वाणी वृध्दाश्रमातली
आम्हीही सांभाळला समाज,तरूणपणात
पण आता बसलो आहाेत,वृध्दाश्रमात,...||धृ||
होत्या खुप इच्छा अपेक्षा
स्वप्न सुध्दा खुप होते
आमच्या ध्येयामध्ये सदा
भविष्याचे रूप होते
तुमचीच वाटायची काळजी,आमच्या मनात
पण आता बसलो आहोत,वृध्दाश्रमात…||१||
तुम्हा अंगावरती खेळवलं
सदा सुखामध्ये लोळवलं
तुम्हाला सावली देण्या
स्वत:ला ऊन्हात तळवलं
कधीच काटकसर नव्हती,आमच्या प्रेमात
पण आता बसलो आहोत,वृध्दाश्रमात…||२||
म्हातारपणाला आधार
तुमचाच तर वाटायचा
तुम्हा पाहुन जीवनाला
नवा अंकुरही फूटायचा
जाईल वाटायचं ऊतारवय,सदा जोमात
पण आता बसलो आहोत,वृध्दाश्रमात…||३||
आमचं कुटूंबही आता
तुमचं कुटूंब झालं आहे
कुटूंबातलं आमचं स्थान
वृध्दाश्रमात गेलं आहे
वृध्दांना स्थानच नाही, कित्तेक घरा-घरात
पण आता बसलो आहोत,वृध्दाश्रमात…||४||
इथेही आता रमतंय मन
वाढलेत वृध्दही येणारे
रोज वेगळे दिसताहेत
नशिबाला दोष देणारे
तरूणपण घालवलं,सदैवच माना-पानात
पण आता बसलो आहोत,वृध्दाश्रमात…||५||
काय होतो आम्ही अन्
आता काय झालो आहोत
ज्यांना मनातुन मान दिला
त्यांच्याच मनातुन गेलो आहोत
सुन्न झालंय मन,मनाच्या कोना-कोनात
पण आता बसलो आहोत,वृध्दाश्रमात…||६||
पोटभराचं अन्नही आमचं
आलंय आता चमच्यावर
मनात एकच काहूर आहे
हि वेळ न् यावी तुमच्यावर
मिळावे तुम्हाला स्वकुटूंब,वृध्दापकाळात
पण आता बसलो आहोत,वृध्दाश्रमात…||७||
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783
* सदरील कविता ऐकण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783
* कविता आवडल्यास नावासह पुढे पाठवुन सहकार्य करावे
* डेली वात्रटिका वाचण्यासाठी आणि ऐकण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783
* अधिक वात्रटिका वाचण्यासाठी www.vishalmske.blogspot.in वर भेट द्या