मेन्स फॅशन,हेअरस्टाईल्स,दाढी,लेटेस्ट ट्रेंड्स!!!!

Submitted by सिंथेटिक जिनियस on 2 August, 2017 - 03:17

मायबोलीवर स्त्रीया बरेचदा फॅशन ,कपडे,हेअरस्टाईल यावर धागे काढुन चर्चा करताना दिसतात.आवडते कपडे कुठे मिळतात,ऑनलाईन कोणत्या वेबसाईट चांगल्या आहेत यावर चर्चा होताना दिसते.बर्याच चांगल्या चर्चा असतात या.
पण मायबोलीवर पुरुषांसाठी असा कुठलाही धागा नाही.तसा विभाग नाही.नुकताच मी स्वतः चा मेकोव्हर केला,लांब केस कापून स्लीक्ड बॅक अंडरकट हेअरस्टाईल ठेवली. लेटेस्ट फॅशन ट्रेंड चाळताना मायबोलीवर फार काही मिळालं नाही ,म्हणून हा प्रपंच.
इथे हेअरस्टाईल ,मेन्सवेअर,फूटवेअर ,लेटेस्ट मेन्स फॅशन ट्रेंडस यावर चर्चा अपेक्षीत आहे.अगदी केस गळायला लागल्यावर तुम्ही काय केलेत.पुर्ण टक्क्ल असेल तर त्यावर मॅच होणारे कपडे.लांब केस ठेवायचे असल्यास करायच्या स्टाईल्स.
दाढी अनेक पुरुष ठेवत आहेत सध्या,लाटच आली आहे .तर तुम्ही दाढी ठेवता का ,कशी ठेवता,कोणती स्टाईल हे अपेक्षीत आहे.
व्हा सुरु!!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

महिन्याभरापूर्वी मी पूर्ण टक्कल केले,
आठवड्यातून 2 वेळा नॉर्मल रेझर ने डोके शेव्ह करून लुक मेन्टेन्ड ठेवता येतो.

आता महिन्याभरात सतत डोके शेव्ह करायचा कंटाळा येऊ लागलाय, आता जास्तीत जास्त किती दिवस तसेच चालवता येईल ते टेस्ट करायचे Happy

हम्म! केस गळून पुढे बाल्ड पॅच पडल्यास सरळ तुळतुळीत टक्कल उतम.मी सुद्धा हा लुक ट्राय केला होता पण माझी तब्येत माचो नसल्याने परत केस वाढवले व आता हाय अंडरकट ठेवला आहे.
सिम्बा ,अंघोळ करताना जर हेड शेव्ह केले तर जमते,वेगळा वेळ काढावा लागत नाही.मी सूचवेन हा लुक मेंटेन करा.

काही मुलींना सवय असते, एक ड्रेस घातला की पुन्हा तो कित्येक काळ रिपीट करायचा नाही. मी दाढी केसांबाबत तसेच वागतो. प्रत्येकवेळी मी दाढी केसांबाबत आधीच्यापेक्षा काही वेगळे करतो. अगदी कितीही शोभत असले तरी नेक्स्ट टर्नला रिपीट नाही करत. दाढी मला ठेवायला आवडतेच. माझे याबाबत कन्सेप्ट क्लीअर आहेत. देवाने दाढी पुरुषांनाच दिली आहे तर तो पुरुषांचा दागिना आहे. तिचा वापर आपले सौण्दर्य खुलवण्यासाठी करायलाच हवा.

कपड्यांबाबतही माझे ऑफिसमध्ये हमखास कौतुक होते. मी कुठून कपडे घेतो हे विचारले जाते. माझा एक फंडा आहे, मी रोजचे ऑफिसचे शर्ट विकत घेताना फॉर्मलमध्ये न शोधता सेमीफॉर्मलमध्ये शोधतो. त्यातून जे स्टायलिश प्लस डिसेंट वाटेल ते सिलेक्ट करतो. त्यामुळे सोमवार ते गुरूवार मी ईतरांपेक्षा स्टायलिश दिसत असतो. फ्रायडेला जेव्हा बहुतांश जण जीन्स-टीशर्ट या पारंपारीक अवतारात असतात तेव्हा मी सिक्स पॉकेट आणि वर फॉर्मल शर्ट घालतो. बरेचदा अर्धबाह्यांचे. त्यावर बेल्ट लेदर लावतो. कपड्यांबाबत केस दाढीईतके प्रयोग तुलनेत कमी करतो. आपली एक स्टाईल स्टेटमेंट बनणे चांगले असते.

