वयच काय होतं तिचं! खेळण्या बागडण्याच दिवस होते तिचे! पण थोरामोठ्यांनी तोंडात बोट घालावं असं तिने अभूतपूर्व साहस अजाणत्या वयात करुन दाखवलंय व आज ती कित्येकांची प्रेरणास्थान बनली आहे. तिच्या धाडसाचं वर्णन भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरल्या गेलंय.
ही घटना आहे एकोणीसशे बेचाळीसची! महात्मा गांधीजींच्या चले जाव चळवळीने जोर धरला होता. लाखो लोक ह्या आंदोलनात सहभागी झाले होते. आसामातील जनताही ह्या चळवळीत सक्रीय सहभागी झाली होती. ठिकठिकाणी सभा, मोर्चे, सत्याग्रह होत होते.
ही घटना आहे दरंग जिल्ह्यातील शोनितपूरची . पोलिस चौकीवर कब्जा करायला सत्याग्रही निघाले होते व त्यात सर्वात पुढे होती अवघ्या चौदा वर्षाची 'कनकलता'. हातात तिरंगा घेतलेली ही बाला जोशात व उत्साहात घोषणा देत मोर्चात सहभागी झाली होती. जणू रणचंडिकाच!
जनसमुदाय चौकीवर आला. कनकलता बंदुकधारी पोलिसांना विदेशी सरकारची नोकरी सोडण्यास व पोलिस चौकी जनतेला स्वाधीन करण्याची विनंति करत होती. पण ते बधले नाही बघून रागा व त्वेषाने ती ओरडून लोकांना निडर बनून चौकीवर कब्जा करायला सांगू लागली.लोक झपाटलेली होती.
मागे फिरा नाहीतर गोळी घालू , जमावाला पोलिस धमकावत होते. कनकलताच्या अंगात महिषासुरमर्दिनी संचारली होती. हातातल्या तिरंग्यासह न डगमगता ,घोषणा देत पुढे पुढे सरसावत असतानाच ठो ठो आवाज करत गोळ्यांनी कनकलताचा ठाव घेतला. कुठल्याश्या हिंदी सिनेमात शोभावा असा मेलोड्रामा काही क्षणात रिटेकविना प्रत्यक्षात घडला. रक्तबंबाळ कनकलताच्या हातातील तिरंगा जमीनीवर पडणार तोच मुकुंद काकोटी नामक साहसी तरुणाने पुढे सरसावून झेंडा हातात धरला पण गोळ्यांनी त्याचाही वेध घेतला. करो या मरो, हे तोंडातून निघालेले बुडबुडे नव्हते! निर्दयतेने झालेल्या गोळीबारात पन्नास साठजण मृत्युमुखी पडले.
आज आपण स्वातंत्र्य उपभोगतोय त्या अश्या कित्येक काळाच्या पडद्याआड गेलेल्या लोकांच्या बलिदानमुळे!
क्रिश्नकांत व कनकेश्वरी बरुआंची ही स्वाली (मुलगी)वीस सप्टेंबर एकोणीसशे चोवीस साली जन्मली. ज्योतिप्रसाद अग्रवाल व बिष्णुप्रसाद रावांची स्फुर्ति व देशभक्ती गीते ऐकून तिच्या कोवळ्या ह्रदयात देशप्रेमाचं बीज अंकुरलं होतं.
आसामी भाषेत रचलेल्या काव्या व गीतामधून कनकलता अजरामर झाली आहे. ही गीते आजही भावभक्तीने गायल्या जातात. आज तिची जयंती ! तिला भावपूर्ण विनम्र आदरांजली!
वा ! आपल्याला इतिहासात कधी या
वा !
आपल्याला इतिहासात कधी या लोकाबद्दल शिकवलेच नाही !
कोटी कोटी प्रणाम
कोटी कोटी प्रणाम
कनकलता ला विनम्र आदरांजली .
कनकलता ला विनम्र आदरांजली .
वीरबाला कनकलतेस भावपूर्ण
वीरबाला कनकलतेस भावपूर्ण विनम्र आदरांजली!
विनम्र आदरांजली!!!
विनम्र आदरांजली!!!
विनम्र आदरांजली.
विनम्र आदरांजली.
विनम्र आदरांजली ! मंजू, अशा
विनम्र आदरांजली !
मंजू, अशा रणचंडिकेची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद .
सगळ्यांना मनापासून धन्यवाद!
सगळ्यांना मनापासून धन्यवाद!
वीरबाला कनकलतेस भावपूर्ण
वीरबाला कनकलतेस भावपूर्ण विनम्र आदरांजली!
तेजपूर, आसाममधील कनकलता
तेजपूर, आसाममधील कनकलता उद्यानातील (रॉक गार्डन) कनकलताच्या बलीदानाचे शिल्प!
व्वा:!!! मस्त!!!!
व्वा:!!! मस्त!!!! टाळ्या!!!
आपण फोटोही दिलेत! आवडलं.
खूप[ लहानपणी कनकलताबद्दल ऐकल
खूप[ लहानपणी कनकलताबद्दल ऐकल होत ते थेट आता इथे.
मंजूताई या मालिकेसाठी धन्यवाद!!!
अतिशय सुरेख लेखमालीका.
अतिशय सुरेख लेखमालीका.
खूप[ लहानपणी कनकलताबद्दल ऐकल
खूप[ लहानपणी कनकलताबद्दल ऐकल होत , मला वाटते हिंदी का मराठी पुस्तका मध्य धडा पण होता पण आता आठवत नाही...