलाकार गंध असायचा. तिच्या उभट चेहऱ्याला तो फारच खुलून दिसायचा.
सामाजिक कलंक
पद प्रतिष्ठा मिळाल्यावर
दुरूपयोग करू लागतात
अन् जबाबदार्या झुगारून
स्वत:च घर भरू लागतात
समाजाला ढसणारे हे
जहरी जहरी डंख आहेत
हे समाजातच पोसणारे
जमाजाचे कलंक आहेत
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
सोबतच्या फोटोत मध्ये बसलेले कोण आहेत हे साऱ्यांनीच ओळखले असेल. मात्र आजच्या सोशलमिडीयाप्रवण नव्या पिढीला निळूभाऊ काही ठराविक एंगलमधूनच माहिती आहेत. निळूभाऊंचा बेरकी मुद्रेतला एखादा फोटो टाकून त्याखाली ‘बाई वाड्यावर या’ असं लिहिलं तरी वाचणारा माणूस गालातल्या गालात हसतो. कधीकधी “मास्तर आमचं पोरगं नापास कसं झालं?” अशी विचारणा करणारे निळूभाऊ whatsapp वा एफबीवर दिसतात तर कधी 'छ्बुला म्हणावं तेवढं सांजच्याला वाड्याव ये' अशी साखरपेरणी करत मिशीला पीळ घालत, एका हातात धोतराचा सोगा धरून असणारे निळूभाऊ आपल्याला सोशल मिडीयावर अधून मधून भेटत असतात.
राजकीय समीक्षण
टिका करणे,आरोप करणे
हा राजकारणाचा भाग आहे
कुणाच्या निशाणी सिंह तर
कुणाच्या निशाणी वाघ आहे
पण विकास सोडून भरकटने
हा समाजव्यवस्थेला डाग आहे
राजकीय समीक्षण करण्या
जनतेला अजुनही जाग आहे
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
वाणी वृध्दाश्रमातली
आम्हीही सांभाळला समाज,तरूणपणात
पण आता बसलो आहाेत,वृध्दाश्रमात,...||धृ||
होत्या खुप इच्छा अपेक्षा
स्वप्न सुध्दा खुप होते
आमच्या ध्येयामध्ये सदा
भविष्याचे रूप होते
तुमचीच वाटायची काळजी,आमच्या मनात
पण आता बसलो आहोत,वृध्दाश्रमात…||१||
तुम्हा अंगावरती खेळवलं
सदा सुखामध्ये लोळवलं
तुम्हाला सावली देण्या
स्वत:ला ऊन्हात तळवलं
कधीच काटकसर नव्हती,आमच्या प्रेमात
पण आता बसलो आहोत,वृध्दाश्रमात…||२||
म्हातारपणाला आधार
तुमचाच तर वाटायचा
तुम्हा पाहुन जीवनाला
नवा अंकुरही फूटायचा
जाईल वाटायचं ऊतारवय,सदा जोमात
पण आता बसलो आहोत,वृध्दाश्रमात…||३||
आमचं कुटूंबही आता
तिमिरातील तेजासाठी
दुसर्यांना दोष देण्यापेक्षा
स्वत:चंही करावं समीक्षण
करावं कार्य झकास इतकं
की जगही करील निरिक्षण
स्वत:मधल्या अंधकाराला
स्वत:हूनच धमकावं लागतं
तिमिराचा सामना करण्या
काजव्यालाही चमकावं लागतं
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
बुध्दाची शिकवण
मित्रांशी वागताना प्रेमाने
शत्रुंशीही वागावे प्रेमाने
समाजामध्ये जगताना
माणसांनी जगावे प्रेमाने
माणसांतली दरिद्री
माणसांकडून खपावी
माणसांतली माणूसकी
माणसांनीच जपावी
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
व्यसन कर्त्याहो
जनहितार्थ सल्ला आहे
फुकट म्हणून सोडू नये
आपलं जीवन दुर्वेसनांशी
चुकुनही कधी जोडू नये
व्यसन सोडल्याने सुटते
प्रयत्न कदापी हरू नये
आपल्या कर्तृत्वाने आपण
समाजाची कीड ठरू नये
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
राजकीय सोंडेशी
मनातील भावना
तावाने मांडतात
राजकीय सोयरे
आपसात भांडतात
येईल तो मांडीशी तर
जाणारा तोफे तोंडेशी
हे प्रसंग सर्रास मिळतील
इथे राजकीय सोंडेशी
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३