जेव्हा माझी दाढी वाढलेली असेल तेव्हा लाईट शेड कपडे घालतो. व्हाईट आणि स्काय ब्लू.. जेव्हा सटासट असेल तेव्हा पिण्क आणि येल्लो, किंवा कॉफी कलर वगैरे.. जेव्हा खुरटी वाढू लागते तेव्हा ब्लॅक ब्य्लू ग्रे..

नाईलाज आहे, पण धाग्यात शाहरूखला आणतो. त्या माणसाचा ड्रेसिंग सेन्स कमालीचा आहे. त्याच्या टीशर्टसची चॉईस भारी असते पण ती त्यालाच सूट होते, मला होत नाही म्हणून फॉलो करत नाही. पण फॉर्मल शर्टसबाबत मी नेहमी स्वदेशचा मोहन भार्गव दिसायचा प्रामाणिक प्रयत्न करतो Happy

Brad Pitt
इमेज दिसत नाही आहे ,पण ब्रॅड पीटचा २०१४ च्या फ्युरी मुव्हीमधला फोटो आहे.क्लीक केल्यावर इमेज दिसेल.
मी नेहमीच माझे केस मागे फिरवतो,त्यामुळे स्लिक्ड बॅक अंडरकट मी निवडला.पण प्रॉब्लेम असा आहे की कित्येक दशकं मी डोक्याला तेल लावले नाही,मला तेल आवडत नाही.त्यामुळे केसांना शाईन दिसत नाही.गाडीवर असेन तेव्हा केस फुगतात व मी कोंबडा दिसतो.सेट वेट हेअर जेल वापरुन पाहीले पण बोगस आहे.केसांना वेट लुक कसा द्यावा? पॉमेड वगैरे सातार्यात मिळत नाही.ॲमेझॉनवर कायच्या काय किंमती आहेत.कायतरी सुचवा,तुम्ही काय वापरता?

मी शाळेत असताना तेल लावायचे सोडले. काहीही फरक पडत नाही
केसाना शाईन दिसण्यासाठी:
लॉंग टर्म : प्रकृती सुधारा. जितके तुम्ही निरोगी तितके केस चांगले दिसतात (कुठल्याही वयात). हे एक चॅलेंज म्हणून घेतलेत तर केस चांगले दिसतीलच पण प्रकृती सुधारण्याचे इतर अनेक फायदे आहेत.
मिडियम टर्मः दररोज नैसर्गिक रितीने पोट साफ राहील हे पहा (हा विनोद नाही). तो जर का काही प्रश्न नसेल तर आहारात /प्रकृतीत काहीतरी कमी पडते आहे ज्यामुळे केसांना पुरेशी जीवनसत्वे मिळत नाही आहेत.
शॉर्ट टर्म : केसांना वेगळा शांपू आणि वेगळा कंडीशनर वापरा (दोन्ही एकत्र असलेले रसायन नको). पण हे फक्त काही तासच टिकते.

धाग्याबद्दल धन्यवाद. या विषयावर सगळ्याना बोलायची सवय नसते किंवा टींगल होईल याचा संकोच वाटतो.

