दुपारी ३ वाजता दारावर टकटक झाली आणि नियतीने दार उघडून एका मध्यमवयीन माणसाला आत घेतलं.
'नमस्कार! मी ठोकताळे साहेबांना भेटायला आलोय.' आपल्या समोर एका अत्यंत सुंदर ६ फुटी उंच सोनेरी केसाच्या स्त्रीला पाहून त्या गृहस्थाचे डोळे चमकले. नियती होतीच तितकी सुंदर.. रेखीव शेलाटा बांधा, गोरीपान अंगकांती, गोड चेहरा, मानेवर रुळणारे सोनेरी केस, कोलगेटच्या जाहिरातीतल्या बाईसारखी शुभ्र व मोत्यासारखी दंतपंक्ती, खुलून दिसणारं नकटं नाक आणि मादक भुरे डोळे. तिनं जीनची निळी पँट आणि वर गुलाबी टीशर्ट घातला होता.
१२ सप्टेंबर.उंचपुऱ्या देखण्या जेरेमी ब्रेट ला जगातून गेल्याला आज २१ वर्षं होतील.अजूनही जुने बी.आर.चोप्रा महाभारत पाहिलेल्यांच्या डोळ्यासमोर कृष्णाचं नाव काढलं की फक्त नितीश भारद्वाज येतो तसं शेरलॉक होम्स म्हटलं की जगातल्या बहुतांश लोकांच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त जेरेमी ब्रेट येतो.
सर आर्थर कॉनन डॉयल:
शेरलॉक होम्स हा विषय बर्याच दिवसांपासून मनात घोळतो आहे. विषय इंटरेस्टींग आहेच; त्याबद्दल असंख्य ठिकाणी छापून, लिहून आलेलं वाचूनसुद्धा शेरलॉकबद्दल मला लिहावं वाटत आहे - सखोल कायसं म्हणतात ते करायचा भुंगा डोक्यात गुईंगुईं करतोय. म्हणजे आंघोळ करताना नाही का एका कानात पाणी जातं आणि कितीही काही केलं तरी कानात सुईंफूईंबीईंईं असा आवाज चालुच राहातो तसं. हो..हो..शू:क्क्क्क..विषय गंभीर आहे..हे आवाज बिवाज बास आता. पण थोडंसं बेअरींग येई पर्यंत असे आवाज काढावे लागतात - तंबोरा तबला जुळवताना ते वाजवणारे पहिल्यांदा अर्धा-पाऊण घंटा बेजार होतात ना तसं. ह्याट!!