(तुम्ही चुकीच्या पद्दतीने इमेज देत होता. बदल केला आहे. वैयक्तिक जागेत इमेज वर क्लिक केले तर खाली खडकीत बरोबर कोड जोडले जाते. )

मी ना तेल वापरत, न जेल वापरत. ईतकेच काय तर गेल्या कित्येक वर्षात केसांना कंगवा लावला नाही. केस कापताना सलूनवाला लावतो तेच. पण त्याचाही कंगवा केसात अडकतो. पाण्याने सडकून आंघोळ घालतो तेव्हाच आत शिरतो. अजीब आहेत थोडे पण सही आहेत. मी त्याचा त्रास कमी करायला मशीन मारायलाच सांगतो. मारताना तो बोलतो की एवढे बारीक केले तरी आतली चामडी (टक्कल) दिसत नाही ईतके घनदाट आहेत Happy

बाकी मूड येईल तसे केस थोडेसे भिजवून हाताच्या बोटांचाच कंगवा करत अगदी हव्या त्या दिशेने भांग पाडता येतो.

आपला पास... फॅशन सेन्स तोकडा... केस आणि दाढी बाबत तर खूपच उदासीन...
इथल्या कमेंट्स वाचून काही फायदा झाला तर चांगलंच असेल...

माझे वयाच्या सोळाव्या वर्षापासून केस पांढरे व्हायला सुरुवात झाली... बहुतेक जेनेटिक आहे.

तर त्या तरूण वयात (म्हणजे आताही तरूणच आहे मी Happy ) जो तो येताजाता, ' अरे? केस पांढरे झाले का? मग हे लाव ते लाव, हे कर ते करु नको, अमुक डॉक्टरक्डे जा' असे म्हणून पकवू लागले. अक्षरश: रोज किमान पंचवीस लोक तरी... अनोळखी लोकही जवळ येऊन, काही संबंध नसतांना 'अरेरे, चुचुचु' वगैरे लूक देऊन सल्ला द्यायला लागले. किमान दोनेक वर्ष हे मी सहन केले. मला डाय लावायचेच नव्हते. आहे तसे कॅरी करणे मला कठीण नव्हते. केस पांढरे म्हणून मलाही काही कमीपणा, इन्फेरियोरिटी कॉम्प्लेक्स नव्हता. मला आतून काही कमीपणा वाटत नसल्याने बाहेरुन रंगरंगोटी पटतच नव्हती... पण शेवटी सगळ्यांच्या करुण नजरा, आणि रोजचे अनाहूत सल्ले यांना कंटाळून मी डाय लावायला सुरुवात केली. आणि माझे सुंदर, सिल्की मुलायम केस गमावून बसलो. डाय लावल्यावर त्यांचा नैसर्गिक मुलायमपणा निघून गेला. कितीही महाग डाय किंवा कलर लावला तरी तो नैसर्गिकपणा राहत नाही.

केस गळणे, विरळ होणे या वर बात्रा, त्वचा क्लीनिक वगैरे वाल्यानी पैसे कमावले असतील याची गणतीच नाही,

केस विरळ होऊ लागल्यावर , भांग बदलून तो भाग झाकणे, टोपी बंदना बांधणे, औषधे घेऊन केस परत येतील याची वाट पहात बसने, implant सारखे खर्चिक उपाय करणे असले प्रकार करत बसण्या पेक्षा मस्त सोल्जर कट, क्रू कट करावा किंवा एक्दम झिरो नम्बर मारावा आणि नवीन कट फ्लॉन्ट करावा, मिळणारे अटेन्शन एन्जॉय करावे.

Bald इस बोल्ड Happy

त्याला मॅच होणारी छान फ्रेंच कट दाढी ठेवावी, मज्जा नुं लाईफ

Bald looks हे हट्टाकट्टा पुरुष असेल तर चांगले वाटतात नाहीतर 'किशोर नांदलस्कर' सारखा दिसेल

'दाढी अनेक पुरुष ठेवत आहेत सध्या,लाटच आली आहे ' माझ्यापर्यंत तरी ही लाट आली नाही, आणि मी त्या लाटेवर स्वार होणारही नाही. मला तर Clean Shave लूक आवडतो. किंबहुना माझ्या एका वयाच्या २८ व्या वर्षापर्यंत साधे मिसरूडही न फुटलेल्या व आता तिशीतही दाढी न आलेल्या मित्राचा जाम हेवा वाटतो! रोजचा किती वेळ वाचत असेल त्याचा!!! Proud

I know 8 वि 9वि त अजून दाढी का आली नाही ची चिंता करणारी मुले 35शी आलि की दाढी का आली म्हणायला लागतात Happy

Bald इस बोल्ड
>> इत्ता इजि नै ना भाय.... विट्ठल यांनी म्हटल्याप्रमाणेच. बाल्ड लूक पर्सनॅलिटीस सूट होत असेल तरच... बाकी ही चर्चा मग भलतीकडेच जाते, म्हणजे... आतून सुंदर पाहिजे, बाहेरुन काय उपयोग वगैरे लेम मोटिवेशनल झांसे...

जे आपल्या व्यक्तिमत्वाला उत्तम वाटते ते करावेच. वीग घालायचा असेल तर चांगला, उत्तम दर्जाचाच वीग घालावा. शरीरासाठी कायम चांगलंच असावं.

कित्येक दशकं मी डोक्याला तेल लावले नाही,मला तेल आवडत नाही.त्यामुळे केसांना शाईन दिसत नाही>>हेयर सिरम वापरुन पहा.

नानाकळा,

माझी पण केस अशीच होती. साधारण अकरावी ला केस पांढरे व्हायला सुरुवात झाले. कॉलेज मधले माझे टोपण नावच म्हाताऱ्या होते. Lol मी डाय लावायचा नाही यावर ठाम होतो. पण मेहेंदी लावायचो त्यामुळे केस लाल आणि काळे असे मिक्स दिसायचे.
अधून मधून घरी बनवलेले माक्याचे तेल लावायचो.

नंतर केस परत काळे झाले. आता काही मित्र विचारतात अरे तुझे केस काळे कसे काय झाले ? कारण आता सर्वांचे केस पिकायला लागले तरी माझे अगदी मोजके केस पांढरे झाले आहेत. Happy

त्यामुळे माझ्या टीनेज मधल्या फोटो मध्ये सगळ्या मित्रांचे केस काळे भोर आणि माझे पांढरे/लाल/काळे असे दिसतात आणि आत्ता मित्रांसोबत फोटो काढले की माझे केस काळे आणि बाकीच्यांचे पांढरे !!!! Lol

आमच्या घरी एक लाल कलरचे पुस्तक होते आयुर्वेदाचे. आता त्याचे नाव आठवत नाही. पण त्यात ती सगळी तेल बनविण्याची पद्धत दिली होती. माका, जास्वंद वगैरे काय काय घालून बनवावे लागते ते.

पण माझे केस त्या वयात पांढरे होणे आणि नंतर काळे होणे यात मेहंदी/माक्याचे तेल या पेक्षा हार्मोन बदल वगैरे असावा असे वाटते.

आता बायका इथे लिहितच आहेत तर माझे चार अणे Happy

वरच्या फोटो सारखा ब्रॅड पीट पहिल्यांदा पाहिला असता तर तो काही favorite झाला नसता Sad इथे मॉडेल्स आणि सेलिब्रिटी चे फोटो टाकणार असाल तर जरा नीट असतील असं बघून टाका. मिसो कसाही चालेल Happy

राजसी ,ब्रॅड पीटचा फोटो टाकला कारण हा त्याचा पन्नाशीतला फोटो आहे,तरीही एकदम माचो दिसतो.यावयात आपल्याकडचे बरेचजण ढेरपोटे टकले वा म्हातारे झालेले असतात.असेल तो लुकही खुलवता येतो हे सेलिब्रीटींकडून शिकता येतो,माझ्यासार्ख्या पस्तीशीत येणार्या पुरुषांसाठी हे जरा होपफुल वाटते.आपणही निदान अजून दहावर्ष तरी तरुण दिसू शकतो हा कॉन्फीडंस वाटतो.तरुण रहायला प्रत्येकालाच आवडते.
माझी एक फेबु मैत्रीण आहे,वय पन्नास ,पण काय स्टाईलीश आणि ट्रेंडी राहते म्हणून सांगू.असे स्टाईल स्टेटमेंट असलेले कुणीही मग तो ब्रॅड पीट,मिसो वा माझी फेबु मैत्रीण असो,ला जाम हेवा वाटतो यांचा व आपण ही जरा ट्रेंडी रहावं असं वाटू लागतं.

अतरंगी,लवकर शेअर करा ......(सॉरी पुरुषांच्या केशभूषा धाग्यावर लिहितेय☺️☺️)
इथेपण बायकांची घुसखोरी??? एक जागा सोडू नका. ट्रेनमध्ये पण जनरल डब्यात घुसणार, बसमध्ये पण (लेडीज सीट मोकळ्या सोडून) इतर सीटवर बसणार आणि आता मायबोलीवर पण पुरुषांच्या धाग्यात घुसखोरी करणार???

खरेच आता 'पुरुष-मुक्ती संघटना' काढावीशी वाटते!!!

आपण ही जरा ट्रेंडी रहावं असं वाटू लागतं.>>>>

मी पण कायम गबाळ्यासारखा राहतो. मला पण काही मैत्रिणी, मित्र पाहून जरातरी व्यवस्थित राहावे असे कित्येकदा वाटते.
पण त्या साठी लागणारा वेळ, श्रम आणि पैसा बघितला की लगेच मन पालटते Lol

त्यामुळे पहिल्यापासून गबाळेपणा हे आमचे स्टाईल स्टेटमेंट आहे Lol

कोणी गबाळेपणा बद्दल काही बोलले की त्याला साधेपणा किती महत्वाचा आहे, सगळे कसे नुसते वरच्या दिखाऊपणा वर भुलतात, मनाचे सौंदर्य हेच खरे सौंदर्य, ठेवले अनंते तैसेची राहावे, साधी राहणी उच्च विचारसरणी वगैरे तत्वज्ञान तोंडावर फेकावे आणि आपण या मोहमायेपासून आणि शोबाजी पासून कसे लांब आहोत हे सांगून समोरच्याने प्रत्युत्तर द्यायच्या आत तिथून कल्टी मारावी.

साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी म्हणजे काय हे मला अजून समजलेले नाही.मी सुद्धा या खुळापायी कॉलेजमध्ये साधेच रहायचो.शिंप्याकडे शिवलेली पँट ,शर्ट,पायात साधी चप्पल घालून आपण फार उच्च विचाराचे आहोत व स्टाईलीश राहणारे थिल्लर आहेत असे समजत होतो.स्टाईलीश मुलं पोरी फिरवायचे व आम्ही ते पाहून कोळश्यासारखे काळे ठीक्कर पडायचो.
याचा अर्थ असा नाही की फार प्रोव्होकेटीव्ह लुक ठेवावा.दुसर्याच्या डोळ्यात आपण डिसेंट दिसायला हवे व नवीन ट्रेंड जे जगमान्य झाले आहेत ते फॉलो करावेत.
@वि.मु. बायका या धाग्यावर आल्यातर स्वागतच आहे.त्या जास्त सजग असतात नवीन ट्रेंड विषयी.व पुरुषांना काय चांगके दिसते काय नाही याचे इनपुट त्यांनी दिले तर काय सोने पे सुहागा.

कोणीतरी जाणकराने चेहरयाला तजेला येण्यासाठी काय करावे यावर लिहा.. घरगुती तसेच सलूनमध्ये फेशिअल वा तत्सम.. या प्रकारांबद्दल माझ्या मनात एक अढी आहे. दिवसातून दोनदा साबणाने तोण्ड धुवून चेहरयावरचे तेल घालवण्याव्यतिरीक्त मी ना उजळ दिसायला कधी पावडर लावली ना फेअर एण्ड लवली.. सोरी फेअर एण्ड हॅण्डसम

आपल्याकडे कोणाला झगामगा आणि मला बघा छाप कपडे घालायची आवड आहे का? मी कॉलेजला असताना अधूनमधून घालायचो. हल्ली जॉबला लागल्यापासून मिस करतो.

मी एक हवाईन शर्ट आणला होता,तो घातल्यावर लोक टुरीस्ट स्पॉटवरचे माकड बघावे तसे बघत होते .नंतर त्या शर्टचा वापर बूट पुसायला केला.

Pages